अवघी सतरा वर्षाची एक खेडवळ तरुणी अकस्मात पुढे येऊन आपल्या देशाच्या सैन्यात चेतनेचे हुंकार भरते, दैवी ताकद अंगात संचारल्यागत त्याचे नेतृत्व करते अन आपल्या चढायांच्या जोरावर एका सर्वशक्तिमान महासत्तेला धूळ चारते, पण ज्या देशाच्या रक्षणासाठी, स्वाभिमानासाठी, अस्तित्वासाठी ती लढते त्या देशाचा राजाच तिला कार्यभाग उरकल्यावर शत्रूच्या ताब्यात देतो. तिथे तिची दैवी शक्ती, त्यातले दैवी संदर्भ खोटे ठरवण्यासाठी चर्च पुढे येतं. तिचा अनन्वित छळ होतो अन या महापराक्रमी तरुणीला चेटकीण ठरवून वयाच्या २१व्या वर्षी जाळलं जातं !
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर
तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते. पण पन्नाशीला टेकल्यावर आधी असलेल्या सवयींना मुरड घालुन आणि ऊन वारे लागुन… वास्तवाचे टक्के टोणपे खाउन रिजीड झालेल्या शरीराला आणि मनाला वळण लावायला वेळ लागतो.वयानुरुप शिबीरे बदलत असतीलही.
याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेले 'विवेकानन्द केन्द्राचे योग शिबीर' असेच बरेच काही शिकवुन गेले.
वेड्या पावसानं ...
जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून
असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून
टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून
येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....
संतांचे उपकार
भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||
भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||
आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||
वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||
ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||
आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||
ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||