संस्कृती
गणेश उत्सव आणि देखावे
गणेश उत्सव आणि देखावे ह्यांच्या संबंध ह्यावर्षी तब्बल १२५ वर्ष जूना होतोय. ह्या देखाव्यांनी काय नाही केले, समाज एकत्र आणला, इंग्रजाना पळवून लावले, मदत कार्य केले, मनोरंजन केले आणि अनेक विधायक कार्य केले त्यातीलच अजुन एक महत्वाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन.
झाडे वाचावा, पाणी वाचावा, पौराणिक ते वैज्ञाणीक, व्यक्ति विशेष, कधी शिक्षण तर कधी खेळ किती ही विविधता. यंदा ही असे अनेक विविधांगी देखावे आपल्याला बघायला मिळणार ह्याची खात्री आहे मला.
तडका - ऊत्सवातुन
ऊत्सवातुन
आनंदाचे ऊत्सव सारे
पार पाडावेत आनंदाने
ऊत्सव ओळखले जावे
सलोख्याच्या संबंधाने
साजर्या झाल्या ऊत्सवाने
डोळ्यांची काया दिपावी
प्रत्येक प्रत्येक ऊत्सवातुन
सामाजिक एकता जपावी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
गणेशोत्सव २०१६ : श्री गणेश प्रतिष्ठापना
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
****
गणेशोत्सवासाठी ही राग वृंदावनी सारंग मध्ये बांधलेली पारंपरिक बंदिश / गणेशवंदना अगो (अश्विनी गोरे) यांनी गायली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
मायबोली गणेशोत्सव २०१६
तडका - वर्गणी जमा करताना
वर्गणी जमा करताना
वर्गणी मागत असताना
नैतिकतेचं रूप असावं
जमा झाल्या फंडाला
वर्गणीचंं स्वरूप असावं
धाक दाखवुन दाखवुन
वर्गणी जमा करू नये
जमा केलेली वर्गणी
हि खंडणी ठरू नये
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
बलात्कार असाही आणि तसाही
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले.
कोक स्टुडिओ पाकिस्तान – सबकुछ!
साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
गावदेव ....
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
गाव त्याला शिळामंदिरी शोधत राहते.
तांबडफुटीलाच तो पिकातुनी निघून येतो
कणसातल्या मोत्यांत सत्व परि उरते.
तुळशीच्या मंजुळात बाळकृष्ण झंकारतो
हळदओल्या हातांना त्याचीच ऊब येते !
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
खिल्लारांच्या पाठी झुल त्याची लहरते
माळावरच्या पानापानात तालात डोलतो,
दरड कपारीत त्याचीच सावली तरंगते
पाकळ्यांच्या मृदूतरल कायेतून सरसरतो
फुलांच्या परागकणांना झिंग त्याचीच येते !
गावाच्या वेशीजवळ वामकुक्षी देव घेतो,
कळसावरुनी पळसपान हिंदोळे हवेत घेते
गाभाऱ्यातला वेणूनाद वारा घुमवत फिरतो.
चराचराची झिम्मड काया पुलकित होते,
पार्थिवगणेशपूजा - चिंता आणि चिंतन
Pages
![Subscribe to RSS - संस्कृती](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)