गणेश उत्सव आणि देखावे

Submitted by मध्यलोक on 6 September, 2016 - 06:38

गणेश उत्सव आणि देखावे ह्यांच्या संबंध ह्यावर्षी तब्बल १२५ वर्ष जूना होतोय. ह्या देखाव्यांनी काय नाही केले, समाज एकत्र आणला, इंग्रजाना पळवून लावले, मदत कार्य केले, मनोरंजन केले आणि अनेक विधायक कार्य केले त्यातीलच अजुन एक महत्वाचे कार्य म्हणजे समाज प्रबोधन.

झाडे वाचावा, पाणी वाचावा, पौराणिक ते वैज्ञाणीक, व्यक्ति विशेष, कधी शिक्षण तर कधी खेळ किती ही विविधता. यंदा ही असे अनेक विविधांगी देखावे आपल्याला बघायला मिळणार ह्याची खात्री आहे मला.

त्याचाच काहीसा छोटासा पूर्वानुभव काल नाना पेठ येथील एका मंडळा समोर मला आला. मंडळात देखाव्याची तयारी जोरात सुरु होती. कुणाच्या हातात कुंचला तर कोणी मांडवातील पडदे सावरतोय. मांडवात एक छोटेखानी डोंगर सुद्धा उभा केला होता, बेलाग सह्याद्रि आणि त्याचे उतुंग कडे ह्या डोंगरावर रेखाटले होते, हिरवागार शालू त्याने पांघराला होता. डोंगर बघितला आणि सहाजिकच मनात उत्सुकता निर्माण झाली.

विचारले, "यंदाचा विषय कोणता ? "
"डोंगरकड्यावर सेल्फी काढताना होणारे अपघात"

आंनद ही झाला आणि मन थोडे खट्टू सुद्धा झाले. डोंगर आता फ़क्त सेल्फी आणि अपघात ह्यासाठी ओळखले जाऊ नये म्हणजे मिळाविले असा एक विचार लगेच मनात आला.

आनंद हा होता की हे अपघात कसे टाळावे, काय उपाय योजना कराव्या आणि काळजी कशी घ्यावी हे प्रबोधन ह्या देखाव्यात मांडले जाईल. Safety चा हा विचार गणेश उत्सवा मार्फत जनमानसात पोहचविला आणि रुजवीला जाईल. खरेच ह्यासाठी गणेशउत्सवा सारखे दूसरे मोठे माध्यम शोधुनही सापडनार नाही.

सुरक्षितता अर्थात सेफ्टी अशी मुळा मुळात पोहचु दे रे महाराजा

तुम्ही सुद्धा तुमच्या आठवणीतले किंवा यंदाचे, विशेष उल्लेखनीय किंवा काही तरी वेगळे, घरचे किंवा सार्वजनिक असे देखावे आणि त्यांची माहिती इकडे सांगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त