रक्षाबंधन निमित्ताने
अहो कित्तेक रक्षाबंधन
आले आणि गेले आहेत
तरीही बहिणींचे जीणे
सुरक्षित ना झाले आहेत
सेल्फ डिफेन्स बाबतीत
त्यांना ट्रेनिंग द्यायला हवी
स्वत:चं रक्षण करण्यासाठी
बहिण सक्षम व्हायला हवी
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
परवा हॉस्पिटलमध्ये गेले होते. निघायच्या वेळेला घड्याळ पाहिले आणि लक्षात आले ते एकदम 'राईट टाईम' होते. तसे घर सोडले की बाकी ठिकाणी घड्याळे योग्य वेळच दाखवतात. पण घरात प्रत्येक घड्याळ ५-१० मिनिटे पुढे करून ठेवायची सवय लागली आहे. त्यामुळे कुठेही घड्याळ पाहिले की ते योग्य वेळ सांगतच असेल अशी सवयच राहिली नाहीये. तरी त्यातल्या त्यात आजकाल मोबाईल वर कॅर्रीएर कडून येणारी वेळ जी दिसते तीच योग्य आहे असे समजून चालते. निदान आपण चुकलो तर आपल्यासोबत बाकी फोन वापरणाऱ्या लोकांचेही घड्याळ चुकीचे असेल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
समोर बसलेल्या आपल्या मायभगिनींच्या वा पोरीबाळींच्या हाती विविध रंगी बांगड्या अलगद चढवणारे कासार आणि त्यांच्या पुढ्यात हात करून बसलेल्या स्त्रिया हे दृश्य कशाची आठवण करून देते ? अर्थातच नागपंचमी जवळ आल्याची !
नागपंचमी आणि बांगडया यांचे नाते म्हणजे आई आणि मुलीच्या नात्यासारखे !
मुलगी आईजवळ असली की उजळून निघते, तिला लकाकी चढते.
लेक आईपाशी आली की आईचा जीव आभाळाएव्हढा होतो. तसंच या बांगड्या आणि स्त्रीच्या नात्याचं तत्व आहे ! नागपंचमीला हात बांगडयांनी मढून निघाले की त्या बांगड्यांना निराळेच चैतन्य लाभते.
वीकेंडला शाळेतल्या मैत्रिणी भेटलो, नवरे-मुलांसहित मग काय गोंधळ नुसता. मुलांचे जेवण देऊन झाले आणि अजून पोळ्या चालूच होत्या. मग कुणीतरी म्हणाले 'नवऱ्यांना आधी देऊन घ्यायचे का?'. म्हणले, 'नाही सर्व एकत्रच बसू'. त्यांनाही आता हे माझे नेहमीचे माहित झाले आहे. त्यामुळे त्या लक्ष देत नाहीत. पण या विषयावर बोलून वाद नक्कीच होऊ शकतात. तर विषय असा की कुठेही एखादा कार्यक्रम असो, अनेकदा मी ऐकले आहे की "पुरुषांना आधी बसून घेऊ दे." मग त्यात लग्न असो किंवा डोहाळे जेवण. घरात बाईने कितीही मरमर करू दे. तिला अजून चार बायका मदतीला असू दे, जेवण मात्र पुरुषांना आधी करून घेऊ दे.
'माज' आणि 'मान'!
गाडी सुटतासुटता धावत येऊन त्याने डबा पकडला आणि धापा टाकत एका रिकाम्या सीटवर बसून त्याने आसपास नजर फिरवली.
बहुधा फर्स्टक्लासचा प्रवासी असावा. हातात आयफोन, मनगटावर चकचकीत ब्रेसलेट, गळ्यात जाडजूड 'चैन', बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर चोपडलेला चकचकीतपणा! नजरेत तुच्छ तुटकपणा ओघानेच आला...
गाडीनं वेग घेतला आणि त्यानं हातातली 'मिन्ट'ची घडी उलगडली. बॆग उघडून लहानसा टप्परवेअर बाहेर काढला, आणि मिन्ट वाचत डब्यातला एकएक तुकडा चघळू लागल्या.
जगाला फाट्यावर मारतो, असे इतरांना वाटण्यासाठी जे जे करायचे असते, तसंच करू लागला.
कामाठीपुरयाच्या ११व्या गल्लीत अरुंद बोळांच्या आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. आजही 'आशियाना' हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात.
सुंदर संकल्पना आणि मांडणी असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५ जुलै २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. श्री. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाचा ४ वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती भवन संग्रहालयाचा विस्तारित टप्पा खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मी माझा वाढदिवस राष्ट्रपती भवनाला भेट देऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता. मग सगळे नियोजन करून वाढदिवशीच राष्ट्रपती भवन आणि तेथील संग्रहालय आवर्जून पाहिले होते. खास तेवढ्यासाठीच तर दिल्लीला गेलो होतो.