250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक
Submitted by पराग१२२६३ on 6 September, 2023 - 02:30
सुंदर संकल्पना आणि मांडणी असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे २५ जुलै २०१६ ला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. श्री. प्रणब मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाचा ४ वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती भवन संग्रहालयाचा विस्तारित टप्पा खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मी माझा वाढदिवस राष्ट्रपती भवनाला भेट देऊन साजरा करायचा निर्णय घेतला होता. मग सगळे नियोजन करून वाढदिवशीच राष्ट्रपती भवन आणि तेथील संग्रहालय आवर्जून पाहिले होते. खास तेवढ्यासाठीच तर दिल्लीला गेलो होतो.