What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.
पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.
मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.
मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.
त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.
एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..
असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!
** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.
बाकी काही असो पण असा
बाकी काही असो पण असा वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून विचार करणे जिवंतपणाचे लक्षण आहे.
बाकी हा धागा हिट्ट होणार यात दुमत नाही.
म्या ज्जीत्ता हाय
म्या ज्जीत्ता हाय
{जगभरात पाकिस्तानी अभियंते
{जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..}
जगभरात भारतीय अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर इथे शिक्षणाची दूरावस्था आहे की नाही ? मग भारत अविकसित किंवा मागास का आहे? दुसऱ्याचं वाकून बघण्याआधी आपलं काय झाकून ठेवलंय ते बघणं गरजेचं नाही का?
पकिस्तानातले माहित नाही
पकिस्तानातले माहित नाही पणआपल्यालाहि स्वातन्त्र्य मिळून ६९ वर्षे झाली तरी अजुन पुण्यात आपण हेल्मेट का घालावे यावर चर्चा चालु आहेत. देशभर रहदारीचे नियम मोडून मोटारी व टू-व्हीलर चालवल्या जात आहेत व त्यात शेकडो मरत आहेत. आपले रस्ते अजून खड्डेमयच आहेत. अजून सर्वत्र अनियमित बान्धकामे चालुच आहेत व त्यावर कोणी काही करत नाहीआणि करु शकत पण नाही. अनेक शहरात वयस्क नागरीकाना रस्ते ओलान्डणे अशक्य आहे आणखी खूप लिहिता येईल पण एवढे पुरे.
पाकिस्तानात भारताबद्दल व
पाकिस्तानात भारताबद्दल व भारतात पाकिस्तानद्दल कांहीही चांगलं शोधलेलं, बोललेलं खपवून घेतलं जात नाहीं, ह्या एकाच आघाडीवर ६९ वर्षं हे दोन्ही देश प्रगतिच्या एकाच पातळीवर आहेत व त्यांची ही समांतर घोडदौड अशीच अखंड चालणार आहे ! कारण, कोणत्याही एका लोकसमूहातील सर्वच माणसं सर्वगुणसंपन्न व दुसर्यातली सर्वच दुष्ट असणं किती अशक्य आहे, हें दोन्ही देश मान्यच करत नाहीत; किंबहुना, तें मान्य केलं जाणार नाहीं याची पक्की खबरदारी दोन्ही देशांत घेतली जातेय !!
दोन घरे शेजारी शेजारी आहेत.
दोन घरे शेजारी शेजारी आहेत. दोन्ही घरातील प्रकाशव्यवस्थेची तुलना आहे. जुनाट दिवे, खराब / अस्वच्छ तावदाने यामुळे कुणाच्या घरात किती सक्षम / कमजोर प्रकाशव्यवस्था आहे याचा निर्णय करावयाचा आहे. त्याआधी एक महत्त्वाचा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे आणि तो म्हणजे एका घरात पुर्ण प्रकाश येतो आहे. ज्याचे पृथक्करण केले असते तांबड्यापासून जांभळ्यापर्यंत सर्व रंगांचे आणि तरंगलांबीचे किरण मिळू शकतात. तर दुसर्या घरात केवळ एकाच रंगाचा प्रकाश येतो आहे. आता कुठल्या घरातील प्रकाशयोजना चांगली आहे असे म्हणता येईल?
परंतू गेल्या ६० वर्षात भारतात
परंतू गेल्या ६० वर्षात भारतात काहीच विकास झाला नाही त्यामुळे पाकिस्तान आणि भारताची तुलना करणे फार चुकिचे आहे. पाकिस्तानात गेल्या ७० वर्षापासून प्रगती सुरु आहे आनि भारतात प्रगती सुरु होऊन अवघी २ वर्षच झाले आहे. त्यामुळे हे अनफेअर आहे. अजुन १०-२० वर्ष प्रगतीची राहिली तर तुम्ही तुलना करा फक्त २ वर्षाच्या मुल्यमापनावर अख्खा लेख लिहिने मला बरोबर वाटत नाही.
या चुकिच्या तुलनेचा मी २ वर्षाचा देशभक्त देशप्रेमी तुमचा जाहीर निषेध करतो.
जय हिंद जय भारत.
तुमच्या लेखाबाबत माझा पास.
तुमच्या लेखाबाबत माझा पास.
मात्र ह्या लेखाच्या निमित्ताने अनेक 'ठेवणी'तील आयडीना वर्तमान सरकार वर गरळ ओकायला, एक आयता प्लेटफाँर्म तेवढा उपलब्ध करून दिलाय.
एक वरती आलाच आहे. बाकिचे देखिल येतील हळूहळू.
प्रसाद, वर्तमान सरकार किती
प्रसाद, वर्तमान सरकार किती कालावधीपासून आहे आणि त्या आधीच्यांनी किती काळ शासन केले या 69 वर्षांत. मग जर सरकारवरच ठपका ठेवायचे झाल्यास कोणावर जास्त येईल. मुळात सरकार म्हणजे आपल्यातूनच आले असते ना. त्यामुळे ईथे जे काही चांगले वाईट प्रगती अधोगती घडलीय त्या सर्वांची जबाबदारी आपण प्रत्येकानेच घ्यायला हवी.
<<<<<<<<एका घरात पुर्ण प्रकाश येतो आहे. ज्याचे पृथक्करण केले असते तांबड्यापासून जांभळ्यापर्यंत सर्व रंगांचे आणि तरंगलांबीचे किरण मिळू शकतात. तर दुसर्या घरात केवळ एकाच रंगाचा प्रकाश येतो आहे. >>>>>>
हे उदाहरण देऊन समजावले तर जास्त योग्य राहील. अन्यथा ज्या संदर्भाने आपण हे म्हणत आहात तोच चुकीचा असल्यास आपल्यालाही हे कधीच समजणार नाही आणि आपला गैरसमज कायम राहील
<<<<< दुसऱ्याचं वाकून बघण्याआधी आपलं काय झाकून ठेवलंय ते बघणं गरजेचं नाही का? >>>>>
टग्या हो खरंय, दर वर्षाला आपण सारेच त्याच त्याच मुद्द्यांवर हा आढावा घेत असतो. आता त्याच त्याच मुद्द्यांवर बोलतो हा आपला दोष नाही, तर ईतक्या वर्षांनीही आपल्या मूलभूत समस्या त्याच आहेत हे दुखणे आहे.
पण त्यातही निदान आपण पाकिस्तानपेक्षा तरी सुखी, समाधानी आणि सरस आहोत म्हणून स्वताचे सांत्वन करतो. राज्यकर्तेही आपला हा समज कायम राहील याची काळजी घेतात.
तर हे खरेच तसेच आहे का हे बघण्यासाठी ही तुलना आहे. पण कोणाला हा तौलनिक अभ्यास न करता याच भ्रमात(!) राहणे आवडत असेल तर नो प्रॉब्लेम
ऋन्मेऽऽष .. प्रथम या
ऋन्मेऽऽष .. प्रथम या धाग्याबद्दल धन्यवाद.. मी अबुधाबी येथे एका पाकिस्तानी कंपनीमध्येच काम करतो. मी एकटाच नाही तर माझ्यासोबत इतरही काही केवळ भारतीयच नाही तर मराठी बंधू-भगिनी काम करतात (एकंदर भारतीय टक्का 10 इतकाच असेल आणि बाकी 90% पाकिस्तानी). त्यामुळे कदाचित या धाग्याला प्रतिसाद देण्याचे धाडस करतोय. भाऊ नमसकर यांच्या मताशी मी अगदी सहमत आहे. माझ्या आजू-बाजूला (ऑफिसमध्ये आणि बस मध्येही) पाकिस्तानातील खूपसे आपल्याप्रमाणेच सामान्य असलेले लोक असतात. भारतीय सामान्य माणसाला दहशतवादाबद्दल जितकी चीड आहे तितकीच त्यांना सुद्धा आहे. हे मला जाणवले. जितका भ्रष्टाचार भारतात आहे तितकाच तो पाकिस्तानात आहे. आणि क्रिकेटप्रेम ही त्याच पातळीवर आहे. लाहोर (जिथे मुख्य कार्यालय आहे) सारखे शहर पुण्या-मुंबई इतके प्रगत नसले तरी तोडीचे नक्कीच आहे. तिथला सामान्य माणूस दहशतवाद, असुरक्षितता, भ्रष्टाचार याने पिचलेला आहे.
फक्त धर्माच्या नावाखाली दाणे टाकून कोंबडे झुंजवणारे लोक त्या समाजात/देशात तुलनेने जास्त आहेत/असावेत. शिक्षणाची म्हणावी तितकी दुरावस्था नसली या बाकीच्या कारणांमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
काल भारत-पाकिस्तान चा संयुक्त स्वातंत्र्यदिन साजरा करताना केक वर दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज बाजूबाजूला होते. त्याउपर त्या सार्वजणांच्या मध्ये आम्ही फक्त चार जण भारताचे राष्ट्रगीत म्हणत असता अभिमान तर वाटत होताच. पण त्याच वेळी त्या सर्वांच्या नजरेत आमच्याबद्दल कौतुकही दिसत होते.
आपणा भारतीयांना तिकडचे चांगले बोललेले केलेले ऐकू येत नाही किंवा माध्यमांद्वारे ऐकवले जात नाही. वाईट गोष्टी तिथेही घडतात....
उनाड पप्पू, चांगला अनुभव शेअर
उनाड पप्पू, चांगला अनुभव शेअर केलात.
परदेशात माझी काही पाकिस्तानींशी भेट, गप्पा झाल्यात. आपल्या नेत्यांना ते ही लोक नावे ठेवतात. अशा गप्पात साधारणपणे आपण बघा पाकीस्तानी, भारतीय आपसात बाहेर मिसळतो बोलतो, नेते उगाच भडकवातात असा सूर डोकावतो, जे खरे आहे. पाकीस्तानात त्यांच्या वेगळ्या अशा समस्या असतील जशा आपल्यपण वेगळ्या आहेत.
per capita GDP मध्ये भारत-पाकीस्तानात फारशी दरी नाही: याचा स्रोत:
http://statisticstimes.com/economy/india-vs-pakistan-gdp.php
बाकी काही क्षेत्रात जसे की स्पेस टेक्नॉलॉजीत भारत पुढे आहे - इतर कोणत्या क्षेत्रात कोण पुढे ,मागे याची माहीती नाहीय. कोणी यावर लिहिल्यास छान होईल.
आपणा भारतीयांना तिकडचे चांगले
आपणा भारतीयांना तिकडचे चांगले बोललेले केलेले ऐकू येत नाही किंवा माध्यमांद्वारे ऐकवले जात नाही.
<<
✔
चुकून ऐकू आलेच तर हे असे लोक तुमच्या कानात बोळे घालून तुमचे डोळेही झाकायचा प्रयत्न करत असतात. शिवाय तोंडाने काय बोलायचे हे देखिल डिक्टेट करायचा प्रयत्न करतात. आपली स्वतःची विचारशक्ती जिवंत ठेवायचा प्रयत्न करा. अन प्रश्न विचारा! व्हाय, व्हू, हाऊ, व्हेन, व्हॉट.. ऑल द डब्लू'ज
उनाड पप्पु: चांगला अनुभव ....
उनाड पप्पु: चांगला अनुभव ....
या दोन्ही देशातील सामान्य
या दोन्ही देशातील सामान्य लोकांची शोकांतिका म्हणजे एकमेकांबद्दल अतिशय तोकडी व चुकीची माहिती असणे. पाकिस्तानने इतिहास सोयिस्कर करण्याच्या प्रयत्नात भारतास विलन बनवले, भारताने अनुल्लेख करून पाकिस्तानबद्दल शाळा-माध्यमातून माहितीच फारशी दिली नाही. आणी हे जवळपास स्वातंत्र्यानंतर लगेचच दोन्ही देशात घडले.
पाकिस्तान व भारत यांच्यातील प्रमुख बदल गेल्या २० वर्षात झाला. तोवर पाकिस्तान भारतापेक्षा अनेक बाबतीत सरस होता. आज पाकिस्तान कुठल्याही मोठ्या उद्योगसमुहाचे भांडवल गुंतवण्याचे ठिकाण नाहिये, भारत या उलट आहे. मला वाटते हा फार मोठा फरक झाला. भारत फक्त 'उपलब्ध बाजार' आहे म्हणुन इथे भांडवल घातले जात आहे असे म्हणणे असेल तर पाकिस्तानची लोकसंख्या पण काही कमी नाहिये.
या आजच्या स्थितीला पाकिस्तानात राजकारणात वाढत गेलेले धर्माचे महत्त्व, टोकाचा राष्ट्रवाद, एकाधिकारशाही/हुकुमशाही हवीहवीशी वाटण्याचे सामान्यांत वाढलेले प्रमाण, शेजारी देशातील घुसखोर/फुटीर शक्तिंना मदत करून परस्पर आपला कार्यभाग साधून घेण्याचे प्रयत्न व जगातील बलवान देशांबरोबर अतिघसट करून फायदा करून घेण्याचे प्रयत्न जे पुढे उलटले.
कोणी ऐकतय का?
राजकारणात वाढत गेलेले धर्माचे
राजकारणात वाढत गेलेले धर्माचे महत्त्व, टोकाचा राष्ट्रवाद, एकाधिकारशाही/हुकुमशाही हवीहवीशी वाटण्याचे सामान्यांत वाढलेले प्रमाण, शेजारी देशातील घुसखोर/फुटीर शक्तिंना मदत करून परस्पर आपला कार्यभाग साधून घेण्याचे प्रयत्न व जगातील बलवान देशांबरोबर अतिघसट करून फायदा करून घेण्याचे प्रयत्न जे पुढे उलटले.
कोणी ऐकतय का?
कोणी ऐकतय का? >>>> आपणही
कोणी ऐकतय का?
>>>>
आपणही त्याच मार्गाला चाललो आहोत असे म्हणायचे आहे का?
सही पकडे है
सही पकडे है
ट्ण्या , मानव तुमच्या मताशी
ट्ण्या , मानव तुमच्या मताशी सहमत.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दोन्ही देश शेतीवर अवलंबुन होते. आणि भारतापेक्षा पाकीस्तान मध्ये सुपीक जमिनिचे प्रमाण जास्त असल्याने तेथिल अर्थव्यवस्था भारतापेक्षा चांगली होती . १९९१ नंतर आर्थिक सुधारणामुळे आणि software कंपन्या ची वाढ यामुळे भारतीय GDP मध्ये खुप वाढ झाली. १९९१ मध्ये पाकीस्तानी माणसाचे सरासरी उत्त्पन्न भारतिय माणसापेक्षा ३०% जास्त होते. आज भारतिय माणसाचे सरासरी उत्त्पन २०% जास्त आहे. ह्याबद्दल माहिती मानव ने दिलेल्या स्टॅट लिंक मध्ये आहे. भारताचा growth rate ७% आहे तर पाकीस्तानचा ४% त्यामुळे भारतीय माणसाचे सरासरी उत्त्पन्न आणि पाकीस्तानी माणसाचे उत्त्पन्न यातिल तफावत वाढतच जाणार आहे. सध्या उत्त्पनात २०% फरक असल्याने दोन देशात जास्त फरक जाणवत नाही. जर ही तफावत १००% पेक्षा जास्त झाली तर दोन देशातिल फरक जाणवेल. ह्याच दराने जर विकास झाला तर त्यासाठी आजुन २० वर्ष तरी लागतिल.
उनाड पप्पू.. छान प्रतीसाद
उनाड पप्पू.. छान प्रतीसाद दिलात.. अगदी असाच माझा अनुभव आहे.. १५-२० पाकिस्तान्यांत आम्ही १-२ भारतीय होतो. पण सर्वांनीच आमच्याबद्दल नेहमी आदर दाखवला. या बाबत एका 'ब्यू कॉलर' पाकी वर्करचा अनुभव माझ्या मनात घर करुन आहे, तो म्हणतो....
"आम्हाला जन्मापासुन फक्त दोन गोष्टी शिकवतात. एक- अल्लाह, कुराण, मुस्लीम. आणि दोन- भारत बोले तो काफिर. इथे या कंपनीत कामाला लागलो अन शेजारी बघतो तर 'हिंदी', डोकंच सरकलं. मग सुरवातीला रोज भांडण. हळुहळु कळु लागले की आपणच xxx आहे. हे पोलिटिशन्स आम्हाला मुर्ख बनवतात"
त्याच्या त्या पठाणी बोलण्याच्या ढंगात हे ऐकायला फार मजा वाटली होती. असे एक नाही तर कित्येक पाकी डोळे झाकून विश्वास ठेवत असत.
(भारत-पाक मॅच मधे, सचिनने मारलेल्या सिक्सरला त्यांच्या रूम मधे नाचतांना, बोंबा मारतांना जी मजा मी अनुभवलीय ती सांगता येत नाही.. :))
इंटरेस्टिंग धागा. ॠन्मेष - ते
इंटरेस्टिंग धागा.
ॠन्मेष - ते भारतीय लोक गूगल चे मुख्य वगैरे जरा सिलेक्टिव्ह उदाहरणे आहेत. गूगल, मायक्रोसॉफ्ट सारखी अगदी ठळक उदाहरणे नसतील, पण उच्चशिक्षित पाकी लोक (किंवा मूळचे ब्रिटिश इंडिया मधले, पण आताच्या हिशेबाने पाक मधे जन्मलेले) ही अमेरिकेत मोठ्या पदांवर आहेत. कमी आहेत, पण अगदीच नाहीत असे नाही.
१९९१ पर्यंत पाकची अर्थव्यवस्था भारतापेक्षा चांगली असणे याचे एक कारण असू शकते. जीडीपी मधे मोठी वाढ किंवा अर्थव्यवस्था फोफावणे हे भारताचे सुरूवातीचे प्राधान्य नसेल (हा माझा अंदाज). त्यापेक्षा किमान सुविधा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवणे हे असेल.
मात्र एक प्रश्न पडतो. पंजाब व एकूणच उत्तरेत हरित क्रांती वगैरे झाल्यावर सुद्धा पाकचे शेतीतील उत्पन्न भारतापेक्षा जास्त कसे काय होते? की ते सरासरी होते, व भारतातील प्रदेशांमधल्या लोकसंख्येने भागल्यावर ते कमी झाले?
म्हणजे पाक एकदम गया गुजरा देश आहे असा समज नाही. कारण दोन्हीकडचे सर्वसामान्य लोक साधारण सारखेच आहेत. ब्रिटिश लोकांनी घालून दिलेल्या सिस्टीम्स दोन्हीकडे तशाच असतील. पण भारताने समाजवाद स्वीकारला, तर पाक ने नाही. हा एक फरक. पण त्याने अर्थव्यवस्थेत फरक पडला का? की अमेरिकन अर्थसाहाय्य वगैरे फॅक्टरही होते?
टण्या - एकमेकांबद्दलच्या माहितीबद्दल: यात "दोघांचीही चूक आहे" हा टोन भारताला अनफेअर आहे. एकतर पाक तुटून निघाले व शत्रुत्व घेतले. भारताने हे केले नव्हते. दुसरे म्हणजे इतर शेजारी देश जे आहेत - श्रीलंका, बांगलादेश, चीन, नेपाळ ई - त्यांच्याबद्दलही काही खास माहिती शालेय अभ्यासक्रमात होती असे लक्षात नाही. मग पाक बद्दलच आवर्जून दिली नाही असे दिसत नाही.
राजकारणात वाढत गेलेले धर्माचे
राजकारणात वाढत गेलेले धर्माचे महत्त्व, टोकाचा राष्ट्रवाद, एकाधिकारशाही/हुकुमशाही हवीहवीशी वाटण्याचे सामान्यांत वाढलेले प्रमाण, शेजारी देशातील घुसखोर/फुटीर शक्तिंना मदत करून परस्पर आपला कार्यभाग साधून घेण्याचे प्रयत्न व जगातील बलवान देशांबरोबर अतिघसट करून फायदा करून घेण्याचे प्रयत्न जे पुढे उलटले.
कोणी ऐकतय का? >>>
यातील पहिल्या तीन पॉईंट्सशी सहमत. नंतरच्या दोन शी नाही. फुटीर शक्तींना मदत करणे व अतिरेकी जोपासणे यात खूप फरक आहे. १९७१ मधे एका अर्थाने भारताने पाक मधील फुटीर शक्तींना मदत केली होती. पण बंगाल मधे अतिरेकी ट्रेन करून वर्षानुवर्षे बांगला देशात सोडले नव्हते - जे काम झाल्यावर भारतावरही उलटले असते.
दुसरे म्हणजे बलवान देशांबरोबर घसट + स्वार्थी/युद्धखोर नेतृत्व हे काँबो डेंजरस आहे. भारताचे नेतृत्व तसे सहसा नव्हते. कोणत्याही बलवान देशांपासून अलिप्त राहणे किती प्रॅक्टिकल आहे माहीत नाही. आंतरराष्ट्रीय लेव्हलला कोणीच हुकमी सपोर्टर नसणे हे ही धोकादायकच आहे.
>मात्र एक प्रश्न पडतो. पंजाब
>मात्र एक प्रश्न पडतो. पंजाब व एकूणच उत्तरेत हरित क्रांती वगैरे झाल्यावर सुद्धा पाकचे शेतीतील उत्पन्न भारतापेक्षा जास्त कसे काय होते? की ते सरासरी होते, व भारतातील प्रदेशांमधल्या लोकसंख्येने भागल्यावर ते कमी झाले?
कदाचित बिमारू व इतर राज्यांची मोठी लोक्संख्या व कमी उत्पादन यामुळे सरासरी कमी झाली असवी.
मी डॉन सारखी पाकिस्तानी दैनिकेही नेहेमी वाचतो. मला जाणवलेला फरक म्हणजे पाकिस्तानी वृत्तपत्रे तुलनेने जास्त स्वतंत्र आहेत. कदाचित माझे निरिक्षण चुकिचेही असेल पण भारतीय मिडिय विशेषतः प्रादेशिक वृत्तपत्रे राष्ट्रवादाने थबथबलेली असतात तसे मला तिथे जाणवले नाही. सविस्तर नंतर कधीतरी. अर्थात तिथेही अर्णब असतीलच.
गेल्या दोन वर्षात भारतात उगवलेली हायपर राष्ट्रवादी विचारसरणी सॉफ्ट फॅसिझम कडे वाटचाल दर्शविते की काय असे वाटते. केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध बोलणारे सारे देशद्रोही ! कुठे खुट्ट झालं की राष्ट्रद्रोह !
एका काशिमिरि युवकाने फेसबूक एक पोस्ट वर लाईक केले तर तेवढ्यावरून बजरंग दलाच्या तक्रारीवरून एफ आय आर दाखल करून त्याला सेडिशन खाली अटक झाली. तो कधाचित सुटेल ही, पण तो भारतावर प्रेम करेल ही थोडेशी शक्यता होती तीही कमी झाली.
कश्मिर मध्ये खोट्या चकमकीत ठार झालेल्या युवकांच्या पालकांची बँगलुरु मध्ये सभा झाली. ती एनकाउंटर खोटे होते हे खुद्द आर्मीच्याच तपासात सिद्ध झाले आहे. तरीही थेट आम्नेस्टी इंटरनॅशनल वरच सेडिशन चा गुन्हा !
पाक ने काळा दिवस साजरा केल्हा म्हणून सर्वांनी आपपले व्हा अॅ स्टेटस वर आर्मीचे चित्र टाकले!
पंजाब सारखा सुपिक प्रदेश असला
पंजाब सारखा सुपिक प्रदेश असला व तो जीडीपी साठी सहायभूत ठरत असला, तरी तिथे कमाल भूधारण कायदा नाही. अतीश्रीमंत बडे जमीनदार व त्यांची गरीब कुळे असा एकंदर प्रकार आहे. अॅवरेजमधे जीडीपी कसेही असले, तरी जनरल पब्लिक बरीच गरीबीत होती व आहे.
पाकिस्तानबरोबरची तुलना करून
पाकिस्तानबरोबरची तुलना करून आपण स्वतःचे खोटे समाधान करून घेण्यात काहीच हशील नाही. काही मोजक्या गोष्टी सोडल्या, तर इतर कुठल्याही देशांच्या नागरिकांचे भारताबद्दल फारसे चांगले मत नाही. मागे बेफिकीर यांनी त्यांच्या थायलंड सफरीविषयीच्या धाग्यात इतर भारतीय पर्यटकांचा आलेला अनुभव आणि स्थानिकांचा भारतीयांविषयीचा दृष्टिकोन नमूद केला होता.
जर स्वछतेसारख्या साध्या बाबी आपल्याला अंगीकारता येत नसतील तर, पाकिस्तानबरोबर फुकाची तुलना करून आपली टिमकी वाजवून काय हशील होणार?
तुलना करायचीच असेल, तर जगात इतरही कित्येक चांगली उदाहरणे आहेत. कित्येक देश आपल्या मागून येऊन आपल्या कितीतरी पुढे गेलेत. याबद्दल आपल्याला वैषम्य वाटायला हवे.
कश्मिर मध्ये खोट्या चकमकीत
कश्मिर मध्ये खोट्या चकमकीत ठार झालेल्या युवकांच्या पालकांची बँगलुरु मध्ये सभा झाली. ती एनकाउंटर खोटे होते हे खुद्द आर्मीच्याच तपासात सिद्ध झाले आहे. तरीही थेट आम्नेस्टी इंटरनॅशनल वरच सेडिशन चा गुन्हा !
<<
हे सगळे एनजीओज नष्ट केले पाहिजेत.
म्हणजे पाक एकदम गया गुजरा देश
म्हणजे पाक एकदम गया गुजरा देश आहे असा समज नाही....
नक्कीच न्हवता.
१> मागच्या वर्षा पर्य त पाकीस्तान मध्ये व्यापर करणे भारतापेक्षा सोपे होते.
http://www.ndtv.com/india-news/india-ranks-130-in-ease-of-doing-business...
२> university/ club cricket खुप पॉपुलर होते. त्यातुन चांगले खेळाडु मिळत होते. त्यामुळे क्रिकेट मध्ये पाकीस्तान भारतापेक्षा सरस होते.
३> शेती पुरक व्यवसाय (साखर, लोणची, कपडे, leather shoes, belt etc ) ह्याची निर्यात खुप चांगल्या प्रमाणात होत होती. १५-२० वर्षापुर्वी अमेरिकेत भारतापेक्षा पाकीस्तान चे प्रोड्क्ट जास्त दिसायचे. कराची पोर्ट चे infrastructure भारतातिल कुठल्याही पोर्ट पेक्षा खुप चांगले होते.
४> middle east मधुन बर्यापैकी remittance येत होते.
५> अमेरिकीशी संबध चांगले असल्याचा पण फायदा होत होता.
सध्या मात्र परिस्थिती बदलत आहे. middle east मध्ये oil crisis , दहशत वादामुळे व्यापार कमी झाला आहे. चांगली लोक देश सोडुन बाहेर जात आहेत. त्यामुळे growth कमी झाली आहे
काश्मीरविषयी म्हणायचेच झाले,
काश्मीरविषयी म्हणायचेच झाले, झाला इतका गोंधळ पुरेसा आहे. एव्हाना आपल्याला समजायला हवे की, बहुतांश काश्मिरींची भारतात राहण्याची मुळीच इच्छा नाही. मुळात आडातच नाही, तर पोहोऱ्यात देशप्रेम येणार कसे ?
जम्मू काश्मीर पैकी काश्मीर खोरे भारतापासून वेगळे करण्यात माझी तरी मुळीच हरकत नाही. मग पुढे जाऊन त्यांनी वेगळा देश स्थापन केला काय, किंवा पाकिस्तानातं गेले काय, तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे.
किमान यामुळे ज्यांना भारतात राहायची इच्छा नाही अशांसाठी भारतीय सैनिकांचे अनमोल प्राण दररोज खर्ची पडणे तरी थांबेल.
या सर्व चर्चेत, दोनही देशातिल
या सर्व चर्चेत, दोनही देशातिल स्त्रीयांचे कौटुंबिक्/सामाजिक "स्थानाबद्दलही /दर्जाबद्दलही" तुलना समजुन घ्यायला आवडेल.
अन (स्त्रीयांच्या स्थानावरुनच) त्यावरुनच ठरेल की पुढची पाच/पन्नास वर्षात तो तो देश कुठवर जाईल. कारण आजतरी दोनही देशात "अपत्यसंगोपन व त्यांचेवरील संस्कार" ही जबाबदारी बहुतांशी स्त्रीयाच सांभाळतात. स्पष्ट सांगायचे तर स्त्रीयांचे सामाजिक/कौटुंबिक स्थानावरुन/दर्जावरुनच, त्यांनी (त्यांना "लाभलेल्या" मर्यादीत/अमर्यादीत परिस्थितीत) वाढवलेली अपत्ये पुढे काय दर्जाची/विचारसरणीची/कुवतीची होतील ते ठरेल, व त्यावरुन तो तो देश कसा वाटचाल करेल ते ठरेल.
<< दोनही देशातिल स्त्रीयांचे
<< दोनही देशातिल स्त्रीयांचे कौटुंबिक्/सामाजिक "स्थानाबद्दलही /दर्जाबद्दलही" तुलना समजुन घ्यायला आवडेल. >> एखाद्या देशाच्या सर्वांगीण प्रगतिचं मूल्यमापन करताना तेथील स्त्रीयांचं समाजातील स्थान/दर्जा याला आत्यंतिक महत्व आहे. पण भारत-पाक संबंधांच्या तौलनिक चर्चेत मात्र तो घटक गौणच ठरावा. कारण -
सध्या या दोन्ही देशांत पुरुषाना जें सामाजिक/ कौटुंबिक स्थान/दर्जा आहे, त्यांत भारत -पाक संबंधांविषयीं पुरुषांवर असलेल्या विचारसरणीचा पगडा [अपवाद वगळतां] सर्वज्ञात आहे. मग, स्त्रीयाना पुरुषांबरोबरचं समान स्थान/दर्जा आतां किंवा भविष्यात गृहीत धरलं तरीही त्यांच्यावरही त्याच विचारसरणीचा पगडा असण्याची दाट शक्यता कशी नाकारतां येईल ?
मला वाटतं, खोलवर रुजलेली तेढ व संशय यांचीं मुळं खणून काढून तीं दूर करण्याचा उभयपक्षीं सततचा प्रामाणिक व भव्य प्रयत्न, हाच एकमेव इलाज या ६९ वर्षीय जुनाट रोगावर असावा. [हा धागाही अशा प्रयत्नांचा एक छोटा भागच समजावा !] . वैयक्तीक पातळीवर संपर्कामुळें जर हें शक्य होत असेल, तर राष्ट्रीय पातळीवरही तें शक्य होवूं शकतं. दोन्ही देशांच्या राजकीय नेतृत्वावरही अशा वाढत्या विचारप्रवाहाचा योग्य तो दबाव येतोच. पण जर विचारसरणीच बदलली नाही, तर मात्र विविध क्षेत्रांत या दोन देशानी केलेल्या प्रगतिचा तौलनिक अभ्यास व त्याचे निष्कर्ष, केवळ तेढ जोपासण्यासाठीच वापरले जातील व रोग बळावतच राहील.
सामान्य माणूस इतका विचार
सामान्य माणूस इतका विचार करतो?
मुळात त्यांना विचार करायची इच्छाच नसते. कित्येक उदाहरणे देता येतील. सामान्य लोक हे मेंढराप्रमाणे असतात. चार लोक (विचारवंत/राजकारणी/लिडर्) मिळून एक दिशा ठरवतात आणि बाकी त्यावर चालतात.
भाऊ मला वाटतं की तुम्ही प्रक्रिया कशी असायला हवी हे लिहिलंय पण खरे तर बरोब्बर उलटी असते.
Pages