कोक स्टुडिओ पाकिस्तान – सबकुछ!

Submitted by जिज्ञासा on 27 August, 2016 - 12:50

साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

आतापर्यंतच्या सर्व सिझन्समध्ये मिळून अनेक कलावंतांनी खूप सारी अविस्मरणीय गाणी रेकॉर्ड केली आहेत. ह्या सर्व गाण्यांचे संगीत संयोजन अप्रतिम असते. आजच्या कृत्रिम संगीताच्या जमान्यात गायकांनी प्रत्यक्ष वाद्यवृन्दाबरोबर (acoustic) एका टेकमध्ये रेकॉर्ड केलेले गाणे पाहणे आणि ऐकणे हा एक छान दृक्श्राव्य अनुभव आहे जो कोक स्टुडिओच्या सगळ्या गाण्यांमधून आपल्याला मिळतो.

मला वाटते ही एवढी प्रस्तावना आणि ओळख पुरेशी आहे. जर तुम्ही कोक स्टुडिओ पाकिस्तान विषयी पहिल्यांदा वाचत असाल तर खाली दिलेल्या दुव्यांवर जाऊन गाण्यांचा आनंद घ्या (त्याआधी captions/subtitles on करायला विसरू नका)! आणि हो, अजून एक, कदाचित पहिल्या फटक्यात एखादे गाणे आवडणार नाही. पण एकदा ऐकून गाणं नावडत्या यादीत टाकण्याची घाई करू नका. मला बरीच गाणी दोनदा किंवा तिसऱ्यांदा ऐकून आवडायला लागली आहेत.

मायबोलीवरचे अनेक रसिक सभासद आधीपासून कोक स्टुडिओच्या गाण्यांचे चाहते आहेत हे मला माहिती आहे! तर ह्या धाग्यावर आपल्या आवडत्या कोक स्टुडीओ (पाकिस्तान)च्या गाण्यांविषयी भरभरून लिहा! मी ही लिहीतेच आहे Happy

काही दुवे:
१. कोक स्टुडिओ संकेतस्थळ: http://www.cokestudio.com.pk/season9/
२. कोक स्टुडिओ युट्युब चॅनेल (सिझन ७ ते ९): https://www.youtube.com/user/CokeStudioPk
३. रोहेल हयात युट्युब चॅनेल (सिझन १ ते ६): https://www.youtube.com/channel/UCuszQnomLWV-r6-6tU_7_aA
४. कोक स्टुडिओ विकी: https://en.wikipedia.org/wiki/Coke_Studio_(Pakistan)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमरां लगीयां पब्बा पा (सिझन ८ एपिसोड ३): https://www.youtube.com/watch?v=REhOKUs_2wM
गायक: अली सेठी आणि नबील शौकत
गेल्या वर्षीच्या सिझन मधलं हे सादरीकरण आहे आणि या रत्नाचा शोध मला आत्ता काही दिवसांपूर्वी लागला! ख्वाजा गुलाम फरीद यांच्या काही ओळी घेऊन पाकिस्तानी कवी मझहर तीरमाझी यांनी रचलेली ही पंजाबी कविता. साधारण ७०च्या दशकात असद अमानत अली खान यांनी ही कविता संगीतबद्ध करून आणि गाऊन लोकप्रिय केली. त्या कवितेचं एक कडवं अली सेठीने गायलं आहे आणि त्या जोडीला एक पारंपरिक पंजाबी गाणं नबील शौकतने गायलं आहे. सध्या माझ्या सगळ्यात आवडत्या गाण्यांच्या यादीत पहिल्या जागी हे गाणं आहे!
अली सेठी आणि नबील शौकत दोघेही अप्रतिम गायले आहेत पण तरी शेवटी येऊन आणि कमी काळ गाऊनसुद्धा नबील थोडा जास्ती भाव खाऊन जातो Happy अर्थात उमरां लगीयां फार सुरेख काव्य आहे. उमरां लगीयां पब्बा पा म्हणजे जन्मोजन्म टाचांवर उभ्याने (वाट पाहणे). आपल्याला माहिती असलेली पंजाबी गाणी म्हणजे सगळी उडत्या चालीची बरीचशी लग्नी गाणी असतात (बल्ले बल्ले, कुडीया वगैरे). पण पंजाबी भाषेत फार गोडवा आहे! हे गाणं असंच एक जरासं दुःखी पण गोड गाणं आहे. आणि नबीलने गायलेलं गाणं तर फारच गोड! जास्ती काही लिहित नाही..पहा ऐका आणि आस्वाद घ्या!

अलिफ अल्ला, जुगनी (सिझन ३ एपिसोड १): https://www.youtube.com/watch?v=gjaH2iuoYWE

गायक: आरिफ लोहार आणि मिशा शफी

हे अजून एका नाही दोन पंजाबी गाण्यांचं फ्युजन आहे (अलिफ अल्ला आणि जुगनी). आरिफ लोहार यांची खास पंजाबी लोकगीतं गाण्याची शैली आणि त्यांच्या चिमट्याची करामत ही या गाण्याची खासियत आहे. शिवाय मिशा शफीने तिच्या स्वतःच्या आधुनिक अवताराने आणि बुलंद आवाजाने फ्युजनची मजा वाढवली आहे! हे गाणं एकदा ऐकून भागणार नाही, पुन्हा पुन्हा ऐकावं असं हे गाणं आहे हे गाणं ऐकताक्षणीच तुमच्याही लक्षात येईल. कदाचित म्हणूनच हे कोक स्टुडिओचं सर्वात लोकप्रिय गाणं (२७ कोटीच्या पुढे हिट्स) आहे.

छाप तिलक, (सिझन ७, एपिसोड ६): https://www.youtube.com/watch?v=7SDrjwtfKMk

गायक: अबिदा परवीन आणि राहत फतेह अली खान

सोनू निगम जेव्हा सारेगमपचं निवेदन करायचा तेव्हा एकदा अबिदाजी यांची ओळख करून देताना त्याने असे म्हटले होते की अबिदाजी गातात तेव्हा असे वाटते की सर्व काही शक्य आहे, ह्या जगात अशक्य असे काहीच नाही! फार खरं आहे ते. अशा अबिदाजी आणि मखमली आवाजाचे बादशाह राहत जेव्हा एका मंचावरून छाप तिलक ही अमीर खुस्रो यांची अजरामर कव्वाली गातात तेव्हाही असंच वाटतं की सर्व काही शक्य आहे! ह्या गाण्याचा कोरस फार सुरेल आणि सुरेख आहे.

ए दिल (सिझन ८, एपिसोड ४): https://www.youtube.com/watch?v=1vPfLURfkBc

गायक: अली झफर आणि सारा हैदर

तर कोक स्टुडिओ मधलं हे एक हलकंफुलकं युगुलगीत! जुन्या जमान्यातल्या एका पाकिस्तानी फिल्मी गाण्याचा हा नवीन फ्युजन अवतार! मला बहुदा गाण्यात उगीच इंग्रजी शब्द घुसडलेले आवडत नाहीत पण हे गाणं अपवाद आहे! अली झफर हा माझा आवडता गायक आहे कारण तो खूप प्रयोगशील आहे आणि अत्यंत सहज गातो! सारा हैदरचं हे पहिलं गाणं आहे ह्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही इतकी छान गायली आहे. अली आणि सारा दोघांनी मिळून हे गाणं केवळ श्रवणीयच नाही तर प्रेक्षणीय बनवलं आहे Happy आणि हो फ्युजन कशाला म्हणायचं तर उत्तरासाठी ह्या गाण्याच्या संयोजानाकडे बघा! So take it away!

चोरी चोरी (सिझन ३, एपिसोड ३): https://www.youtube.com/watch?v=RZ4k4035JdA

गायक: मिशा शफी

पहिल्यांदा गाणं ऐकतानाच वाटतं की हे ऐकलंय आधी..अरे हे तर लता दिदींनी गायलेलं यारा सिली सिली! मग लक्षात येतं की हे मूळ पंजाबी गाणं! हेच गाणं सुप्रसिद्ध गायिका रेश्मा यांनीही गायलं आहे. कोक स्टुडिओच्या ह्या गाण्यात मिशाचा आवाज फार मस्त लागला आहे! संगीत संयोजन फार अप्रतिम!

सुंदर धागा....

मी पण कोक स्टुडिओची गाणी आवर्जून ऐकतो. काही काही गाणी खूप आवडती आहेत.

मी या कार्यक्रमाच्या प्रचंड प्रेमात आहे. खासकरून लोकगीतं आणि शास्त्रीय संगीताचा जोकाही अफलातून मेळ्घालतात तो प्रचंड आवडतं.

तू वर लिहिलेली सर्व आवडतात शिवाय,

अतिफ अस्लमचं ताजदार ए हरम.

सज्जाद अलिचं किरकिर आणि तुम नाराज हो.
गुल पन्रा आणि अतिफचं मन अहमेदी अम
कोमल रिझवीचं दान्नापे दान्ना.
अतिफचं चरखा नौ लखा (नौ लखाचं जावेद बशीरचं व्हर्जन पण भन्नाट आहे, त्याचं अंब्वातले खूप सुरेख जमलंय)
अबिदापरवीनचं दोस्त अणि परवाच आलेलं नवीन.
नियाझी बंधूंचं खेरीयांदानाल
अतिफ अस्लमचं जलपरी. ( हे मध्येच अतिशय भन्नाट होतं)
असरारचं शक्कर वडां दे (हे माझं प्रचंड आवडतं)
राहत आणि मोमीनाचं आफरीन आफरीन.

अजिबात काहीही समजत नसताना पण प्रचंड आवडलेलं म्हणजे झेबचं बिबी सनम जानम. एकदम पेप्पी आणि मस्त फील आहे या गाण्याला. (तेव्हा युट्युब सबटायटल्सचा शोध मला लागला नव्हता. तरी हे गाणं दिवसभर ऐकलंय)

या व्हीडीओ खालच्या कमेंट्सपण भन्नाट असतात. (नेह्मची पाक-भारत वाले अड्डेकट्टेवाले सोडून)
अंबवातले गाणाच्या खाली एक कमेंट आहे- तो आम खाने का मन कर रहा है दुल्हनियाका. प्रचंड हसले होते यावर.

कोक स्टुडिओ पाकिस्थानामध्ये एक कव्वाल आले होते बहुतेक सीझन2 मध्ये. कंगना म्हणून एक कव्वाली सादर केली होती. अप्रतिम
https://youtu.be/BXmIpbBOSvI

कोक स्टुडिओवरचे बरेचशे गाणे आवडले , अजुन बरीच ऐकायची आहेत.
सईन झहुरचं अल्ला हु प्रचंड आवडलं https://www.youtube.com/watch?v=S3juikj9LVA
जुगनी तर नेहमीच आवडतं.

शक्कर बडा दे ........ हे तर श्री ४२० च्या दिल का हाल सुने दिलवाला चे कॉपी आहे... की हे ओरिजिनल आहे?

शक्कर .. https://www.youtube.com/watch?v=8een9p-K-2o

दिल का हाल https://www.youtube.com/watch?v=uBlBBJWBSQw&t=0s

कदाचित पहिल्या फटक्यात एखादे गाणे आवडणार नाही. पण एकदा ऐकून गाणं नावडत्या यादीत टाकण्याची घाई करू नका. मला बरीच गाणी दोनदा किंवा तिसऱ्यांदा ऐकून आवडायला लागली आहेत.
>>>>>
+७८६

छान धागा. आतिफच्या पाकिस्तानी गाण्यांच्या शोधात या कोक स्टुडिओचा पत्ता गवसला. आता या धाग्याचा फायदा काही चांगली गाणी शोधायला होईल..

ऋन्मेष, मी तर तुझ्या आतिफ अस्लमच्या धाग्यामुळे त्याची गाणी ऐकायला घेतली आणि आता ती आवडतात खूप.
आता कोक स्टुडियोची बाकीच गाणी पण ऐकत आहे.

या बाफसाठी धन्यवाद जिज्ञासा ! राहत आणि मोमीनाच आफ्रीन आफ्रीन मस्त गाणं आहे. दोन वेळा ऐकून आवडत्या प्लेलिस्ट मध्ये टाकलंय

हो साती एक्झॅक्टली. मी सुद्धा त्याच धाग्यात सुचवले गेल्याने ऐकलेली. पाकिस्तानात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यात संगीताच स्थान फार वरचे आहे हे देखील त्यामुळेच समजले.

आज रात्री विकेंडचा फायदा उचलत ऐकेन बहुधा..

नवीन आलेलं अबिदाचं मौला ए कुल!!! अप्रतिमरीत्या जमलंय. सुरूवातीला अगदी संथ चालू असलेलं हे गाणं नंतर केवल ढोलकीच्या तालामुले "धमाल" मध्ये बदलतं! अतिशय सुरेख वाद्यसंयोजन.

मागच्या वर्षीच्या कोक स्टुडिओचा शेवट फरीदा खानुमच्या आज जाने की जिद ना करो ने झाला होता. त्याचा व्हीडीओ इतका सुंदर केला होता. आधी हे गाणं कातिलाना, त्यात फरीदाचा आवाज म्हणजे काय बोलणार.
https://www.youtube.com/watch?v=KDJL2FyRDeA

टण्या The Reluctant Fundamentalist मधे ऐकलेले कंगना तेण्व्हा पासून डोक्यात घर करून बसलेय. कोक स्टुडियो दिवाळे काढणार आहे माझे गाणि विकत घेऊन Happy

https://www.youtube.com/watch?v=a18py61_F_w ताजदार - ए - हरम. मी याआअधी ऐकलेलं व्हर्जन साबरी ब्रदर्सचं होतं. हे पण तितकंच चांगलं जमलंय.

https://www.youtube.com/watch?v=U_DSCLqgZCo>>> मन अहमेदीअम. परत एकदा अतिफ आहे पण अतिफ आवडत नसेल तर गुल पन्राला बघा. नावासारखीच गुलेगुलझार चेहरा आहे. आवाज पण एकदम नाजुक स्वीट.

मन अमदीह अम हे माझ्यापण आवडत्या गाण्यांपैकी एक.

हे गाणं कोक स्टुडिओ मध्ये ऐकल्यावर ओरिजिनल गाणं शोधून ऐकलं. गाण्याचे बोल , त्याचा अर्थ सगळं शोधलं. मस्त गाणं आहे.

https://www.youtube.com/watch?v=LekqDjknArc
ये सब तुम्हारा करम है आका!!

अतरंगी, हो. कोक स्टुडिओ मध्ये ऐकल्यावर कितीतरी वेगवेगळी गाण्यांचे ओरिजिनल्स शोधणे आणी त्यांचे अर्थ बघणे फार मजेदार असतं.

रंगबती चा शोध पण मला असाच लागला होता. कोक स्टुडिओ (भारतीय) मध्ये केलं होतं.

भारतीय कोक स्टुडिओ साठी वेगळा धागा काढायचा का ?
पण भारतीय कोक स्टुडिओ पेक्षा पाकिस्तानी कोक स्टुडिओला फॅन फॉलोइंग जास्त आहे Happy

पंछी हू उडने दो , मस्त गाणं. कोक स्टुडिओ मधला अवतार पण मस्त पण ओरिजिनल गाण्याला तोड नाही. दोन्ही गाण्याच्या लिंक खालीलप्रमाणे
कोक स्टुडिओ : https://www.youtube.com/watch?v=4HCdGGag3no
ओरिजिनल ट्रॅक : https://www.youtube.com/watch?v=h89ZZlWNUC4

Pages