कोक स्टुडिओ पाकिस्तान – सबकुछ!

Submitted by जिज्ञासा on 27 August, 2016 - 12:50

साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

आतापर्यंतच्या सर्व सिझन्समध्ये मिळून अनेक कलावंतांनी खूप सारी अविस्मरणीय गाणी रेकॉर्ड केली आहेत. ह्या सर्व गाण्यांचे संगीत संयोजन अप्रतिम असते. आजच्या कृत्रिम संगीताच्या जमान्यात गायकांनी प्रत्यक्ष वाद्यवृन्दाबरोबर (acoustic) एका टेकमध्ये रेकॉर्ड केलेले गाणे पाहणे आणि ऐकणे हा एक छान दृक्श्राव्य अनुभव आहे जो कोक स्टुडिओच्या सगळ्या गाण्यांमधून आपल्याला मिळतो.

मला वाटते ही एवढी प्रस्तावना आणि ओळख पुरेशी आहे. जर तुम्ही कोक स्टुडिओ पाकिस्तान विषयी पहिल्यांदा वाचत असाल तर खाली दिलेल्या दुव्यांवर जाऊन गाण्यांचा आनंद घ्या (त्याआधी captions/subtitles on करायला विसरू नका)! आणि हो, अजून एक, कदाचित पहिल्या फटक्यात एखादे गाणे आवडणार नाही. पण एकदा ऐकून गाणं नावडत्या यादीत टाकण्याची घाई करू नका. मला बरीच गाणी दोनदा किंवा तिसऱ्यांदा ऐकून आवडायला लागली आहेत.

मायबोलीवरचे अनेक रसिक सभासद आधीपासून कोक स्टुडिओच्या गाण्यांचे चाहते आहेत हे मला माहिती आहे! तर ह्या धाग्यावर आपल्या आवडत्या कोक स्टुडीओ (पाकिस्तान)च्या गाण्यांविषयी भरभरून लिहा! मी ही लिहीतेच आहे Happy

काही दुवे:
१. कोक स्टुडिओ संकेतस्थळ: http://www.cokestudio.com.pk/season9/
२. कोक स्टुडिओ युट्युब चॅनेल (सिझन ७ ते ९): https://www.youtube.com/user/CokeStudioPk
३. रोहेल हयात युट्युब चॅनेल (सिझन १ ते ६): https://www.youtube.com/channel/UCuszQnomLWV-r6-6tU_7_aA
४. कोक स्टुडिओ विकी: https://en.wikipedia.org/wiki/Coke_Studio_(Pakistan)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मला ही काही नवीन गाणी कळली ती आता ऐकून बघेन!
माझी अजून काही आवडती गाणी...आता ही गायकांप्रमाणे यादी आहे.

१. सनम मारवी: हिचा आवाज फार वेगळा आणि दमदार आहे. माझी आवडती तिची दोन्ही गाणी एकदम गहिरा अर्थ सांगणारी आहेत आणि सनम मारवी च्या आवाजाने ती गहिराई अजून गडद होते!

प्रीतम: https://www.youtube.com/watch?v=Z9bBGEFssWA

इथ नहीं: https://www.youtube.com/watch?v=eYKtKRRyf9Y

२. क्यूबी उर्फ कुर्तलेन बलोच (Quratulain Baloch aka QB): आपल्यापैकी हमसफर पाहिलेल्या सगळ्यांना क्यूबी माहिती असेलच (तिने हमसफरचे शीर्षक गीत गायले आहे). एकदम हटके आवाज आहे तिचा. तर तिची दोन रॉकिंग फ्युजन गाणी Happy अर्थात मला क्यूबीचा भाग जास्ती आवडतो!

सम्मी मेरी वार: https://www.youtube.com/watch?v=KHLNSxe5Y8A

बलिये: https://www.youtube.com/watch?v=xhgt47nvZUQ

३. आणि कोक स्टुडिओ मध्ये नुसती जूनी गाणी सादर होतात असं नाही. हे एक नवीन गाणं..मला रेश्मा अलीचा आवाज एकदम आवडला ह्या गाण्यात.

नदिया पार: https://www.youtube.com/watch?v=0pHFJELNKZk

नंदिनी ने लिहीलेले बीबी सनम जानम माझेही आवडते आहे. कितीतरी रिपीट्स ऐकलेले आहे ते.

त्याचबरोबर मियाँ की मल्हार हे अतिशय आवडते गाणे. बाहेर पाऊस चालू असो आणि मी घरी बसलोय की गाडी चालवतो आहे लाँग ड्राइव्ह वर. असा वेगळाच अनुभव मिळतो या गाण्याने.

https://www.youtube.com/watch?v=u7R4kdCi1zY

युट्युबवर सबटायटल्स ऑन करा. लिरीक्स (उर्दू आणि रोमन) शिवाय अर्थ तीन्ही दिसेल.

सनम मारवीचा आवाज फारच वेगळा आहे, म्हणून आवडतो तिचं आणि सज्जादचं https://www.youtube.com/watch?v=Kpczer35yBQ रंग लगा फार सुंदर जमलंय.

सज्जाद हा पण गायक अफलातून आहे. फक्त त्याचे ९०मध्ले वगैरे व्हीडीओज बघू नका. गाणीच ऐका.

https://www.youtube.com/watch?v=MQEO0lx9l00<<< हे सज्जाद अलिचं किरकिर. यामध्ये सर्वात जास्त धमाल व्हायलिननं आणली आहे. युरोपियन फोक ट्युनसारखी व्हायलिन नाचतेय.

ह्या सीझनचा चौथा एपिसोड काल प्रसिद्ध झाला. ह्यात ४ गाणी आहेत आणि मला चारही आवडली Happy

१. आया लारीये: https://www.youtube.com/watch?v=zVnbojCYPxU

मिशा शफी आणि नसीम अब्बास रुफी ह्या दोघांनी एका पारंपरिक पंजाबी लग्नात गायल्या जाणाऱ्या गाण्याला नव्या ढंगात गायलंय. ठेका धरायला लावणाऱ्या जलद बीट्स आणि मजेशीर शब्द आणि हो कोरस एकदम हटके! जुगनी सारखं ह्या गाण्यात बॉलीवूड गाण्याचं potential आहे!

२. पार चना दे: https://www.youtube.com/watch?v=TrPvQvbp3Cg

नुरी बँड बरोबर ह्या गाण्याला शिल्पा रावने गायलं आहे. सोहणी आणि महिवाल ह्यांची कथा सांगणाऱ्या एका पारंपरिक गाण्याचं हे कव्हर फार सुरेख जमलं आहे. शिल्पाच्या निमित्ताने कोक स्टुडिओच्या ह्या सिझनमध्ये भारतीय पाउल पडले आहे! (ह्या आधीच्या सिझनमध्ये देखील काही भारतीय गायक होते) अफलातून संगीत संयोजन..सागर वीणेची जराशी धून फार सुंदर आहे. लांबीला मोठं गाणं आहे पण श्रवणीय आहे.

३. उडी जा: https://www.youtube.com/watch?v=-Nbm1vFsr7Q

मोहसीन अब्बास हैदर ह्याने कोक स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच गाताना स्वतः लिहिलेली एक कव्वाली गायली आहे. शब्द ही सुरेख आहेत आणि गाणं ही.

४. आ ला बाली: https://www.youtube.com/watch?v=guFLjEsg1kc

हे मजेशीर गाणं देखील एक नवीन गाणं आहे. निर्मल रॉय आणि जब्बार अब्बास (याचा आवाज अगदी सुखविंदर सिंग सारखा आहे!) यांनी गायलं आहे. खरंखुर फ्युजन म्हणता येईल असं : शब्द अरबी, उर्दू आणि पंजाबी आणि संगीत पर्शियन, अरेबिक आणि आधुनिक. प्रेमगीत असल्यामुळे शब्दही फार प्रेमळ Happy ऐकताक्षणीच आवडावं असं गोड गाणं!

पार चना दे ने वेड लावलं आहे ! त्यातील प्रत्येक ओळीच अर्थ कळल्यावर तर ते गाणं अजूनच भिडतं.

जिज्ञासा, धन्यवाद !!

केदार, नंदिनी, मला पण Happy
आज ह्या सिझनचा शेवटचा भाग येणार आहे. नूरी चं अजून एक गाणं आहे त्यात.

पार चना देच्या शेवटच्या गिटारी कलाकाराने पार मूडची वाट लावली आहे . नुसताच किंचाळल्यासारखा वाटतो

गुलपनार च्या मन अमदयम या पर्शियन गाण्यात सुरुवातीला प्रिल्यूड मधे फार सुंदर रबाब वादन आहे. गुगुश या पर्शियन गायिकेने गायलेल मूळ जुन गाणं पण छान आहे. ते पर्शियन / अफगाण "वोSSय वोSSय " ने मजा आली आहे.

राहत आणि अमजद साबरींनी सादर केलेले रंग खुप मस्त आहे. दूर्दैवाने अमजद साबरींनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गाणे होते ते. फारच वाईट वाटते असं ऐकून की इतकं चांगलं गाणं आणि अजून काही गायची संधी न मिळता आपल्याला सोडून गेले Sad

https://www.youtube.com/watch?v=Uks8psEpmB4

कदाचित म्हणूनच हे कोक स्टुडिओचं सर्वात लोकप्रिय गाणं (२७ कोटीच्या पुढे हिट्स) आहे.
>> जिज्ञासा ते २७ कोटी नाही २७ मिलियन्स आहे २.७ कोटी. अर्थात त्या गाण्याची गुणवत्ता अफाटच आहे.

सिझन 10 सुरू झाला लोक हो.

पहिला एपिसोड आलाय.

मला तरी अली सेठीचे रंजीश ही सही सोडून बाकी गाणी परत ऐकावीशी वाटली.

"रंजीश ही सही" मेहेदी हसन सोडून कोणाचं परत ऐकावेसे वाटत नाही. अली सेठीचे तर पहिल्या दोन मिनिटातच बंद केले.

सेठीचे रटाळच आहे. एखाद्या पर्वताला हात घालताना थोडा तरी विचार करतात की नाही हे लोक? यापेक्षा पूजा गायतोंडेचे कितीतरी पट चांगले आहे.

मला उलट सेठीचे व्हर्जन खूप आवडले. मोमीना व दान्याल सुरवातीला काय करताहेत वाटलेले पण पुढे आवडले.

पाकिस्तानचे राष्ट्रगीत सोडून जी गाणी 10व्या भागात आजवर आलीत ती सगळी आवडली. राष्ट्रगीत सुद्धा एक गाणे म्हणून आवडले पण राष्ट्रगीत इतक्या सुतकी चेहऱ्याने व शब्दही नीट ऐकू न यावेत असे का गायले गेले कळले नाही. असो, यावर पुढे चर्चा इथे नको.

दमादम मस्त कलंदर हे आजवर इतक्या वेळा इतक्या जणांच्या तोंडून ऐकलंय, कोक स्टुडिओ मध्येच आजवर दोन तीनदा सादर झालेय बहुतेक, की आता उमेर त्यात काय नवे करणार याची उत्सुकता वाटतेय. रॉक स्टाईल मध्ये हे गाणे ऐकायला जाम आवडेल मला. उमेर तसाही माझा फेवरीट आहेच ......

>>"रंजीश ही सही" मेहेदी हसन सोडून कोणाचं परत ऐकावेसे वाटत नाही.<<
ती गझलच इतकि श्रवणीय आहे कि मला ती अगदि प्रशांत दामलेने गायलेली (नॉट दॅट हि इज अ बॅड सिंगर) हि आवडते... Happy

मीपन फॅन..
'अँग्री इंडीयन गॉडेसेस' या पिच्चरच्या सुरुवातीला भवरीदेवी आणि रॅपर हार्ड कौरने म्हटलेलं ''सावरियों घाट मै रे, रमैय्यो घाट मै'' या गाण्यामुळे खरी ओळख झाली..यानंतर तूनळी वर शोधून शोधून गाणी ऐकली.. मस्तम मस्त आहेत.. हि सर्व गाणी आता ऑडीयो फॉरमॅट मधे हवी आहे मला.. बघु..

@rराज, मला उलट अनुभव येतो. मेहेंदी हसन साहेबांची गझल डोक्यात इतकी इंप्रिंटेड आहे की दुसऱ्या कुणाच्या आवाजात ती पोचत नाही. यात दोष माझा आहे ना की गायकाचा.

पूजा गायतोंडे या गायिकेची ओळख झाली या निमित्ताने. धन्यवाद.

>>दुसऱ्या कुणाच्या आवाजात ती पोचत नाही. यात दोष माझा आहे ना की गायकाचा.<<

इट कुड बी जस्ट मी. मला "याद पिया कि..." या ठुमरीचं वर्शन अगदी बडे घुलाम अलि खान पासुन शोभा गुर्टु, राशिद खान, हरिहरन ते कौशिकी चक्रबर्ती सगळ्यांचं आवडते.

पण माझं काहिसं असंच फक्त लताबाईंच्या अजरामर हिंदी/मराठी गाण्यांबाबत होतं. टिवी, यु ट्युबवर कोणिहि कितीहि सुरात त्यांची गाणी गायलेली पाहिली/ऐकली तरी ती हृदयाला भिडत नाहित आणि मग उतारा म्हणुन मी लताबाईंची ओरिजनल गाणी हटकुन ऐकतो... Happy

मेहेंदी हसन साहेबांची गझल डोक्यात इतकी इंप्रिंटेड आहे की दुसऱ्या कुणाच्या आवाजात ती पोचत नाही. >>>>+1

मेहेदी हसन साहेबांनी ती ज्या लेव्हल ला नेऊन ठेवली आहे तिथे पोचणे खूप अवघड आहे. मी युट्युब वर असलेल्या सर्व गायकांनी गायलेली ऐकली आहे पण मेहेदी हसनना तोड नाही.
कोक स्टुडिओ/ अली सेठी तर पूर्णपण ऐकू शकलो नाही.

टवणे सर, पूजा गाय्तोंडे एक दिवस भारताची टॉप सूफी आणि गझल सिंगर होणार आहे यात शंका नाही. झी २४ तासने तिची एका दिवाळीला घेतलेली मुलाखत इथे आहे. त्यावरून तिच्या चतुरस्त्रतेची कल्पना यावी....

https://www.youtube.com/watch?v=oI7bLS1r8_4&t=2940s

Pages