साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
आतापर्यंतच्या सर्व सिझन्समध्ये मिळून अनेक कलावंतांनी खूप सारी अविस्मरणीय गाणी रेकॉर्ड केली आहेत. ह्या सर्व गाण्यांचे संगीत संयोजन अप्रतिम असते. आजच्या कृत्रिम संगीताच्या जमान्यात गायकांनी प्रत्यक्ष वाद्यवृन्दाबरोबर (acoustic) एका टेकमध्ये रेकॉर्ड केलेले गाणे पाहणे आणि ऐकणे हा एक छान दृक्श्राव्य अनुभव आहे जो कोक स्टुडिओच्या सगळ्या गाण्यांमधून आपल्याला मिळतो.
मला वाटते ही एवढी प्रस्तावना आणि ओळख पुरेशी आहे. जर तुम्ही कोक स्टुडिओ पाकिस्तान विषयी पहिल्यांदा वाचत असाल तर खाली दिलेल्या दुव्यांवर जाऊन गाण्यांचा आनंद घ्या (त्याआधी captions/subtitles on करायला विसरू नका)! आणि हो, अजून एक, कदाचित पहिल्या फटक्यात एखादे गाणे आवडणार नाही. पण एकदा ऐकून गाणं नावडत्या यादीत टाकण्याची घाई करू नका. मला बरीच गाणी दोनदा किंवा तिसऱ्यांदा ऐकून आवडायला लागली आहेत.
मायबोलीवरचे अनेक रसिक सभासद आधीपासून कोक स्टुडिओच्या गाण्यांचे चाहते आहेत हे मला माहिती आहे! तर ह्या धाग्यावर आपल्या आवडत्या कोक स्टुडीओ (पाकिस्तान)च्या गाण्यांविषयी भरभरून लिहा! मी ही लिहीतेच आहे
काही दुवे:
१. कोक स्टुडिओ संकेतस्थळ: http://www.cokestudio.com.pk/season9/
२. कोक स्टुडिओ युट्युब चॅनेल (सिझन ७ ते ९): https://www.youtube.com/user/CokeStudioPk
३. रोहेल हयात युट्युब चॅनेल (सिझन १ ते ६): https://www.youtube.com/channel/UCuszQnomLWV-r6-6tU_7_aA
४. कोक स्टुडिओ विकी: https://en.wikipedia.org/wiki/Coke_Studio_(Pakistan)
ह्या वीकेंडला निवांत वेळ झाला
ह्या वीकेंडला निवांत वेळ झाला यंदाच्या सिझनचे एपिसोड्स पाहायला. पहिल्या दोन एपिसोड्स मधल्या काही गाण्यांनी थोडी निराशा केली
रंजिश ही सही - अली सेठी खूप आवडता गायक असला तरी मेहदी हसन यांची गझल इतकी कानात आहे की ती नाही भावली. रंजिश ही असे दोन शब्द तोडून म्हटल्याचे ही खटकले. असो. Each one to his own.
संयोनी - हे पण नाही आवडले. राहत फतेह अली खान यांचा आवाज ह्या गाण्यात आजीबात चांगला वाटला नाही. शिवाय हे गाणं देखील जुनून चं मनात रुतून बसलेलं गाणं आहे (अगदी त्याच्या picturization सकट!).
आता आवडलेल्या गाण्यांबद्दल! छा रही काली घटा, फासले आणि तिनक धिन ही तिन्ही गाणी आवडली!
आता खूप आवडलेल्या गाण्यांबद्दल!
QB चं लाल मेरी पत - अ प्र ति म!! मला वाटतं की रंजिश ही सही, संयोनी आणि लाल मेरी ह्या तिन्ही मध्ये एकच risk होती - ही सगळी गाणी प्रचंड गाजलेली गाणी आहेत. असंच गेल्या सीझनमध्ये आफरीन आफरीन होतं. ते गाजलं कारण ते मूळ गाण्यापेक्षा वेगळं झालं होतं. या वेळेचं तसं गाणं लाल मेरी पत आहे! QB ने कमाल केली आहे आणि तेवढीच कमाल आहे संयोजनाची, वादकांची आणि इतर कलाकारांची!कानात earphones घाला आणि हे गाणं ऐका - अंगावर काटे येतात की नाही बघा!
मुझसे पेहली सी मुहोब्बत - आता मी वरच्या परिच्छेदात जे म्हटलं तेच ह्या गाण्याच्या बाबतीत म्हणता येईल! फैझ एहमद फैझ यांचे शब्द, मल्लिका-ए- तरन्नुम मॅडम नूर जहाँ यांचा आवाज असलेली ही नज्म. अत्यंत गहिरा अर्थ असलेली. ही रचना निभावणं सोपं नव्हतंच. पण हे जमलंय हुमेरा चना आणि नबील शौकत आणि संगीत दिग्दर्शक मिकाल हसन यांना. ह्या गाण्याचं संगीत संयोजन अप्रतिम झालं आहे.
मी आवडत्या गाण्याचे BTS नक्की ऐकते. ह्या दोन्ही गाण्यांचे BTS ऐकल्यावर गाणी अधिकच आवडायला लागली आहेत!
आता पुढील भागांत अजून काय छान छान ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता वाढली आहे
बी टी एस म्हणजे बिहाईंड द
बी टी एस म्हणजे बिहाईंड द सीन्स का?
हो.. BTS (behind the scenes)
हो.. BTS (behind the scenes) एक दिवस नंतर प्रसिद्ध करतात.
कोक स्टुडिओचा बारावा सिझन
कोक स्टुडिओचा बारावा सिझन लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या काही सिझन्सचा निर्माता रोहेल हयात हा पुन्हा एकदा निर्माता म्हणून आहे.
हा प्रोमो: https://youtu.be/w0_fu3VcUl4
भन्नाट धागा.
भन्नाट धागा.
मुळ ऐकतानाचा तंद्री लागते. त्यालाच जपावं वाटतं. नविन प्रयोग आहेत कोकवर म्हणून आवर्जून गेलो पण गम्मत नाही. पण ऐकतो.
That's great news... मागचे
That's great news... मागचे ओळीने चारही सिजन्स मला फ्लॉप वाटले.. आता परत आशा वाटतेय. पण गायक सगळे तेच ते दिसताहेत.
कोक स्टुडिओचा नवा, चौदावा
कोक स्टुडिओचा नवा, चौदावा सिझन सुरु झाला आहे. पहिले गाणे काल रिलीज झाले
तू झूम - नसीबो लाल आणि अबीदा परवीन
मस्त आहे.. रात्री मजा येईल
मस्त आहे.. रात्री मजा येईल अजून .. रिपीट मोडवर
वाह .. मस्त मस्त ...तू झूम...
वाह .. मस्त मस्त ...तू झूम...
धन्यवाद जिज्ञासा ..
दुसरे गाणे रिलिज झाले आहे
दुसरे गाणे रिलिज झाले आहे
पसूरी गाण्याबद्दल कुणीच काही
पसूरी गाण्याबद्दल कुणीच काही लिहिले नाही?
Pasuri....
Pasuri....
हे गाणं, चित्रीकरण आणि याचे लिरिक्स, दोघेही अतिशय अप्रतिम आहेत. काळजात आरपार ठाव घेणारं...
स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे... आजच लिहीन बहुतेक!
लिहाच.. मी कित्येक वेळा रिपिट
लिहाच.. मी कित्येक वेळा रिपिट मोडवर ऐकत बसते
वाह लिंकांवर जाते आज. मी कोक
वाह लिंकांवर जाते आज. मी कोक स्टुडिओचे एकही गाणे ऐकलेले नाही ऐकले आहे बरेच त्याबद्दल.
पसुरी फार फेमस झाले आहे.
पसुरी फार फेमस झाले आहे. न्युज लाँड्रीच्या ऑफुल ऑसम पॉड कास्ट मध्ये थोडे ऐकले आहे.
ह्यांचे बिस्मिल्ला पण सुरेख आहे. कैलाश खेर व इतर गायक आहेत. फारच जबरदस्त आहे. ताल धरलाच जातो.
कित्येक वेळा रिपिट मोडवर ऐकत
कित्येक वेळा रिपिट मोडवर ऐकत बसते>>+१
PASOORI फारच छान जमलंय.
PASOORI फारच छान जमलंय.
मला या सिझन मधली Kana yaari, pasoori ही दोन गाणी भयानक आवडली आहेत. मस्त आहेत.
आमच्याकडेही हे पासूरी लागते
आमच्याकडेही हे पासूरी लागते अध्येमध्ये. पाठही झालेय घरच्यांचे.
पण मला मात्र हे अजून अपील झाले नाही. कानावर पडते घरच्यांमुळे. पण मुद्दाम कधी मी आजवर लावले नाही.
आता चर्चा वाचून पुन्हा एकदा पहिल्यापासून ऐकूया म्हटले, पण सोडले मध्येच, आणि आतिफचे Tajdar-e-Haram ऐकून आलो ..
आपके दर से न कोई खाली गया,
अपने दामन को भर के सवाली गया
धाग्यावर याची लिंक अजून आली नसल्यास... ईथे
https://www.youtube.com/watch?v=a18py61_F_w
काय वेरीएशन्न्स आहेत पुर्ण गाण्यात .. माहौल बनतोच
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=llLeQkPLwNk
कोक स्टुडिओ नाही पण नुसरत च्या कव्वाली चे रेन्डिशन आहे.
येस्स पसुरीबद्दलच लिहायला आले
येस्स पसुरीबद्दलच लिहायला आले... रोज ऐकलं म्हणजे ऐकलंच जातं.
कितीही वेळा ऐकू शकतेय.
"तू झूम" अप्रतिम जमले आहे. पण
"तू झूम" अप्रतिम जमले आहे. पण त्याचे चित्रीकरण अजिबातच आवडले नाही. अर्थात हे गाणे मी आधी एका पाकिस्तानी नटीच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला लावलेले पाहिले. त्याच्यापुढे मूळ चित्रीकरण अगदी फिके पडले.
"पसूरी" ने वेड लावले आहे सगळ्यांनाच. मलाही आवडले. पण शब्द लक्षात राहत नाहीयेत. आणि याचेही चित्रीकरण आवडले नाही.
काय आहे पसूरी?
काय आहे पसूरी?
मी पाहीले कोक स्टुडिओ वर जाऊन..पण मला समजले नाही!
पसूरी फार काही आवडलं नाही.
पसूरी फार काही आवडलं नाही.
याचेही चित्रीकरण आवडले नाही.>
याचेही चित्रीकरण आवडले नाही.>> ++१११ कोणाला लिंक देताना मि लिरिक्सचीच देते
अली सेठीचे गुलोमे रंग सुद्धा
अली सेठीचे गुलोमे रंग सुद्धा आवडले मला.
पिच्छे हठ या सिझनचे मिस मार्वल च्या दुसर्या एपिसोड च्या एंडिंगला आहे. एकदम वेगळेच आहे.
अली सेठी सुन्दर गातो.. नवा
अली सेठी सुन्दर गातो.. नवा सि़झन सुरु झाला माहित नव्हते,
परवा पसुरी यु ट्युब्वर दिसले, पाहिले आणि खुप आवडले.
ते ऐकताना कुठल्यातरी गाण्याची आठवण येतेय पण अजुन पकडीत येत नाहिये. पण तरीही पसुरी आवडलेय आणि बघायला पण आवडलेय.
<<परवा पसुरी यु ट्युब्वर
<<परवा पसुरी यु ट्युब्वर दिसले, पाहिले आणि खुप आवडले
ते ऐकताना कुठल्यातरी गाण्याची आठवण येतेय पण अजुन पकडीत येत नाहिये.>>>
मला mayya mayya गाण्याची झलक वाटते जरा जरा...
या सिझनचं (१५ वा) ऐकलेलं मी
या सिझनचं (१५ वा) ऐकलेलं मी पहिलं गाणं - तुरी जांदी
ऐका आणि मुख्य म्हणजे पहा! कसं काय जमतं हे? कमाल आहे!
१५ व्या सिझनचं ब्लॉकबस्टर
१५ व्या सिझनचं ब्लॉकबस्टर इन्स्टामुळे समजले आणि आता आवडू लागलय.
Pages