ऐका!
काल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.
काल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.
कॉलेज मध्ये असताना इकॉनॉमिक्स मध्ये कधीतरी अमेरिकन मंदी बद्दल वाचले होते. पुढे जागतीक अर्थव्यवस्था समजावून घेताना अमेरिकन मंदीचा वारंवार उल्लेख व्हायचा आणि त्याबद्दल वाचले जायचे. पण ते होते भरभरून बेरोजगारी आणि आकडेवारी असलेले. पण त्यात काही तरी नव्हते. जे मला ग्रेप्स ऑफ रॅथ नावाच्या पुस्तकाने दिले. "ऑफ माईस अॅन्ड मेन" वाचल्यावर मला जॉन स्टाईनबेक आवडायला लागला. कॅनरी रो वाचल्यावर तर मी त्याच्या लिखानाच्या प्रेमातच पडलो. त्याचे ग्रेप्स ऑफ रॅथ पुस्तक वाचायचे वाचायचे असे म्हणून गेले कित्येक वर्षे राहून गेले.
संतकृपादीपक
नित्य समाधान | संतांची संपत्ती | स्वस्थ चित्त वृत्ती | सर्व काळ ||
अहर्निश वृत्ती | वसे भगवंती | कसलीच खंती | उरेचिना ||
वैराग्य विवेक | बाणतो नेमक | सहजचि एक | योग घडे ||
असोनी संसारी | विरक्त अंतरी | नित्य सदाचारी | धन्य जगी ||
संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||
शांति लाभतसे | भाविका अपूर्व | वासना त्या सर्व | नष्ट होती ||
प्रेम जडतसे | सहज साधनी | अलिप्त राहूनी | करी कर्मे ||
उद्धरुन ऐसे | जाताच साधक | विशेष हरिख | संता वाटे ||
संतकृपा ऐशी | भाग्याने लाभता | येतसे पूर्तता | जीवनाते ||
कळी, भात, वांग्याची आमटी, आन चपाती पत्रावळीवर आल्यावर बब्यानं जेवायला सुरु केलं. आण्या मात्र कोशिंबीरीची वाट बघत खाऊ का गिळू अवस्थेत ताटकळला होता. रामाला हाकावर हाका मारुन कोशिंबीर त्यानं त्याच्या पंगतीत फिरवायची व्यवस्था केली. चार पळ्या कोशिंबीर त्याच्या पत्रावळीत पडली तवा त्याच्या जिवात जीव आला. तरी अजून पापड्या यायच्या बाकी होत्या. मग गर्दीत हरवलेल्या पापडीवाल्याच्या शोधात त्यांच्यावर बारीक नजर ठेवतच आण्यानं जेवन झोडायला सुरुवात केली.
सण म्हणजे तरी काय? सण म्हणजे तरी काय हो? हौस पुरवायचे दिवस , मुलांचे आणि आपलेही. हौस तरी कशाची? गाण्याची , नाचण्याची , खाण्याची, आपली कला लोकांसमोर करण्याची आणि हे सर्व करताना हसत खेळत आनंदाचे चार क्षण गोळा करण्याची. गेल्या काही वर्षांपासून शहरांमधून 'सोसायटी संस्कृती' तयार होत आहे. प्रत्यके सोसायटीच्या स्वत:च्या कल्पना, त्यांना साथ देणारे लोक आणि विविध कार्यक्रम पार पाडण्याची हौस यातून अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. सण-समारंभ पार पाडण्याचा उत्साह तर प्रचंड. आमची सोसायटीही अशीच अत्यंत हौशी आहेच पण त्यासोबत सामाजिक जाणीवही वेगवेगळ्या प्रसंगातून, कार्यक्रमातून सर्वांनी दाखवलेली आहे.
Bhartiy sanskruti hi jagamadhe saglyat Mahan samzli janari sanskruti aahe.karan jagatil sglech desh aaj bhartakade aashene pahtayet te fakt ethlya udyojkanmule nhwe tar bartat tikun aslelya Sanskrutimulch. Malatar abhiman vatto ki mi bhartasarkhya Mahan ashya sanskruti aslelya deshat janmala aale tyacha......pan tyach kshani kuthetari 1 prakarchi wyatha manamdhe nirman hote...ki ya ashya Mahan deshat kahi goshti matr mala khatkun aani mnala bhedun jatat....
थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...
आज महाशिवरात्र!!
आमच्या गावी अगस्ती ऋषींचा आश्रम आहे प्रवरतीरी. इथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. अकोले, संगमनेर, सिन्नर आदी भागातून मोठया संख्येने लोक यात्रेला येतात अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या भागात कित्येक वर्षांपासून हि यात्रा भरते. ह्या निमित्त विविध खेळ, किर्तन, लोकनाट्ये, कुस्त्यांचे फड, खाद्य पदार्थाचे स्टॉल, आदींची रेलचेल महाशिवरात्र म्हणजे संपूर्ण दिवस भर पहाटे पासून संध्याकाळ होईल पर्यंत धमाल असायची.. अत्यंत निसर्गरम्य दाट वनराईत दडलेल्या त्या शांत निवांत परिसरात ह्या यात्रेच्या दिवशी धमाल असायची.
तशी यात्रा रात्री उशिरा पर्यन्त सुरु असते..