तू माझी माऊली .....
हे ज्ञानदेवा, हे ज्ञानराजा,
तुमचे -माझे नाते तरी काय आहे बरे नेमके ? का तुमच्या नावाने, आठवाने ह्रदयात कालवते, डोळ्यात आसवं दाटून येतात ? एक मराठी भाषिक म्हणून ? का तुमच्या ज्ञानदेवीने वेड लावलेला कोणी एक सामान्य रसिक म्हणून ? का तुमच्या तत्वज्ञानाची भूल पडलेला कोणी एक अभ्यासक म्हणून ? का अजून काही ??
तुम्ही खरे तर योगीयांचे योगी, ज्ञानीयांचे देव, प्रत्यक्ष श्रीविष्णूंचा अवतार...
देवाच्या नावाखाली
देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात
माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात
चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
नमस्कार!!
आपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी!!
सहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १
लागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणार?कोणत्या ठिकाणाहून निघणार?कोणत्या वेळी निघणार?कोणत्या वाहनाने निघणार?'कोण' निघणार? त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.
तुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:
तारीख १ ते २५:
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
लवकरच येत आहे… माझी पी. एच. डी. - उवा आणि मानवी उत्क्रांती...
आमचे गाईड -आमचा न्हावी
पृथ्वीच्या पाठीवर न्हाव्याचा जेवढा संबंध डोक्याशी (दुसर्याच्या) येतो तेवढा क्वचितच कुणाचा येत असावा. असा डोकेबाज माणूस माझा गाईड असावा हा तर दुग्ध शर्करा योग. त्याच न्यायाने जी जमातच मुळात डोक्यावर राहते ती तर किती डोकेबाज असेल विचार करा.….
दिवाळी म्हणजे झगमगाट, चमचमाट. प्रत्येक घरात नवीन रंग, आकाशकंदील, लाइटची तोरणे ह्या बाह्य रोषणाई सोबत अंतर्गत सजावटीतही चमक आलेली असते. त्यात जास्त मेहनत केली जाते ती म्हणजे गृहीणीच्या लाडक्या स्वयंपाकघरावर. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकघरात भिंतीलाच फळी ठोकलेली असायची व फळीवर तांब्या-पितळेची भांडी हौशेने रचलेली असायची.ह्या तांब्या पितळेच्या भांड्यांवरून त्या घरच्या गरीबी वा श्रीमंतीचा दर्जा ठरला जायचा.
पण आता बदल हा काळाचा नियम असल्याने चिंच लावून तांब्या-पितळेची भांडी घासणे हे वेळखाऊ काम असल्याने तांब्या-पितळेची भांडी ९०% घरातील किचनमधून रिटायर्ड झाली आहेत.
भाऊबीज
ऊत्सव साजरे करताना
आनंद उतप्रोत असतो
प्रेम आणि आपुलकीचा
ऊत्सव हा एक स्रोत असतो
करायचे म्हणून करायचे
नको नुसतेच नावाला
भाऊबीज साजरे करण्या
बहिण जपावी भावाला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
ती आणि मी
केला निर्धार मनामध्ये
ठरवलं मी धीट व्हायचं
अंधाराचा फायदा घेऊन
आज तीला पेटवायचं
अंधारातही तेजस्वीनी
ती अस्सल जादूगरी आहे
आनंदाच्या उत्सवातील
ती सुरसुरती सुरसुरी आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
फराळचं
हि रूढी आणि परंपरांची
दिवाळी वाटते हवी हवी
गृहिणी कडे सगळ्यांचीच
मागणी असते नवी-नवी
लाडू चकली चिवड्यासह
खुसखुशीत पाहिजे अनारसं
शंकरपाळे अन् करंजीसह
नव-नविन पाहिजे फराळचं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
नमस्कार,
दिवाळीच्या शुभेच्छा.
सध्या मी कामानिमित्त अमेरिकेत आलो आहे. दरवर्षी घरी आईवडीलांबरोबर लक्ष्मीपूजन केल्याने सगळ्या गोष्टी आणून देण्याशिवाय पुजा मांडण्यात फार कधी लक्ष घातले नाही. सध्या त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आहे. तुम्ही लक्ष्मीपूजन कसे करता ते सांगाल का किंवा फोटो टाकाल का?