संस्कृती
अवधूत (भाग-१)
अवधूत (भाग-१)
शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका अगदीच क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास बारा वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून.
तडका - आमच्या अपेक्षा
तडका - आमच्या अपेक्षा
तडका - बैल दौड
कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!
दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!
मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!
त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"
तडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मी आदिशक्ती
नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर
सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??
नासदीय सूक्त-शब्दांतरिताचे श्रवण.(एक उत्कट अनुभव!)
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.
Pages
