नमस्कार मायबोलीकर, कसे आहेत सगळे?
मागील भागात मी स्टेशन वरचा किस्सा सांगितला होता, या भागात मी काही गमतीदार निरीक्षणं मांडणार आहे. मला खात्री आहे, तुम्ही जेव्हा कधी रस्त्याने प्रवास कराल तेव्हा अशी निरीक्षणं करून स्ट्रेस फ्री व्हाल, आणि हसाल.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.
आम्ही जून मध्ये San Antonio, Texas ला मूव होत आहेत- तिथल्या School District विषयी माहिती हवी आहे. सध्या मूले
Calgary इथे Charter School मध्ये सहावी व तिसरी मघ्ये आहेत. त्यांच्या बाबान्चे office N.W. quadrant मघ्ये आहे. तर कृपया तिथल्या शाळा व community बदल माहिती दयावी. शाळेचा preference Charter School आहे पण चांगली Public School पण चालेल. Charter School ला bussing आहे का? Please Confirm. धन्यवाद
प्रवास वर्णन लिहिण्यात एक वेगळीच गम्मत असते ती म्हणजे पुन्हा एकदा नकळत का होईना आपण तो प्रवास करतो. अगदी लहान लहान गोष्टी सुद्धा कागदावर येतात. सगळं काही आठवायला लागत. आठवायची गरज पण भासत नाही कारण माणसाला आठवण तेव्हा येते जेव्हा तो विसरतो. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला आपण तो प्रवास करवत असतो. आणि जेव्हा ऐकणारी माणसं संपतात, तेव्हा आपोआपच सांगणारा पेन आणि वही जवळ करतो. जसं आता मी केलय. रत्नागिरी चा प्रवास थोडक्यात.
दिवाळी आली होती. दिवाळीसाठी कोल्हापूरला जायचे नक्की झाले होते. नेहमीप्रमाणे जाण्या-येण्यासाठी लोहरथाच्या पर्यायाला पहिली पसंती दिली होतीच. त्याप्रमाणे आरक्षण मिळवायचा प्रय.त्न करून पाहिला. पुण्य़ाहून कोल्हापूरला जाण्यासाठी हल्ली लोहरथाला अनेकांची पसंती मिळत आहे. पूर्वी या प्रवासाला महामार्गापेक्षा बराच वेळ लागतो, या कारणाने अनेक जण या पर्यायाकडे तशी पाठच फिरवत असत. म्हणून कोयनेचे तर कधीही आरक्षण मिळत असे. सह्याद्री त्यातल्या भरत असे. पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे मला 3 आठवडे आधीही कोयनेचे आरक्षण मिळू शकले नाही.
परवा सहज तिला फोन केला.. येतोय पुण्यात कामानिमित्त. त्यावेळी नेमका तिचा एम.पी.एस.सी.चा पेपर होता.. आणि नंबर आला होता भोरला..
ती तिच्या बाबांना बोलावणार होती पेपरला जायला.. मोकळा असल्यामुळं मी म्हणलं "कशाला बाबांना एवढ्या लांब बोलावतीयेस. जाऊ ना आपण.. असही रविवारच आहे."
आता एवढ्या आत्मविश्वासाने मी पुढाकार घ्यायचं कारण म्हणजे मला वाटलं असं किती लांब असेल भोर.. २५-३०किमी.. अन एखादा पेपर ३ तासांचा.. आणि रमतगमत परत पुणे. पण आदल्या दिवशी कळलं की अंतर ५५किमी आहे, २ पेपर आहेत आणि वेळ १०.३०-५..
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (अॅटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत?
याच्या कारणाबद्दल काही गैरसमजुती आहेत. हवामानामुळे असेल, धोकादायक भाग टाळण्यासाठी असेल वगैरे.
प्रत्यक्षात कारण वेगळं आहे. जमलं तर तुम्हाला समजावतो.
मथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता.