पुणे कोल्हापूर पॅसेंजरचा प्रवास (भाग १)
दिवाळी आली होती. दिवाळीसाठी कोल्हापूरला जायचे नक्की झाले होते. नेहमीप्रमाणे जाण्या-येण्यासाठी लोहरथाच्या पर्यायाला पहिली पसंती दिली होतीच. त्याप्रमाणे आरक्षण मिळवायचा प्रय.त्न करून पाहिला. पुण्य़ाहून कोल्हापूरला जाण्यासाठी हल्ली लोहरथाला अनेकांची पसंती मिळत आहे. पूर्वी या प्रवासाला महामार्गापेक्षा बराच वेळ लागतो, या कारणाने अनेक जण या पर्यायाकडे तशी पाठच फिरवत असत. म्हणून कोयनेचे तर कधीही आरक्षण मिळत असे. सह्याद्री त्यातल्या भरत असे. पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे मला 3 आठवडे आधीही कोयनेचे आरक्षण मिळू शकले नाही.