एक रम्य दिवस
माणसाचं आयुष्य
घड्याळाच्या काट्यांवर चालणारं
कितीही नाही म्हटलं
तरी लोकल च्या मागे धावणारं
वेळेची किंमत
याला चांगलीच माहिती असते
उशीर कितीही झाला
तरी नेहमीची लोकल मात्र चुकवायची नसते
असं हे जगणं
प्रत्येकाच्या नशिबी येतं
आयुष्य खूप सुंदर आहे
असा संदेश तेच देऊन जातं
ठेवून लक्षात हा संदेश
तो शोधायला जातो काहीतरी
वाटत असणार ना त्याला पण
थोडासा वेळ स्वतःला देऊया कधीतरी
एका सकाळी
जाताना सगळे कामाला
हा मात्र निघालेला असतो
स्वतःला नव्याने शोधायला
विचित्र वाटत
जेव्हा वेळेवरची लोकल पकडायची नसते
कारण त्या दिवशी वेळ सुद्धा
आपल्या सोबत चालत असते