माणसाचं आयुष्य
घड्याळाच्या काट्यांवर चालणारं
कितीही नाही म्हटलं
तरी लोकल च्या मागे धावणारं
वेळेची किंमत
याला चांगलीच माहिती असते
उशीर कितीही झाला
तरी नेहमीची लोकल मात्र चुकवायची नसते
असं हे जगणं
प्रत्येकाच्या नशिबी येतं
आयुष्य खूप सुंदर आहे
असा संदेश तेच देऊन जातं
ठेवून लक्षात हा संदेश
तो शोधायला जातो काहीतरी
वाटत असणार ना त्याला पण
थोडासा वेळ स्वतःला देऊया कधीतरी
एका सकाळी
जाताना सगळे कामाला
हा मात्र निघालेला असतो
स्वतःला नव्याने शोधायला
विचित्र वाटत
जेव्हा वेळेवरची लोकल पकडायची नसते
कारण त्या दिवशी वेळ सुद्धा
आपल्या सोबत चालत असते
निघून जातो
तो सर्वांपासून दूर
आज काही वेगळेच जुळलेले असतात
वेळेचे आणि त्याचे सूर
निसर्गाच्या सानिध्यात
अजून कोणाची हवी साथ
झाडं, झुडुपं, पक्षी
आणि हा नदी काठ
पक्ष्यांचे आवाज
कानाला गुदगुल्या करतात
हवेच्या हळुशार झुळकी
वातावरणात गारवा भरतात
अश्या वेळी
विसर पडतो सगळ्याचा
रोजच्या गराड्यातून
हा मिळालेला वेळ असतो आनंदाचा
सूर्य मावळतो
आता वेळ संपली सांगून
आज समजलं
वेळ कधी मिळत नसते मागून
मौल्यवान गोष्टी
मनाच्या एका कोपऱ्यात जपाव्यात
एका दिवसाच्या का होईनात
पण आयुष्यात अश्या आठवणी असाव्यात
प्रियांका कर्पे
priyankakarpe92@gmail.com
mast............
mast............