क्रीडा

डिसेंबर... रोमान्स...सवाई आणि बॉक्सिंग डे!

Submitted by जे.पी.मॉर्गन on 24 December, 2013 - 04:55

रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स!

मुंबई मॅरेथॉन

Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24

नमस्कार!

यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.

आणखी कोणी आहे का?

खास मुलांसाठीचे उपक्रम

Submitted by मी नताशा on 25 November, 2013 - 00:09

हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया

१० (टेन) लिस्ट

Submitted by योग on 17 November, 2013 - 06:09

१७ नोव्हेंबर २०१३.

१० (टेन) लिस्टः

'भारतरत्न' 'सर' सचिन यांच्या निवृत्ती भाषणास जेमेतेम २४ तास ऊलटलेत आणि एव्हाना सचिन साठी पुढील करियर क्षेत्रे ई. बद्दलचे अनाहूत सल्ल्ले येवू लागले आहेत. सचिन च्या भारतरत्नाचे क्रेडीट 'पृथ्वी' वरील शक्य त्या सर्व नाव, गाव ई. मधून भ्रमण करू देखिल लागले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ट्विट वटवटीस ऊधाण येईलच. 'सचिनेरीया' झालेल्या देशात एकही माध्यम आणि एकही कागद 'सचिन' नावाच्या शाईने ओला झाल्या खेरीज राहिला नसेल. हा सचिनोत्सव असाच चालू रहावा असे वाटत असतानाच मात्र खुद्द स्वतः सचिन च्या मनात आणि घरात आज काय भावना असतील याचे औत्सूक्य कायम आहे.

विषय: 

अश्रू अनावर झाले - सच्चीऽऽऽऽऽऽन सच्चीन

Submitted by बेफ़िकीर on 16 November, 2013 - 02:37

अश्रू अनावर झाले.

एक लांबलचक भाषण करून तो "थँक यू' म्हणाला आणि अश्रू अनावर झाले. मग त्याला उचलून सगळ्यांनी ग्राऊंडला फेरी मारली. रडवेले चेहरे त्याच्या नावाचा अविरत जयघोष करत होते. आत्ताच, या क्षणाला पांगापांग सुरू झाली असेल कारण याच क्षणाला सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रूममध्ये गेला आहे.

नकळत त्याच्या भाषणानंतर मनापासून टाळ्या वाजवल्या गेल्या आणि खुर्चीवरून उठून उभा राहिलो तोही नकळतच!

एका पर्वाची अखेर झाली.

तें . . .

Submitted by अंकुरादित्य on 15 November, 2013 - 12:00

समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे .

विषय: 
शब्दखुणा: 

सचिनची निवृत्ती आणि क्रिडारसिकांच्या प्रतिक्रिया

Submitted by पाषाणभेद on 10 November, 2013 - 16:59

दै. बातमीपत्र (बातमीपत्रच म्हणजे बातमीपत्र)

सचिनची निवृत्ती आणि क्रिडा रसिकांच्या प्रतिक्रिया

आमच्या वर्तमानपत्राकडे आलेल्या असंख्य प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया खाली देत आहोत.

गोपाळ सुंदर, अमरावती: सचिन म्हणजे क्रिकेटचा देव आहे. देव कधी रिटायर होतो का? लागू म्हणतात देवाला रिटायर करा.

पंकज मोरे, कारसुळ बु.: सचिनची निवृत्तीची बातमी ऐकून डोळ्यात पाणी आले. वडील म्हटले शेतावर जा अन कांद्याला पाणी दे. मी गेलो नाही, घरीच माळ्यावर रडत बसलो.

विषय: 

मातीचा किल्ला : भाग एक

Submitted by अंकुरादित्य on 31 October, 2013 - 00:45

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

आपले सणावार आणि क्रिकेट

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 14 October, 2013 - 03:23

काल द्सरा धुमडाक्यात साजरा होत असताना पुण्यात भारत विरुध्द आस्ट्रेलीया यांच्यात क्रिकेटचा सामना सुरु होता चिक्कार गर्दी होती स्टेडीयमवर घरी सुध्दा कित्येकाच्या घरी दूरर्दशनवर सामने पाहणारे कित्येक होते. येणार्‍या जाणार्‍याचे थोडक्यात स्वागत करुन पुन्हा मॅच मध्ये दंग होत होते. असे बर्‍याचदा आपल्या सणावाराला मॅचेस ठेवलेल्या असतात बरेच महाभाग सणावार विसरुन क्रिकेट पाहतात. एकवेळ क्रीकेटपटुंचे ठीक त्यांना पैसे मिळतात.परंतु नागरिकांनी तरी आपल्या सणावारांना यथोचित वेळ दिला पाहीजे. लक्ष्मीपुजन चालु असतानाही असेच अप्सरा आली किंवा अजय अतुल असे कार्यक्रम असतात. लोक सगळ सोडुन कार्यक्रमाला हजर .

Pages

Subscribe to RSS - क्रीडा