आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली.
१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं).
सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे.
१७ नोव्हेंबर २०१३.
१० (टेन) लिस्टः
'भारतरत्न' 'सर' सचिन यांच्या निवृत्ती भाषणास जेमेतेम २४ तास ऊलटलेत आणि एव्हाना सचिन साठी पुढील करियर क्षेत्रे ई. बद्दलचे अनाहूत सल्ल्ले येवू लागले आहेत. सचिन च्या भारतरत्नाचे क्रेडीट 'पृथ्वी' वरील शक्य त्या सर्व नाव, गाव ई. मधून भ्रमण करू देखिल लागले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ट्विट वटवटीस ऊधाण येईलच. 'सचिनेरीया' झालेल्या देशात एकही माध्यम आणि एकही कागद 'सचिन' नावाच्या शाईने ओला झाल्या खेरीज राहिला नसेल. हा सचिनोत्सव असाच चालू रहावा असे वाटत असतानाच मात्र खुद्द स्वतः सचिन च्या मनात आणि घरात आज काय भावना असतील याचे औत्सूक्य कायम आहे.
आवडला तर ठोका २०० लाईक... :p
उद्याच्या त्याच्या २०० व्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
वेस्ट इंडिज टीम मैदानावर (मला जसे आठवते तसे एक दोन अपवाद सोडले तर) आनंदी असते. खेळाची पुरेपूर मजा घेणारा हॅपी बंच असतो हा. वेस्ट इंडीज वी लव्ह यू !
सचिन च्या १०० व्या १०० साठी अन २०० व्या कसोटीसाठी वेस्ट इंडिज भारतात आले. दुदैव असे की १०० वे १०० तेंव्हा झाले नाही.
न्युझिलंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.
पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा
ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!