'लोकमान्य' सचिन तेंडुलकर
Submitted by आशयगुणे on 25 December, 2012 - 06:41
ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!