माझ्या कडे जी वर्षे उरली आहेत तो माझा बोनस आहे असे माझे प्रांजळ मत आहे म्हणूनच आजचा दिवस माझा अन आजवरचा सर्वात आनंदी दिवस आहे असे म्हणत मी सकाळी डोळे उघडतो. वीस एक मिनिटे स्तब्धता ऐकतो. चहा बनवतो व अर्धांगीबरोबर तो चहा घेतो . पुढची चाळीस एक मिनिटे फिरायला जातो अन फिरतांना वॉक पेक्षा जास्त म्हणजे सभोवतालचा परिसर, जो रोजच नवीन दिसतो, फुले नवी असतात, माणसे नवीन असतात, मुले शाळेला जाणारी अगदी ताज्या कळ्यांगत दिसतात, त्यांना पाहतो. लोकांना विश करतांना खूप आनंद होतो. मग परतीच्या वाटेवर, साधारण आठाच्या सुमारास गणपती बाप्पाचे दर्शन घेत परत येतो. बाप्पा रोज आशिर्वाद देतो.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्या मार्या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.
ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!