चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास
भारताच्या पहिल्या पॅरालिंपिक्समधील सुवर्णपदक विजेत्याची कहाणी
✪ ९ गोळ्या लागूनही आणि अर्ध शरीर लुळं पडूनही केलेला जिद्दीचा प्रवास
✪ १९५२ मध्ये खाशाबा जाधवांकडून मिळालेल्या प्रेरणेची १९७२ मध्ये सुवर्ण झळाळी
✪ सांगली जिल्ह्यातल्या मुरलीकांत पेटकरांची अविश्वसनीय झेप
✪ “मुझे उस हर एक के लिए लड़ना है जो चँपियन बनना चाहता है!”
✪ "पैर तो मछली को भी नही होते हैं!”
✪ अतिशय उत्तम पटकथा, मांडणी व चित्रण
✪ इतका मोठा पराक्रम परंतु लोक विसरून गेले
मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.
दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील?
जरा आपल्या स्मरणशक्तीवर जोर द्या! दृश्ये आठवा!
आणि दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील ते सुचवा.
उदा:
१. दंगलच्या निमित्ताने ....मुलगा व्हावा म्हणुन:
(जे उपाय दंगल चित्रपटात दाखवल्या गेले, त्यांचे वर्णन, तुमचे याबाबत काय विचार आहेत?
आणि खाली पोलः)
१. मला फक्त मुलगेच आहेत, मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरील पैकी कोणताच उपाय केला नाही.
२. मला फक्त मुलगेच आहेत मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरिल पैकी किमान एक तरी उपाय केला आहे.
३. मला अद्याप अपत्य नाही आणि माझा किंवा माझ्या जीवनसाथीचा.......
समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे .
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान.
"पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी.
"तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत"
" अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले?
"सौरव गांगुली. अजुन कोण?" त्रासिक उत्तर आले.