क्रीडा
क्रिकेट- एक गंभीर व्यसन
क्रिकेटला जेन्टलमन्स गेम असे म्हण्टले जाते. क्रिकेट सारख्या 'दे मार' खेळात जेन्टल काय आहे हे ज्याने 'जेन्टलमन्स गेम' म्हण्टले त्यालाच माहित.
वॉलीबॉल ...
'आऊट ऑफ द बॉक्स' - हर्षा भोगले
भारतीय क्रिकेटचा चेहरा आणि आवाज म्हणून जगन्मान्य असलेल्या हर्षा भोगलेनं पहिल्यांदा क्रिकेट सामन्यांचं धावतं समालोचन केलं, त्याला आता एकवीस वर्षं होतील. उणीपुरी पाच वर्षं हर्षानं रेडिओवर समालोचन केलं. मग भारतात उपग्रह वाहिन्यांनी पाय पसरायला सुरुवात केली, आणि ’भारतीय क्रिकेटचा चेहरा’ अशी नवी ओळख हर्षाला मिळाली. टीव्हीवरची त्याची समालोचनं गाजलीच, शिवाय ’हर्षा की खोज’ हा त्याचा कार्यक्रम, त्याचे प्रश्नमंजूषेचे कार्यक्रमही प्रेक्षकांनी उचलून धरले. क्रिकइन्फोनं २००८ साली त्याला ’सर्वोत्तम समालोचक’ हा किताब बहाल केला. त्यामुळे खेळाडू नसलेला हा क्रिकेटमधला तसं पाहिलं तर पहिला सेलिब्रिटी.
Go get 'em Tiger!
या वर्षीची (२०११) मास्टर्स त्याच्या हातुन थोडक्यात निसटली. सुरुवातीचे दोन दिवस लिडरबोर्ड वर नसताना, तिसर्या दिवशी त्याने मुसंडी मारली आणि लिडरबोर्डवरील पहिल्या पाचांचं धाबं दणाणलं. त्याच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्ड प्रमाणे, हा पहिल्या दोन दिवसात लिडरबोर्डवर असल्यास ती टुर्नामेंट आरामात खिश्यात टाकतो. (इथे मला सुनील गावस्करचं उदाहरण दिल्या शिवाय राहवत नाहि. एक जमाना होता कि गावस्कर साहेबांचे पन्नास बोर्डावर लागले म्हणजे त्यांची सेंचुरी झालीच असं समजायचं.) दुर्दैवाने चौथ्या दिवशी त्याचा पटर चालला नाहि आणि त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
अति
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
कॅलटेक बास्केटबॉल चमुचा अविस्मरणीय पराक्रम
कॅलटेक आज एका वेगळ्याच कारणाकरता न्यु यॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर आहे.
२५ वर्षांनी, आणि ३१० गेम्स नंतर कॅलटेकची बास्केटबॉल चमुने एखादी चँपीअनशीप नव्हे तर चक्क एक मॅच जिंकली आहे.
चला त्यांचे अभिनंदन करु या.
http://www.nytimes.com/2011/02/24/sports/ncaabasketball/24caltech.html?_...
या टीम वर एक डॉक्युमेंटरी सुद्धा निघाला आहे: क्वांटम हुफ्स.
जुन्या विश्वचषकाच्या आठवणी-१
भारताने यशाच्या जबड्यातून पराजय ’खेचून’ आणला त्याची ’चित्तरकथा’
पराजय समोर उभा असताना जोरदार लढा देऊन विजयश्री खेचून आणण्याच्या पराक्रमाचे इंग्रजीत "They clenched victory from the jaws of a sure defeat"! असे वर्णन केले जाते. पण भारताने या सामन्यात जणू Reverse swing चा प्रयोग केला. जयमाला घेऊन यश ठीक समोर उभे असताना भारताने यशाच्या जबड्यातून पराजयाला जणू ’खेचून’ आणले!