Go get 'em Tiger!

Submitted by राज on 29 July, 2011 - 21:06

या वर्षीची (२०११) मास्टर्स त्याच्या हातुन थोडक्यात निसटली. सुरुवातीचे दोन दिवस लिडरबोर्ड वर नसताना, तिसर्‍या दिवशी त्याने मुसंडी मारली आणि लिडरबोर्डवरील पहिल्या पाचांचं धाबं दणाणलं. त्याच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्ड प्रमाणे, हा पहिल्या दोन दिवसात लिडरबोर्डवर असल्यास ती टुर्नामेंट आरामात खिश्यात टाकतो. (इथे मला सुनील गावस्करचं उदाहरण दिल्या शिवाय राहवत नाहि. एक जमाना होता कि गावस्कर साहेबांचे पन्नास बोर्डावर लागले म्हणजे त्यांची सेंचुरी झालीच असं समजायचं.) दुर्दैवाने चौथ्या दिवशी त्याचा पटर चालला नाहि आणि त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्या वेळेस एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली कि जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार. परंतु मास्टर्सच्या तिसर्‍या दिवशी (१७ वं होल) झालेल्या गुडघा दुखीने डोकं वर काढलं आणि त्याला प्लेयर्स टुर्नामेंट मधुन माघार घ्यावी लागली.

त्यानंतरचे दोन मेजर्स मध्ये त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भाग घेतला नाहि. त्याच्या अनुपस्थित नेहमीच्या ऐकिवात नसलेल्यांनी युएस ओपन आणि ब्रिटीश ओपन या दोन मेजर्स जिंकल्या. गोल्फमध्ये "ती" मजा राहिली नव्हती, अर्थात टिव्ही रेटींग्ज हि घसरले. मला हि वाटत होतं कि तो ब्रिटीश ओपन तरी खेळेल पण प्रेस रिलिज मध्ये त्याने सांगितलं कि "संपुर्ण फिट असल्याशिवाय मी कुठल्याहि टुर्नामेंट्मध्ये उतरणार नाहि. प्रत्येक टुर्नामेंट मी जिंकण्यासाठीच खेळतो, फक्त हजेरी लावण्याकरता नाहि". हि जेत्यांची मनोवृत्ती आणि जोडीला अथक परिश्रम हेच त्याच्या यशाचं गमक असावं.

कालच बातमी आली कि पुढल्या आठवड्यात तो ब्रिजस्टोन इन्व्हिटेशनल खेळणार आहे. खुप बरं वाटलं. त्याच बरोबर तो यावर्षाची शेवटची मेजर (पीजीए चँपीयनशिप) खेळणार कि नाहि, या शंकेने धडधड वाढली. कारणहि तसंच होतं, या वेळेस पीजीए चँपीयनशिप आमच्या गावांत आहे. याच कोर्सवर, हीच टुर्नामेंट २००१ साली झाली होती. टायगरला प्रत्यक्षात त्यावेळेस प्रथम पाहिलं. नंतरच्या दहा वर्षात पुलाखालुन बरंच पाणी निघुन गेलं, परंतु टायगरची एक असामान्य गोल्फर म्हणुन झालेली प्रतिमा तशीच आहे. २०११ हे वर्ष दुखापतींमुळे टायगरला चांगलं गेलं नाहि, बट द टाइम इज ऑन हिज साइड. अजुन तो त्याच्या पस्तीशीत आहे; दुखापतींनी त्रास दिला नाहि तर त्याचे गोल्फ रेकॉर्डस मोडणे हे भविष्यात अशक्यप्राय होईल. त्याच्या पुनरागमनाने गोल्फ इंडस्ट्रीला नक्किच पुनर्जीवन मिळेल. गेल्या १०-१२ वर्षांसारखे, किंवा त्याहुनहि अकल्पीत, गोल्फच्या मैदानात त्याने केलेले चमत्कार बघावयास मिळावे हिच ईच्छा.

गो गेट देम टायगर!

http://sports.yahoo.com/golf/pga/news?slug=ap-pga-woods
http://web.tigerwoods.com/index

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हजारों ख्वाइशें ऐसी कि हर ख्वाइश पे दम निकले,
बहोत निकले मेरे अर्मान लेकिन फिर भी कम निकले
निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकिन,
बडे बेआब्रु होकर तेरे कुचे से हम निकले...

वैसेभी बेअब्रू तो जो उनके फॅन नही, उन्ही लोगोंमे समझी जाती है. जो फॅन है वो उनकी बेअब्रू नही मानते. तो रोना क्यूं?

'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका कामहि कहना'
'तू कौन है तेरा नाम हि क्या, सीताभी यहाँ बदनाम हुई!'
तो लगे रहो!! Go get 'em Tiger!

राज.. ऑगस्टाला जाणार आहेस ? अ‍ॅटलांटा पासुन जास्त लांब नाही.. Happy

टायगरला ऑगस्टाला.. र्र्होडेडेंड्रॉन व अझेलियाच्या अप्रतिम बॅग्राउंडवर खेळताना व ग्रिन जॅकेट घालताना बघायला मिळावे हे माझे एक अपुर्ण स्वप्न आहे.. ४ वर्षांनी ओल्ड टाइम टायगरने पुनर्जन्म घेतला आहे... या वर्षी आलो तिथे तर तिकिट मिळण्याचे चांसेस काय आहेत फायनल राउंड विकेंड्साठी?

मुकुंद, नाहिरे या वर्षी नाहि. तिकिटं उपलब्ध आहेत पण बर्‍यापैकी महाग आहेत.

परत एकदा, दोन वर्षांनी म्हणावसं वाटतंय - गो गेट देम टायगर!