गोल्फ

Go get 'em Tiger!

Submitted by राज on 29 July, 2011 - 21:06

या वर्षीची (२०११) मास्टर्स त्याच्या हातुन थोडक्यात निसटली. सुरुवातीचे दोन दिवस लिडरबोर्ड वर नसताना, तिसर्‍या दिवशी त्याने मुसंडी मारली आणि लिडरबोर्डवरील पहिल्या पाचांचं धाबं दणाणलं. त्याच्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्ड प्रमाणे, हा पहिल्या दोन दिवसात लिडरबोर्डवर असल्यास ती टुर्नामेंट आरामात खिश्यात टाकतो. (इथे मला सुनील गावस्करचं उदाहरण दिल्या शिवाय राहवत नाहि. एक जमाना होता कि गावस्कर साहेबांचे पन्नास बोर्डावर लागले म्हणजे त्यांची सेंचुरी झालीच असं समजायचं.) दुर्दैवाने चौथ्या दिवशी त्याचा पटर चालला नाहि आणि त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

विषय: 
Subscribe to RSS - गोल्फ