मुंबई मॅरेथॉन

Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24

नमस्कार!

यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.

आणखी कोणी आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना, इथे अधिक माहिती मिळेल http://www.procamrunning.in/scmm/FAQS-REGISTRATION#MyAnchor

थोडक्यात (लिंकवरून कॉपी-पेस्ट) -
Your entry to the marathon / half marathon race category will be confirmed based on the criteria given below.

I] A Timed Runner
- You must have participated in an AIMS ratified/recognised distance running event or a distance running event which was conducted under the aegis of a State/district athletics association or sports control board affiliated to the Athletics Federation of India, conducted within the period of 24 months preceding race day, i.e. 19th January 2014.
- Timings recorded in the running events mentioned on the Timing India website can be considered by the organizers to qualify for the marathon race category. Timings of relay races/events will not be considered.
- If applying for Marathon (42.195 km): Timings of only marathon (42.195 km) and half marathon (21.097 km) distances will be considered to qualify for the marathon race category.
- If applying for Half Marathon (21.097 km): Timings of only marathon (42.195 km), half marathon (21.097 km) and 10 Km run distances will be considered to qualify for the half marathon race category.
- Submit a photocopy of the timing certificate acquired by you at the running events (as mentioned above) along with your application form.

मी मुंबई मॅरॅथॉनमधे भाग घ्यायचे म्हणतोय, (पवई मॅरॅथॉनमधे नाही येणारे Sad )

मुंबईत आहेत की नाही कोणी पळणारे!

भिडेकाका, धन्यवाद.

हर्पेन, मुंबई मॅरेथॉनमध्ये रेजिस्ट्रेशन केलेय का? केले नसेल तर यावर्षीची रेजिस्ट्रेशन्स आता बंद झालीत.

पण पवईची अजून चालू आहेत. Happy मी आज दुपारी करणार आहे.

आज मी सरावाचा श्रीगणेशा केला. सकाळी साडेपाच ते साडेसहा एक तासात हळूहळू पळत मध्ये मध्ये वेगाने चालत पण अजिबात न थांबता पाच किलोमीटर अंतर कापले.

०३-डिसें-२०१३: ५ किमी (१ तास) - हळूहळू पळत, भरभर चालत.
०४-डिसें-२०१३: ३ किमी (४० मि.) - भरभर चालत.
०५-डिसें-२०१३: ब्रेक
०६-डिसें-२०१३: ४ किमी (४३ मि.) - भरभर चालत.
०७-डिसें-२०१३: स्ट्रेचिंग/योगासने ५० मिनिटे (आज २ आठवड्याच्या बिझनेस ट्रिपवर जायचे आहे. हेक्टीक कनेक्टींग फ्लाईट याच्यात १२ तास लागणार आणि उद्या तिथे पोचल्यावर लगेच फ्रेश होऊन ऑफिसला जायचे म्हणून आज सकाळी धावायचे टाळले.)
०८-डिसें-२०१३: खाडा
०९-डिसें-२०१३: जिममध्ये १० मिनिटे दीड किमी ( लिहायला लाज वाटतेय Wink पण एवढाच वेळ मिळाला) धावलो.
१०-डिसें-२०१३: खाडा
११-डिसें-२०१३: खाडा
१२-डिसें-२०१३: जिममध्ये ३० मिनिटे ३.५ किमी धावलो.
१३-डिसें-२०१३: जिममध्ये ६५ मिनिटे ८ किमी धावलो.
१४-डिसें-२०१३: जिममध्ये ४५ मिनिटे ४.८ किमी (३ मैल) धावलो.
१५-डिसें-२०१३: खाडा
१६-डिसें-२०१३: जिममध्ये ३१ मिनिटे ३.२ किमी (२ मैल) भरभर चाललो.
१७-डिसें-२०१३: जिममध्ये ७१ मिनिटे ६,८ किमी (४.२३ मैल) भरभर चालत / पळत.
१८-डिसें-२०१३: खाडा (ऑफिस / प्रवास)
१९-डिसें-२०१३: खाडा (प्रवास)
२०-डिसें-२०१३: खाडा
२१-डिसें-२०१३: एक तास चौतीस मि. ८.६ किमी. पळणे कमी आणि चालणेच जास्त झाले.
२२-डिसें-२०१३: घरीच एक तास व्यायाम.
२३-डिसें-२०१३: घरीच सव्वा तास व्यायाम (योगासने).
२४-डिसें-२०१३: एक तास १० मि. - ७ किमी.
२५-डिसें-२०१५: सकाळी १ तास योगासने.
२६-डिसें-२०१५: खाडा
२७-डिसें-२०१५: सकाळी १ तास योगासने.

सही, हर्पेन!
मग मुंमॅ ची ड्राय रन म्हणून पवईला या. Happy
इन्ना, पवई मॅरेथॉनला टाईम्ड रनरची अट नाही. मग येताय ना?

आज शेवटी वेळ काढून जिममध्ये ६५ मिनिटे ८ किमी धावलो.
(प्रिटी झिंटा, सलमान, अक्षयकुमार, अ.खे. यांच्या नॉनसेन्स सिनेमाला धन्यवाद! अन्यथा जिममध्ये पळणे फार्फार बोरींग आहे.)

गजानन. कुठलीही ढीनचॅक गाणी ऐकच.. पण मला पळताना ऐकायला वेक अप सिड किंवा लबाचा ची गाणी खूप आवडतात.. मस्त वाटतात एकदम..

पराग, ही गाणी टाकतो आता मोबाईलमध्ये. Happy

हर्पेन, सही! किती वेळ लागला/लागतो तुम्हाला १० किमी साठी?

मिलिंदा, ओक्के. Happy

प्रमोदकाका, पहिल्याचं काय सांगता? त्यांनी दिलेल्या कमाल लायक वेळेत शर्यथ पूर्ण करता आली तरी माझ्या शेंडीवरून पाणी. Proud

धन्यवाद सगळ्यांना. Happy

सकाळी मॅरेथॉन यशस्वीरित्या पार झाली.

पराग,

डिटेल्ड वृत्तांत इज ऑन इट्स वे!

run_powai_run.JPG

अखेरीस आज मॅरेथॉन धावलो! गेल्या महिन्याभरापासून जमेल तसा सराव ( धावणे, चालणे आणि योगासने ) चालू ठेवला होता. सरावादरम्यान मी १ तासाच्या आगेमागे आठ किमीचा पल्ला गाठला होता. शेवटच्या आठवड्यात मात्र गुडघे दुखायला लागले, म्हणून धावणे/चालण्याचा सराव पूर्ण थांबवला. घरीच योगासने करत होतो. (बीच्या २१ किमीच्या मॅरेथॉनच्या वृतांतात त्यांनी योगासनांचा उल्लेख केला होता. म्हणून ती नेटाने चालू ठेवली.)

आरंभबिंदूला म्हणजे पवईतल्या साऊथ अ‍ॅव्हेन्यूला सकाळी सहाचे रिपोर्टींग टाईम होते आणि सव्वासहाला मॅरेथॉन सुरू होणार. साडेपाचला आम्ही हापिसातले पळणारे ऑफिसात भेटून तिथून आरंभबिंदूकडे जायचे असे ठरले होते.

आमचा रूट असा होता.

Run_Powai_Run_2014_map.JPG

मार्गात बक्कळ चढ-उतार होते. आधी यांचा फारसा विचार केला नव्हता. सुरुवात साऊथ अ‍ॅव्हेन्यूकडून सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू (डीमार्ट्/क्रिसिल हाऊस) च्या दिशेने झाली. हा भाग घसारीचा होता. तिथून मग बेयर्स हाऊस पासून थेट कैलास कॉम्प्लेक्स पर्यंत चढण! अरारा... उतारानंतर त्या चढणीने सुरुवातीलाच असा दम काढला की बास!

मग तिथून युटर्न घेऊन घसारी. उजव्याबाजूचे ऑलिंपियाचे वळण घेऊन पुढे JVLR टच करून परत मागे आणि परत चढ.

माझा सगळा सराव तिथेच ढम फुस झाला. Proud

चढून झाल्यावर लगेच उताराशी वेगात जुळवून घेऊन स्थिर व्हावे तोवर पुढचा चढ! अख्ख्या मॅरेथॉनमध्ये JVLR कडचा सपाटीचा मार्ग वगळता जवळ जवळ सगळ्या मार्गांवर चढ-उतार लागत होते.
चार किमी झाल्यावर तर माझी फुफ्फुसं श्वास घेताहेत की नुसतीच जड झालीत हे कळत नव्हते.

मग जरा चालणेच सुरू ठेवले. तोवर सुरू झालेली ४ किमी चालण्याची मॅरेथॉन उलट मार्गावरून जाताना दिसत होती. त्यातल्या लोकांचा उत्साह तरी काय! काही जोडपी तर पिलांना कांगारू बॅगेत घालून एवढ्या सकाळी मॅरेथॉन चालत होते!

पाच किमीचा खच्च्या दिसला आणि मग जरा जोर करून पुन्हा पळायला सुरुवात केली. पुन्हा चढा आणि उतरा. इथून पुढे मध्ये मध्ये उभे असलेले स्वयंसेवक उरलेल्या अंतराची घोषणा करून प्रोत्साहन देत होते. कमॉन! यु हॅव डन मोअर दॅन हाफ! ओन्ली अ लिटल लेफ्ट! जस्ट अ लिटल पुश अँड यु आर डन! सात किमी झाले. साडे सात झाले. दोन उरले! दीड उरला!!! इथे तर मी प्रत्येक पाऊल अगदी असेल नसेल तेवढी शक्ती एकवटून पुढे रेटत होतो.

आणि मग ती आली..... अखेर नव्हे.... तर अखेरची चढण! आतापर्यंत जेवढ्या चढणी चढल्या त्या सगळ्यांपेक्षा जरा जास्तच खडी असलेली! ते पण 'आता सगळी शक्ती संपली' असे वाटत असताना.... धडकीच बसली. Proud
मग पुन्हा थोडी चाल मंदावून एकाग्रता आणि जिद्द एकवटून त्या चढणीला हात घातला... फार नव्हतो पळू शकत. अवघ्या दहा पावलांनंतर पुन्हा चालणे. पुन्हा जीव एकवटून नेटाने पळायचा प्रयत्न! पुन्हा चाल. एके ठिकाणी मला असे वाटले की आता कोणत्याही क्षणी माझ्या श्वासाबरोबर माझा जीव आतून टुबुककन बाहेर पडेल. Lol

आणि शेवटी एकदाचा अंतिम खच्चा गाठला! हुश्श्य करायची वेगळी गरजच पडली नाही. पण त्यानंतर असं भारी वाटलं की ज्या टेकडीवर उभा होतो तिथून थोडासा हात वर केला तर आभाळालाच टेकेल!

अगदी दम निघाला. संपल्यावर लगेच थोडे थांबलो तर पायाच्या स्नायूंतून विचित्र फिलींग आले, मग तसेच थोडावेळ जागेवर थोडेफार जॉगींग करत कूलडाऊन झालो. डाव्या मांडीत क्रँप आल्यासारखे वाटत होते आणि उजवा गुडघा चालताना थोडा थोडा चमकत होता. शर्यथीनंतर आम्हाला मेडल वगैरे मिळाले नाही. माझ्या टायमिंगप्रमाणे मी ७२ मिनिटांत १० किमीची शर्यथ पूर्ण केली. आठ जानेवारीला आम्हाला अधिकृत सर्टीफिकेट मिळेल. ते मिळाले की इथे डकवीन. Happy

मार्गात बरेच युटर्न्स होते. एके ठिकाणी एकजण स्वयंसेवकांचा डोळा चुकवून सरळ पलीकडच्या लाईन मध्ये घुसला. त्याची खरंच चीड आणि फार्फार कीव आली.

वाटेत एकदा पाणी प्यायलो आणि शर्यथ संपल्यावर एकदा.
सोबतीला परागने सुचवलेली वेक अप सीड ची गाणी होती. त्याबरोबर मी 'दिल चाहता है', 'दिल तो पागल है' ची निवडक, शकिराचे वर्ल्ड्कपचे, तसेच मराठीतली द्रुतगतीतली (अगदी कुमारांचं 'कशी या त्यजू पदाला'सुद्धा) वगैरे लिस्ट जमवून ठेवली होती.
सकाळी घरातून निघताना थोडासा उपमा हाणला होता. (हे योग्य की अयोग्य माहीत नाही पण मला सकाळी सकाळी भूक लागते आणि मग फार काही सुचत नाही, म्हणून)
मेडिकलमध्ये मिळते ते एनर्झलचे एक पाकीट आणले होते ते हापिसात पोचल्यावर शर्यथीपूर्वी तिघांनी प्यायलो होतो. पण मग मला वाटले ते नसतो प्यायलो तर बरे झाले असते कारण ते लगेचच ब्लॅडरमध्ये पोचले होते. Wink तेंव्हा धावणे थोडे कठीण होईल असे वाटत होते. पण थोड्या वेळाने फारसे काही जाणवले नाही.
चढ उतारांची सवय नव्हती त्यामुळे असेल पण आज दिवसभर पायांचे घोटे आणि गुडघे दुखत होते. पायाच्या पंजांमध्ये अधूनमधून स्नायू आखडत होते.

मायबोलीवरच्या मॅरेथॉनपटूंचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या मॅरेथॉन्सचे वृत्तांत लिहिलेत, ते मला फार फार प्रोत्साहीत करणारे ठरले.
(आता आठवड्यातून किमान दोन दिवस तरी सराव असाच चालू ठेवायचा असे ठरवले आहे.)
मुलुंडवरच्या मायबोलीकरांचेही वेळोवेळच्या प्रोत्साहनाकरता आणि शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद!

Pages