मुंबई मॅरेथॉन

Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24

नमस्कार!

यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.

आणखी कोणी आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अर्ध मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी किमान किती दिवसांचा आणि साधारण कशा स्वरुपाचा सराव करावा?<<

इथे काहिंनी माहिती दिलेली आहेच, या व्यतिरिक्त अजुन माहिती हवी असल्यास माझ्या मित्राचा संपर्क करुन देउ शकेन. हा मित्र माझा मुंबईत शेजारी (वी ग्रु अप टुगेदर) होता आणि आता नवि मुंबईत रहातो. मित्र आणि त्याची बायको (दोघेहि व्यवसायाने डॉक्टर्स) भारतात ठिकठिकाणी जाउन ट्रायथ्लॉन, मॅरेथॉन इ. पोडियम फिनिश करतात. यावर्षी त्याची बोस्टन मॅरेथॉन करता तयारी चालु आहे. इंटरेस्ट असल्यास मला कळवा...

नमस्कार, राज.

या व्यतिरिक्त अजुन माहिती हवी असल्यास माझ्या मित्राचा संपर्क करुन देउ शकेन. <<< धन्यवाद. त्यांची हरकत नसेल तर त्यांचा संपर्क देऊन ठेवा. मला गरज भासल्यास मी त्यांच्याशी संपर्क साधू शकेन.

मित्र आणि त्याची बायको (दोघेहि व्यवसायाने डॉक्टर्स) भारतात ठिकठिकाणी जाउन ट्रायथ्लॉन, मॅरेथॉन इ. पोडियम फिनिश करतात. यावर्षी त्याची बोस्टन मॅरेथॉन करता तयारी चालु आहे. <<< हे भारी आहे.

अभिनंदन गजानन.

अतापर्यन्त १० कि मी मध्ये खुप वेळा भाग घेतला आहे आणि दिड तासात पुर्ण केला आहे पण २१ किमीचे धाडस नाही झाले. एकदा प्र्ययत्न करुन बघेन

साहिल, धन्यवाद.

तुम्हीही नक्की धाडस करा. मीही अगदी याच खच्च्यावर होतो. २१ किमी एवढ्या पल्ल्याच्या अंतराची धास्ती होती, पूर्ण करू शकू की नाही, हे आपल्या आवाक्याबाहेरचे तर नाही? असे प्रश्न मनात येत. पण जर आपली पहिली १० किमी आठवली तर तेव्हाही हीच स्थिती होती, असे लक्षात येईल. तेंव्हा ‘पहिल्या खेपेसाठी‘ धाडस केले म्हणून ते पुन्हा पुन्हा सहज करू शकलो. तसेच २१ किमीमध्येही धाडस करणे ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. तो खच्च्या एकदा पार केला की पुढचे सरावाच्या जोरावर निभावून जाते. यावेळी माझे उदीष्ट हे कसेही करून फिनीश लाईन पार करणे हे होते.

मी असे सुचवेन की किमान दोन महिने आधीपसून सरावाला सुरुवात करा. म्हणजे तुमचा आत्मविश्वास विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

जाता जाता माझ्या एक महिन्याच्या अवधीतल्या सरावात मी कापलेले कमाल अंतर १३.३ किमी होते.

आॅल दी बेस्ट !

अभिनंदन, गजानन.

मी गेल्या रविवारी (१० फेब्रु.) हिरनंदानी ठाणे येथे १०किमी पूर्ण केली - १ तास २ मिनिटांमध्ये. पुढची टार्गेट्स -
१) टाणे वर्षा मॅरेथॉन २०१९ (१० किमी) १ तास किंवा कमी वेळात
२) ठाणे हिरानंदानी २०२० (२१ किमी)

अभिनंदन गजानन आणि सुनिल !! साहील ऑल दी बेस्ट !!

आम्ही या विकांताला एक ५ के (- ७.५ सेल्सियस ) मध्ये केली. बेकार थंडी होती , पण दरवर्षी करतो म्हणून यावर्षीही केलीच !

अभिनंदन गजानन, सुनिल आणि धनि

गजानन, यापुढच्या खेपेस सराव अजून जास्त काळ (अडीच - तीन महिने ) आणि जास्त अंतराचा (१८ किमी ची लाँग रन) करून मगच भाग घ्यावा असे सुचवेन. नाहीतर लोकांचा आणि आपलाही समज असा होतो की विना सरावाचे २१ किमी धावता येते म्हणून, तसे पाहता अंतर कापता येतेच पण ते स्नायुंच्या दुखापती, हृदयावर ताण येणे वगैरे गोष्टींमुळे धोकादायक ठरू शकते.

घाबरवण्याचा हेतू नाहीये पण 'काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागत नाही' ह्या उक्तीनुसार सुचवत आहे.

गजानन, सहीच !!
अभिननंदन !! बाकी सगळ्या धावपटूचेही अभिनंदन !!

Pages