Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24
नमस्कार!
यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.
आणखी कोणी आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गजानन, हर्पेन - अभिनंदन!!
गजानन, हर्पेन - अभिनंदन!!
धन्यवाद मंड्ळी, बहुतेक लेख
धन्यवाद मंड्ळी,
बहुतेक लेख मालीकाच लिहावी लागेल, तर मंडळी, मला सहन करायच्या तयारीत रहा , मला किती सांगू आणि किती नको असे होते मॅरॅथॉन म्हटले की ....
आता मॅरेथॉनबद्दल लिहायचे
आता मॅरेथॉनबद्दल लिहायचे म्हणजे ते लेखनही तसेच हवे ना...मॅरेथॉन!
हर्पेन, स्पर्धा अथकपणाने पूर्ण केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि तुझ्या जिद्दीला मानाचा मुजरा!
हर्पेन....आत्ताच हा वृत्तांत
हर्पेन....आत्ताच हा वृत्तांत वाचला.... मॅरेथॉनचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाग घेणारा ती पूर्ण करायची याच जिद्दीने त्यात भाग घेत असतो....क्रमांक वगैरे याची त्याला/तिला पर्वा नसतेच. मी माझ्या नोकरीच्या दिवसात २१ किमी. मॅरेथॉन मध्ये इथे कोल्हापूरात भाग घेतला होता.....पहिल्या तीसएक मिनिटातच मला समजून चुकले होते की माझा पहिल्या दहात क्रमांक येणे शक्य नाही. त्यामुळेच की काय स्पर्धा सोडावी असेच वाटू लागले होते पण पाचच मिनिटानी माझ्या शेजारून मिलिटरीतून निवृत्त झालेले हवालदार पदावरील [हे नंतर समजले] स्पर्धक माझ्याच बरोबरीने पळत होते....केस विरळ आणि तेही पूर्ण पिकलेले, अशा व्यक्तीची जिद्द पाहून मग माझ्याच मनाला अधिक हुरुप आला आणि ती शर्यत मी पूर्ण केली....नंबर वगैरे कसलीच चौकशी केली नाही. फक्त एके ठिकाणी सही करायला कुणीतरी कागद दिला, ते केले. सायंकाळी पुन्हा त्या हवालदारांसमवेत चहापान झाले मस्तपैकी त्यावेळी त्यांचे मी मनापासून आभार मानले.
अशा स्पर्धांचा खरा उपयोग हाच की आपल्या मनाला त्या उभारी देवून जातात. पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा.
हर्पेन, पहिला भाग कधी येतोय?
हर्पेन, पहिला भाग कधी येतोय?
अशा स्पर्धांचा खरा उपयोग हाच
अशा स्पर्धांचा खरा उपयोग हाच की आपल्या मनाला त्या उभारी देवून जातात>> क्या बात है अशोक काका!
हर्पेन, क्या शॉल्लेट मारा!
हर्पेन, क्या शॉल्लेट मारा! साडेपाच तास धावणे म्हणजे कहर आहे.
आ.न.,
-गा.पै.
गजानन, हर्पेन अभिनंदन!
गजानन, हर्पेन अभिनंदन!
हर्पेन साडेपाच तास? तास??? मी साडेपाच मिनिटं देखील पळू शकत नाही...
MG, ललिता, बस्के,
MG, ललिता, बस्के, धन्यवाद.
हर्पेन, वृत्तांत कुठाय?
अनेकानेक धन्यवाद बस्के, गापै,
अनेकानेक धन्यवाद बस्के, गापै, अशोक. आणि प्रमोद देव..
प्रमोद देव, स्पर्धा पुर्ण केली, पण अथकपणे नाही हो, मधे मधे भरपूर थकलो देखिल
ललिता-प्रीती, गजानन, इतके दिवस खरेतर गेले काही महिने मॅरॅथॉनपाठी घालवले तर आता जरा इतर गोष्टींकडे लक्ष देतोय त्यामुळे लिहायला बसायचा मुहुर्त अजून लाभतोय, जरा वेळ लागतोय पण वृत्तांत लिहिणारे मात्र नक्की...:)
काही महिने मॅरॅथॉनपाठी घालवले
काही महिने मॅरॅथॉनपाठी घालवले <<< त्यात अजून थोडा वेळ घालव वृतांतासाठी, म्हणजे मग बिनघोर दुसर्या गोष्टींकडे लक्ष देता येईल.
हर्पेन, तुमचा वृत्तांत
हर्पेन, तुमचा वृत्तांत 'मॅरेथॉन रनिंग' बीबी वर पण येऊ द्यात.
येत्या रवीवारी गोरेगावला
येत्या रवीवारी गोरेगावला असलेल्या 'मुंबई मॉन्सून मॅडनेस' नावाच्या मॅरेथॉन स्पर्धेत कोणी भाग घेणारे का?
पाऊस आहे का मुंबईत?
Name: मी पळून आलो. पाऊस
Name:
मी पळून आलो. पाऊस नव्हता मॅडनेस होता मात्र....
माझा निकाल
Harshad Pendse
Bib No.: 333
Gender: M
City: Pune
Age category: 41 - 50
Event: 2nd Mumbai Running And Living Monsoon Madness XC Half Marathon
Chip time: 2:12:34
Overall Rank: 52/641 Average Speed: 9.55Km/hr
Gender Rank: 49/571 Age Category Rank: 5/38
या वेळी कोण कोण आहे मुंबई
या वेळी कोण कोण आहे मुंबई मॅरॅथॉन मधे भाग घेतलेले?
मी घेतलाय पुर्ण मॅरॅथॉन मधे
मी घेतलाय पुर्ण मॅरॅथॉन मधे भाग
तयारी पण चालू आहे
मी आहे पवई मॅरेथॉनमध्ये. ४
मी आहे पवई मॅरेथॉनमध्ये. ४ जाने. ला.
अरे मी हे पाहिलेच नाही, तिकडे
अरे मी हे पाहिलेच नाही, तिकडे पण प्रश्न विचारला होता....:)
मुंबई पादाक्रांत करायला मी
मुंबई पादाक्रांत करायला मी येतोय
अर्रे वा! यशस्वी व्हा!
अर्रे वा! यशस्वी व्हा!
गजाभौ, अभिनंदन (इतक्या
गजाभौ, अभिनंदन (इतक्या उशीराने करतोय, पण समजुन घ्यालच! हे धागे नजरेतुन सुटले)
हर्पेन, तुमचेही अभिनंदन.
नमस्कार!
नमस्कार मंडळी!
मी नुकतीच १० कि.मी.ची पवई रन पूर्ण केली!
आता पुढे १७ फेब्रु. ला नवी मुंबई अर्ध-मॅरेथॉन : २०१९ मध्ये धावायचा विचार करत आहे.
याआधी मी ११ कि.मी. पेक्षा वरच्या शर्यतीत भाग घेतलेला नसल्याने २१ कि.मी. चे हे ध्येय माझ्यासाठी तसे लांब अंतरावर असल्यासारखे वाटतेय.
अर्ध मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी किमान किती दिवसांचा आणि साधारण कशा स्वरुपाचा सराव करावा?
.
.
सही रे गजा,
सही रे गजा,
तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळेल तुला..
अभिनंदन !! आणि पुढच्या
अभिनंदन !! आणि पुढच्या सरावाकरता शुभेच्छा !!
आता सराव करताना आठवड्यामध्ये ५ - ६ किमी २-३ दिवस आणि शनिवारी / रविवारी अंतर वाढवत नेवून २१ किमी पर्यंत नेणे असा सराव केला तर अर्ध-मॅरॅथॉन अवघड जाणार नाही
अभिनंदन, गजानन.
अभिनंदन, गजानन.
मी २०१८ मध्ये दोन वेळेला १० किमी स्पर्धांत भाग घेतला. ठाणे हिरनंदानी आणि ठाणे वर्षा. यंदाही तेच करणार आहे.
तरीही, आजपावेतो एका वेळेस मी फक्त १४ किमी धावून पाहिले आहे. २१ किमी खूपच जास्त होतील. कुणाचे अनुभव वाचायला मिळाले तर मदत होईल.
अभिनंदन, गजानन.
अभिनंदन, गजानन.
काल इकडे लिहायचे राहूनच गेले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण त्याला कारण तू दिलेली लिंक आणि स्मरणरंजन
बघता बघता, यावर्षी मुंबई मॅरॅथॉनमधे धावलो की माझी सहावी वारी होईल. असो.
विकांताचा विचार करता तुझ्याकडे ५ विकांत आहेत. ढोबळ मानाने विचार करता आजच्या १० किमी पासून सुरु करून १७ फेब्रुवारीला २१ किमी करता येणे शक्य आहे.
नुकत्याच धावलेल्या १० किमी करता सराव कसा / किती केला होता, वेळ किती लागला होता हे कळवलेस तर त्याप्रमाणे पुढचे सांगता येईल.
हिम्स, धनि, सुनील, हर्पेन
हिम्स, धनि, सुनील, हर्पेन (दिलगिरी कसली!), धन्यवाद.
माझा एका मित्राने आतापर्यंत काहीवेळा २१ किमीच्या शर्यती धावलेल्या आहेत त्याच्याशीही बोललो. त्यानेही धनि यांनी लिहिल्याप्रमाणे सांगितले.
आठवड्यामध्ये ५ - ६ किमी २-३ दिवस आणि शनिवारी / रविवारी अंतर वाढवत नेवून २१ किमी पर्यंत नेणे असा सराव केला तर अर्ध-मॅरॅथॉन अवघड जाणार नाही. याशिवाय रोज नियमित प्लँक्स आणि जिममध्ये ट्रेनरच्या साहाय्याने Deadlift (with moderate/comfortable weights) करणे. याच्यामुळे अधिक अंतरासाठी स्नायू बर्यापैकी तयार होतील असे म्हणाला. त्याच्या शब्दात Running is more about core than legs. Don't worry too much about legs).
हर्पेन, १० किमीसाठीचा सराव म्हणजे त्याआधीच्या तीन रविवारी मी ९ किमी, ८ किमी आणि ६ किमी या क्रमाने रस्त्यावर धावलो. नंतरच्या रविवारी १० किमीची शर्यत धावलो. आधीही ५-६ वेळा १० किमी धावलो असल्याने मी तसा निर्धास्त होतो.
२१ किमीसंबंधी आज जिममध्ये ट्रेनरशी बोललो तर त्यानेही साधारण असेच सांगितले. पण तो म्हणला आठवड्यातून २-३ दिवस १०-१५ किमी धावयला पाहिजे. किमान १० तरी. आणि विकेंडला त्यापेक्षा जास्त. म्हणजे जिथे आजवर १० किमी धावण्यासाठी मी आधीपासून (माझ्या वेळ आणि ताकदीच्या कुवतीप्रमाणे) रेटून सराव करायचो तश्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतराच्या शर्यती आठवड्यातून तिनदा करायच्या हे गणित डोक्यात येऊन मला दडपणच आले. (बरे, ट्रेनर लोकांना त्यांच्या मतांपेक्षा वेगळी मतं ऐकणे म्हणजे स्वतःच स्वतःला कमी लेखण्यासारखे वाटते की काय कोण जाणे! याआधी एक फार चांगला ट्रेनर होता. तो समोरच्याचा आहार, सद्य क्षमता आणि इतर बाबी लक्षात घेऊन त्या कलाने वर्काऊट्स सांगायचा. तो गेल्यावर जे दोन ट्रेनर आले ते फार इगोईस्ट होते. विरोधाभास म्हणजे हे नवे ट्रेनर आले त्यांच्यापैकी प्रत्येकाने त्यांच्या आधीच्या ट्रेनरने सांगितलेले वर्काऊट्स फालतू म्हणून रद्द केले आणि स्वतःचे सांगितले. पुन्हा नवा ट्रेनर आला आहे, तो बरा असावा असे वाटतोय. पण त्याने वीकडेज ना ३ वेळा १०-१५ किमी सांगितल्यावर मी अजून काहीच बोललो नाही. हे फारच लांब चर्हाट झाले, पण असो).
गजानन -२१ किमीसंबंधी आज
गजानन -
२१ किमीसंबंधी आज जिममध्ये ट्रेनरशी बोललो तर त्यानेही साधारण असेच सांगितले. पण तो म्हणला आठवड्यातून २-३ दिवस १०-१५ किमी धावयला पाहिजे. किमान १० तरी. आणि विकेंडला त्यापेक्षा जास्त. >>> +१
मसल मेमरी बिल्ट करणेही गरजेचे. फक्त रविवारी धावण्यापेक्षा आठवडाभर धावायला हवेच फक्त रविवारीच पळून भागणार नाही. विकली मायलेज हळूहळू वाढवायला हवे. पाचापैकी तिसर्या आठवड्यात सर्वात जास्त आणि मग परत स्पर्धा जवळ येईल तसे कमीकमी करत न्यायचे.
तर मग होऊन जाऊ दे.
हर्पेन, अवघड वाटतेय, प्रयत्न
हर्पेन, अवघड वाटतेय, प्रयत्न करतो.
Pages