मार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता.
कोणता रूट..?
पुन्हा कोकणातच जायचे का..?
पुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..?
परत येताना तरी ताम्हिणी घाट नको.
मांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया.
मांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता. (पुणे - भाटघर धरण - भोर - मांढरदेवी - वाई - मांढरदेवी - भोर - पुणे)
उत्तर भारतीयांमध्ये लग्नाआधी 'सगाई' नावाचा एक कार्यक्रम असतो. (Equivalent to साखरपुडा). आमच्या मुलीची सगाई होती तेव्हां नातेवाईक आणि मित्रमंडळींनी छोटेमोठे प्रोग्रॅम्स सादर केले. मी आणि माझी अर्धांगिनी शुभदा हिनी 'बहिर्यांसाठी हिंदी चित्रपटसंगीत' सादर केलं. त्याची व्हिडियो यू ट्यूबवर टाकली. त्याची लिंक देत आहे.
आत्तापर्यंतच्या लेखांना आपण सर्वांकडून अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला आहे. हा व्हिडियो देखील तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.
https://www.youtube.com/watch?v=eTRYrH5xh7o
आमच्या मरीन इंजिनियरिंग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये प्रोफेसरमंडळी काहीही सादर करायला कचरतात. (यात 'मरीन' हा शब्द इंग्रजी वाचावा. मराठी नव्हे.) लोक हसतील की काय असं वाटत असावं. ते बदलण्याचा मी आणि माझी पत्नी शुभदा प्रयत्न करंत आहो त. गेल्या वर्षी आम्ही जे सादर केलं होतं ते आता यू ट्यूबवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक आता माझ्याकडे नाही पण एक दिवसात माबोवर टाकीनच.
मात्र या वर्षीसाठी आम्हाला हिंदी चित्रपट गीतांवर केलेले विडंबन काव्य हवे आहे. नेटवर शोधले पण मिळाले नाही. वेळ कमी आहे. प्लीज कोणीतरी लवकर सांगा.
माबोकरांच्या सोबत सायकलींग सुरू करून चार महिने उलटले होते. या दरम्यान अमित M आणि केदारच्या सल्ल्यावरून माझ्याकडच्या रणगाडा सायकलला "जय महाराष्ट्र" करून एक अत्यंत हलकी व अद्ययावत अशी हायब्रीड प्रकारातली "मेरीडा" सायकल विकत घेतली.
एक दोन वीकांत सोडले तर किरण, अमित M, केदार दिक्षीत, वर्धन, पिंगू आणि सुधाकर यांच्यासोबत नियमीतपणे सायकलींग सुरू झाले...
पुणे-लोणावळा (~१०० किमी)
पुणे-सातारा (११० किमी)
पुणे-महाबळेश्वर (१२० किमी)