क्रीडा

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

Submitted by मार्गी on 26 February, 2016 - 03:14

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

शब्दखुणा: 

फिनिश लाईन

Submitted by विद्या भुतकर on 10 February, 2016 - 23:46

फिनिश लाईन

आज खूप दिवसांनी पळाले, म्हणजे रनिंग केलं. जवळ जवळ ३-४ महिन्यांनी. मस्त वाटलं.गेल्या वर्षी दोन हाफ मेरेथोन पळाले, एका पाठोपाठ एक. भारी वाटलं होतं. पुढचे १५ दिवस धड चालता येत नव्हतं ही गोष्ट वेगळी पण केलं याचं समाधान होतं. आज सांगायचं कारण म्हणजे, खूप दिवसांनी पळताना मी कसेतरी ४ कि.मी. पार पाडले, चाललेच जवळ जवळ. वाटलं १३ मैल /२१ कि.मी. कसे पार केले असतील मी?

विषय: 

तडका - क्रिकेटचं मार्केट

Submitted by vishal maske on 1 February, 2016 - 21:40

क्रिकेटचं मार्केट

खेळणारे खेळत असतात
पाहणारे तळममळत असतात
कुणी मारतात ऊड्या तर
कुणी ऊगीच जळत असतात

खेळणारासह पाहणारालाही
भरभरून असा इंजॉय आहे
जगभरातुन पाहिलं तरीही
क्रिकेटचं मार्केट हाय आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - खेळ खेळताना

Submitted by vishal maske on 29 January, 2016 - 08:22

खेळ खेळताना

जिंकण्याची गॅरंटी नाही
पण जिंकण्यासाठी खेळावं
हारण्याची अपेक्षाच नको
हरवण्या साठी भिडावं

हार होवो की जीत होवो
त्याची पर्वा मुळीच नाही
हरण्याच्या भीतीने खेळणे
ती खेळी खेळीच नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)

Submitted by मनोज. on 23 January, 2016 - 08:00

...नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला

सकाळी कडाक्याच्या थंडीत जाग आली. सगळा परिसर धुक्याची दुलई पांघरून झोपी गेला होता. सुर्योदय होण्याआधी मी आवरले. थोड्या वेळात अमित आणि किरणही उठले व आवरू लागले.

काल जेवताना व नंतरही आमचे बरेच वेगवेगळे प्लॅन्स ठरत होते व रद्द होते. तापोळा-बामणोली-सातारा-पुणे असे जायचे की पुन्हा महाबळेश्वर-पुणे करायचे वगैरे चर्चा झाल्या होत्या. शेवटी सकाळी महाबळेश्वर-पुणे या रूटवर शिक्कामोर्तब झाले.

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

नाबाद १००९ प्रणव धनावडे कौतुक.

Submitted by अश्विनीमामी on 5 January, 2016 - 23:24

कल्याणच्या १५ वर्षीय प्रणव धनावडेने भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ३२३ चेंडूत नाबाद १००९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. काल ६५२ नाबाद वाचले होते तेव्हाच अरे व्वा असे वाटले होते. घरी येउन बघितले तर १००९!!! चक्क ते ही नाबाद. आता त्याच्या टीम ने डाव डिक्लेअर केला आहे.

विषय: 

सायकल राईड - तापोळा - भाग १

Submitted by मनोज. on 5 January, 2016 - 04:49

नववर्षाची सुरूवात शुक्रवारी होत असल्याने मोठ्ठा वीकांत रिकामा होता त्यामुळे वीकांताला कुठे जायचे याचे वेगवेगळे बेत ठरू लागले. कांही महिन्यांपूर्वी अमितने तापोळा सहल केली होती आणि तो रूट एकदा सायकलने करण्याचे सर्वांच्याच मनात होते त्यामुळे तापोळा हे ठिकाण पक्के ठरवले व फोनाफोनी करून बुकींग केले.

मी, किरण कुमार आणि अमित M या राईडला जाणार हेही नक्की झाले. महाबळेश्वर आणि महाडच्या घाटवाटांच्या राईडनंतर सायकल खूप कमी चालवली होती. सराव नव्हताच आणि एकंदर मोठ्ठा गॅप पडला होता त्यामुळे या राईडच्या एक आठवडा आधी रोज ५० किमी सायकलींग केले.

शब्दखुणा: 

२०१५ - तुमचा फिटनेस आढावा आणि २०१६ चे उदिष्ट्य

Submitted by केदार on 1 January, 2016 - 02:18

तर २०१५ गेले. मग गेल्या वर्षभरात तंदूरुस्त राहण्यासाठी ( फिजिकल फिटनेस) तुम्ही नेमके काय केले?

माझे स्टॅट

सायकलिंग : ७७६४ किमी मोजलेले - आणि न मोजलेले साधारण १५०-२०० मुलासोबत / भाजी आणणे वगैरे साठी चालवलेली सायकल म्हणजे साधारण ७९०० +/- किमी. त्याकिमींमध्ये एकुण ५५७०० मिटर चढ चढला. म्हणजे साधारण महिण्याला सरासरी ५००० मिटर. ( मध्ये एक महिना अजिबातच सायकल चालवली नाही.)

धावणे - एकुण १०० किमी च्या आतबाहेर. पण धावण्यात अजूनही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यापेक्षा मला सायकल आवडते.

विषय: 
शब्दखुणा: 

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

Submitted by मार्गी on 28 December, 2015 - 04:06

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - क्रीडा