तर २०१५ गेले. मग गेल्या वर्षभरात तंदूरुस्त राहण्यासाठी ( फिजिकल फिटनेस) तुम्ही नेमके काय केले?
माझे स्टॅट
सायकलिंग : ७७६४ किमी मोजलेले - आणि न मोजलेले साधारण १५०-२०० मुलासोबत / भाजी आणणे वगैरे साठी चालवलेली सायकल म्हणजे साधारण ७९०० +/- किमी. त्याकिमींमध्ये एकुण ५५७०० मिटर चढ चढला. म्हणजे साधारण महिण्याला सरासरी ५००० मिटर. ( मध्ये एक महिना अजिबातच सायकल चालवली नाही.)
धावणे - एकुण १०० किमी च्या आतबाहेर. पण धावण्यात अजूनही म्हणावी तशी प्रगती नाही. त्यापेक्षा मला सायकल आवडते.
अचिव्हमेंटस - सुपर रॅन्डो, PBP क्वालिफिकेशन, मास्टर्स आणि हायब्रिड एकत्र अशा कॅटॅगिरी मध्ये लवासा घाट चढण्याचा शर्यतीत पहिला आलो. पण दुसरे रोडीज नसल्यामुळे बक्षिस न मिळता मेडलच मिळाले.
पुढच्या वर्षीचे उदिष्ट्य :
सायकल : १०००० किमी
धावणे - २५० किमी ( माझ्यासाठी अवघड आहे, पण करायचेच!)
तर येऊ द्यात आपले क्रिडाप्रकार आणि गोल्स. ( वर्षभर दर महिन्यात १०००० पावले चालणे हे देखील एक उदिष्ट्य आहे. )
जबरी, केदार!
जबरी, केदार!
दर महीन्याला किमान एकदा
दर महीन्याला किमान एकदा सिंहगड चढणे. एक तास वीस मिनिटे इतक्या वेळात चढणे हे उपटार्गेट.
जबरी!!
जबरी!!
केदार, अफाट आकडे..... वाचुनच
केदार, अफाट आकडे..... वाचुनच डोळे फिरले माझे......
मी ठरविलेले असे आकडे नव्हतेच, अन जे आहेत वार्षिक आकडे ते फारच किरकोळ आहेत. तुझ्या एका महिन्याच्या सरासरी इतकेही नाहीत. तरी देतो इथे.
Distance................699.7 km
Time ......................43h 24m (Avg. 15.90 km/h)
Elev Gain ..............4,170 m
Rides.....................110
Biggest Ride..........110.5 km
Biggest Climb.........296 m
दोन फेल गेलेल्या बीआरएम्...
२०१६ करता निश्चित असे आकडे ठरविलेले नाहीत, उलट "फिल्ड मधे अजुन तरी टीकुन रहाणार की नाही" याच विवंचनेत आहे. सबब, जसे जमेल तसे तितके करीत रहाणार.
केदार, अफाट! फुल थ्रोटल
केदार,
अफाट! फुल थ्रोटल सायकलिंग केलीत!
लिम्बुकाका, मस्त! मी तुमच्याच लायनीमध्ये. पहिल्या सहामाहीत जवळपास साडे तीनशे किमी सायकल आणि ३०० किमी जॉग. पण नंतर जीम लावल्याने तिथले आकडे नाहीयेत. तिथल्या कार्डीओ मशीन्सवर झाले असावेत शंभर ते दीडशे किमी जॉग आणि जवळजवळ २०० किमी सायकलींग.
पण आता ह्यावर्षी दर महिना किमान ६० किमी जॉग आणि ३०० किमी सायकलिंग करायचा प्लान आहे.
केदार, तुझ्या अॅक्टिव्हिटीज
केदार, तुझ्या अॅक्टिव्हिटीज मला कायमच खूप इन्स्पायरिंग वाटतात. तुझ्या डिटरमिनेशनने तू तुझं ध्येय नक्की साध्य करशील. ऑल द बेस्ट
बापरे, पृथ्वीप्रदक्षिणा
बापरे, पृथ्वीप्रदक्षिणा मारल्यासारखे आहे हे..
केदार, ग्रेटच कामगिरी
केदार, ग्रेटच कामगिरी _/\_
पुढच्या टारगेटसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
एल्टी, तुमचाही ग्राफ कौतुकास्पद आहे एकदम. प्रेरक!
केदार, मार्गी, लिंबुटिंबु
केदार, मार्गी, लिंबुटिंबु याचा प्रेरणेने सायकलिंग ला सुरुवात केली आहे.
केदार सायकलिंग चालु केल्यानंतर तु लिहिलेले माहिती पुर्ण लेख जास्त चांगले लक्षात आले.
यापुढे रोजचे ८-१० किमी चे सायकलिंग आणि विकेंड ला थोड्या लांबच्या राईड करण्याचे ठरवले आहे
हेल्थ ईज वेल्थ!!! तर २०१५
हेल्थ ईज वेल्थ!!!
तर २०१५ गेले. मग गेल्या वर्षभरात तंदूरुस्त राहण्यासाठी ( फिजिकल फिटनेस) तुम्ही नेमके काय केले?
माझे स्टॅट
>>
मी काय केले आणि करतो:
१) रोज ६ सुर्यनमस्कार
२) रोज कपालभाती आणि प्राणायाम
३) ठराविक आसन
४) रात्री फक्त कपालभाती आणि प्राणायाम
५) शक्य तेवढ चालणे
६) हिरव्या भाज्या नियमित खाणे
७) तेलकट तुपकट खारट गोड शिळ्या पदार्थांपासून दुर राहणे
८) भरपुर पाणी पिणे
९) चहामधे आले, ओली हळद, दालचिनी, आले इत्यादीचा समावेश करणे आणि साखर फक्त अर्धा चमचाच घालणे
१०) शास्त्रिय संगीत रोज नियमित ऐकणे आणि अधुनमधुन गाणे
११) महिन्यातून दोन ते तीन वेळा पोहणे
१२) दर सहा महिन्यांनी रक्त तपासून घेणे
अकून हेही करावेसे वाटते:
१) सायकल चालवणे
२) धावणे
३) मॅरॉथॉन मधे भाग घेणे
४) नेचर वाल्क जाणे
जबरी! माझ्याबाबतीत २०१५ चा
जबरी!
माझ्याबाबतीत २०१५ चा आढावा घ्यायचा झाला तर पूर्ण वर्षात ५.५ किलो वजन कमी झालं. पण तरीही कागदावर अजूनही 'ओव्हरवेट' असाच शिक्का येतो आहे. जो घालवणं अशक्य आहे. ते जाऊदे!
वर्षाच्या शेवटी शारिरीक तपासण्या केल्या ते सगळे अहवाल एकदम रॉकिंग आहेत. HDL - 56, LDL - 107, LDL/HDL Ratio 1.9, Cholestrol/HDL Ratio 3.2 ह्याची ऑफिसच्या डॉक्टरांनी आठवणीने दखल घेतली आणि विशेष कौतुक केले.
यंदाचं टारगेट - आहे ते वजन कायम ठेवणे, वाढू न देणे, शक्य झाले - सहज जमले तर कमी करणे.
क्रीडाप्रकारात मला फक्त चालणे समाविष्ट करता येईल. आठवड्यात २.५ किमीपेक्षा जास्त चालायला वेळ मिळत नाही शनि-रवि मध्ये ६-६ किमी चालून ही कसर भरून काढायचा प्रयत्न करते. ह्यात लग्नादी समारंभांना जायचंय/ कंटाळा आला/ वेळ नाही/ गरम होतंय- हवेत खूप उकाडा आहे/ अभ्यास घ्यायचाय वगैरे पाद्र्या कारणांनी शक्यतो खंड पडू न देणे जमवायचं आहे. विश मी लक!
Distance................699.7
Distance................699.7 km
Time ......................43h 24m (Avg. 15.90 km/h)
Elev Gain ..............4,170 m
Rides.....................110
Biggest Ride..........110.5 km
Biggest Climb.........296 m
जबरी आहे.
सायकल ला सोय असते का नोंद ठेवायची ?