ही गोष्ट आहे माझ्या पहिल्या वहिल्या हाफ मॅरॅथॉन ची. आता इतके लोक इतक्या शर्यती पळतात. त्यात माझी विशेष अशी काही नाही. पण माझ्यासाठी खासंच ती. कारण त्याची सुरुवातच झाली ती माझ्या तिशीनंतर. माझं खूप काही वय वगैरे झालं नाहीये पण वयाच्या तीस वर्षापर्यंत अभ्यास, कॉलेज, नोकरी, मुलं, इ जे काही सर्व लोक करतात तसं करून झालं. थोडं- फार इकडे तिकडे. कधीही खेळात, कुठल्या शर्यतीत भाग घेतला नाही शाळेत. त्यामुळे पहिली हाफ मॅरॅथॉन माझ्यासाठी खासच होती. तिची सुरुवात मात्र एका ५ किमी अंतराच्या रेसने झाली. आजची पोस्ट त्याच्याबद्दलच.
फायनली फायनली फायनली ...
या विकांताला धोनीला रुपेरी पडद्यावर बघायचा योग आला. पिच्चर बघायचाच होता म्हणून मुद्दाम कुठलेच परीक्षण वाचले नव्हते किंवा कोणालाच पिक्चरमध्ये काय दाखवलेय हे विचारले नव्हते. तरी क्लायमॅक्स काय असणार याचा माझ्या चाणाक्ष बुद्धीने अंदाज लावलेला.
.... आणि तोच खरा ठरवत सुरुवातही त्याच द्रुश्याने झाली.
येस्स!!
वन ऑफ द बिगेस्ट मोमेंट ईन ईंडियन क्रिकेट हिस्टरी. डोळ्यात साठवून ठेवावा, आणि तरीही पुन्हा पुन्हा बघत राहावे असे वाटणारा तो क्षण जेव्हा धोनीने श्रीलंकेला स्टेडीयमच्या पार भिरकावून दिले आणि तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भारताने विश्वचषक जिंकला!
अनुभव (सप्टेंबर २०१६) अंकात प्रकाशित झालेला लेख
-------------------------------
Don’t be surprised... I will still rise... (रिओ ऑलिंपिकमधे वाजलेलं गीत, केटी पेरी)
"जीता दिल इंडिया का, जीतनी है दुनिया,
ये बस टीम नही है, ये है इंडिया"
गेल्या दोन महिन्यांपासून दर दोन मिनिटाला TV वर ऐकू येणारी ही Anthem ऐकून उत्सुकता नक्कीच वाढलेय. ही उत्सुकता आहे कबड्डी वर्ल्डकप 2016 ची. उद्यापासून चालू होतोय.(कदाचित माझ्यासारखे बरेच असतील पहिल्यांदाच हा वर्ल्डकप बघणारे.)
फ्लिंटो बॉक्स डॉट कॉम च्या बर्याच जाहीराती पाहील्या ऑनलाईन. कुणी सबस्क्राईब केलेल आहे का? माझा मुलगा वय वर्ष ३.५ , त्याला सारखं काहीतरी नवं खेळणं , नवं काहीतरी हवं असतं . आत्ताच राहण्याचे ठिकाण बदलले आहे अन तो कंटाळला आहे. हे फ्लिंटोबॉक्स सब्स्क्राईब करावं का? जेणेकरुन तो यंगेज राहील. नवे खेळ शिकेल . मेंदुला चालना मिळेल असे काही दुसरे गेम्स ऑनलाईन असतील तर सुचवा .त्याला पेंटीग आवडते. पण पटकन कंटाळतो . नायतर मोटु पतलु आहेच दिवसभर , टीवीवर नसेल तर नेटवर पाह्तो. सुचवा लोक्स प्लीज.
मी गेली काही वर्षे बॅडमिंटन खेळतोय. नेमकी वर्षे न सांगता "काही" वर्षे ह्या साठी सांगतोय की नेमकी वर्षे सांगायला मला संकोच वाटतो. मी जितकी वर्षे खेळतोय तितक्या वर्षांची हल्लीची मुले खूपच सरस खेळतात. पण तो खेळ खेळत असल्यामुळे खूप चांगलं खेळता येत नसेल तरी बऱ्यापैकी उमजू लागलाय. मागे कोणीतरी येथेच ह्या खेळाला हिंसक खेळ असा म्हणाला होता. ते एका दृष्टीने बरोबर पण आहे. खांदे, घुडगे, पाठ, टाच, कोपर ह्या खेळाचे लगेच बळी पडू शकतात. स्पर्धात्मक खेळ करताना ह्याला लागणारा स्टॅमिना डेव्हलप होण्यासाठी काही वर्षे नाहीतर एखादी पिढी जाऊ द्यावी लागते.
न्यायालयाच्या निकालानुसार यंदाच्या दहीहंडीमध्ये 18 वर्षाखालील बालगोपाळ सहभागी होऊ शकणार नाहीत.
तसेच हंडीची उंची 20 फूटांपेक्षा उंच असता कामा नये.
(नशीब समुद्रसपाटीपासून वीस फूट नाही म्हणाले)
अत्यंत अयोग्य आणि लोकांच्या उत्साहावर विरजन घालणारा निर्णय.
मी काही प्रखर हिंदुत्ववादी नाही जे हिंदूंच्याच सणांना का लक्ष केले जाते म्हणत ओरडा करत फिरतो.
तसेच मी उत्सवप्रिय माणूस असलो तरी दुष्काळात रंगपंचमीला केलेली पाण्याची नाशाडी तसेच गणपती नवरात्रीला उशीरापर्यंत चालणारे स्पीकर यांना विरोधच करतो.
पण या निर्बंधांना मात्र अर्थ नाही.
प्राण्यांचे अदभुत अनुभव - १
*चा वट वाघूळ* (फक्त प्रौढांसाठी)
3000 मीटर steeple chase मध्ये ललिता शिवाजी बाबर. 2600 मीटर पर्यंत 3-4 नंबर वर. काय मस्त पळत आहे. शेवटची लॅप सुरुऊ आहे. गो ललिता गो.
उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.
पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.