एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
सध्या आमच्या गावात बायसिकल फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. दररोज वेगवेगळे चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, किंवा शॉर्ट फिल्म्स दाखवत आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही सायकलशी संबंधित. त्यातून मिळणारे पैसे 'बाईक क्लब' या संस्थेला देणार आहेत की जी शाळेतल्या लहान मुलांना सायकल चालवायला शिकवते आणि त्यांना एक एक सायकलही देते. तर काल तिथे 'ब्रेकिंग अवे' असा चित्रपट असणार होता. आता अॅकॅडमी पुरस्कार मिळालेला चित्रपट आणि सायकलींगवर असणारा म्हटल्यावर सोनेपे सुहागा म्हणत आम्ही हजेरी लावली. चित्रपटाबद्दल तसे म्हटले तर फार काही माहिती नव्हती.
दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.
____________________________
फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.
शनिवारी, यावर्षीची बॉस्टन ऍथलेटिक असोशियनची पहिली रेस झाली ५किमी अंतराची. यावर्षी १० किमी आणि हाफ मॅरॅथॉनही आहे. याला खरेतर रेस म्हटलंच नाही पाहिजे. कारण मला कुठेही पहिले बक्षीस मिळवायचे नसते. अर्थात हवे असले तरी ते काय जमणार नाहीये. इथे भले भले लोक सुसाट वेगाने पळत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करणे हे ध्येय नाहीच मुळी भाग घेण्याचे. पण तरीही आपलं लोक म्हणतात म्हणून 'रेस' म्हणायचं. तर ही ५किमीची रेस शनिवारी पार पडली. आता हे अंतर तसं फार जास्त वाटत नाही आणि नसतंही.
आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली.
व्यायाम , आहार इत्यादी बाबत एके ठिकाणी चर्चा करत असताना सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या, प्रोटीन पावडर वगैरेचा विषय निघाला. नेहमीप्रमाणे चर्चेत हे सगळे घेतल्याने फायदा होतो आणि फायदा होत नाही असे दोन गट पडले. मात्र ह्या सर्वांच्या वाटेला कधीही न गेलेल्या अस्मादिकांची मात्र पंचाईत झाली. तर या चर्चेतून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा बाफ
१) हे सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या म्हणजे नेमकं काय असत ?
२) ह्या सगळ्याचे शरीरावर काय परिणाम होतात? (दीर्घकालीन /अल्पकालीन )
३) मध्येच बंद केल्यास दुष्परिणाम होतात का ?
आकांक्षापुढती जिथे
अंध असूनही कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, हायकिंग, ट्रेकिंग यासारख्या विविध क्रीडा प्रकारात उच्च स्तरावरच चांगलं यश मिळवणाऱ्या चारुदत्त जाधवच्या जीवातली आवड ‘धावणं ‘ हीच आहे. पूर्वी ऍथेलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा चारुदत्त, ऍथेलेटिक्स सोडून बुद्धिबळाकडे का आणि कसा वळला त्याविषयी …
‘अजिंक्य’ कॉलम
आज दिनांक
६/१२/१९९५
नमस्कार मायबोलीकर मंडळी,
मी बरीच वर्षे मायबोलीवर आहे परंतु लिखाण करण्यापेक्षा वाचण्यातच रमते. आज अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताला सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली. त्या निमित्त चारुदत्त जाधव या व्यक्तिमत्वाचा परिचय माझे पती श्री उदय ठाकूरदेसाई यांनी त्यांच्या वेबसाइट वर लिहिला आहे. तो मायबोलीकरांपुढे ठेवत आहे. प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत !
कमल
----------------------------------------------------------------------
डिसेंबर आणि जानेवरी महिन्यात काही कामानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसराचे दर्शन झाले होते. ह्या भटकंती दरम्यान आम्ही त्या प्रदेशातील छोटेखानी अश्या किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. जमिनीवर अथवा समुद्र किनारी असलेल्या ह्या किल्ल्यांनी आमच्या मनाला भुरळ घातली.
मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.