रेस

हॉलिवूडचा जो जीता वही सिकंदर

Submitted by धनि on 18 May, 2017 - 23:42

सध्या आमच्या गावात बायसिकल फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. दररोज वेगवेगळे चित्रपट, डॉक्युमेंट्रीज, किंवा शॉर्ट फिल्म्स दाखवत आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही सायकलशी संबंधित. त्यातून मिळणारे पैसे 'बाईक क्लब' या संस्थेला देणार आहेत की जी शाळेतल्या लहान मुलांना सायकल चालवायला शिकवते आणि त्यांना एक एक सायकलही देते. तर काल तिथे 'ब्रेकिंग अवे' असा चित्रपट असणार होता. आता अ‍ॅकॅडमी पुरस्कार मिळालेला चित्रपट आणि सायकलींगवर असणारा म्हटल्यावर सोनेपे सुहागा म्हणत आम्ही हजेरी लावली. चित्रपटाबद्दल तसे म्हटले तर फार काही माहिती नव्हती.

Subscribe to RSS - रेस