वेग

रांगणं, वेग आणि आयुष्य

Submitted by भक्तिप्रणव on 27 October, 2014 - 05:45

|| १ ||

चालता मलाही आलं असतं....
पण धरायला बोट नव्हतं...
मग रांगण्यातच रमलो !!!

|| २ ||

वेगाला सहज म्हंटलं,
सायकलने जा लवकर पोहोचशिल..
छद्मी हसला, म्हणाला,
मला मुळी कुठे पोहोचायचच नाहीये !!!

|| ३ ||

आयुष्याला एकदा गाठलच,
बकोटच धरलं,
तर लबाड म्हणतो कसा...
वेगळ्या विषयावर बोलू काही !!!

सन्दीप मोघे

शब्दखुणा: 

मला पोलिस पकडतो तेव्हा.... भाग ३

Submitted by मोहना on 16 May, 2011 - 13:09

त्या दिवशी टिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही. नवर्‍याच्या मागे पोलिस लागतात याचा बायकोला मिळणारा आनंद काही निराळाच. पोलिस पुराव्यानिशी सिद्ध करतात सारं त्यामुळे 'हॅट, काहीतरीच काय' असं म्हणून बायकोला झटकता येतं तसं तिथे करुन भागत नाही. नवर्‍याच्या मते पोलिस विनाकारण त्याच्या मागे लागतात, माझ्या मते सकारण. पण हा नेहमीचाच वादाचा मुद्दा. तोही मी सोडून दिला होता हल्ली. माझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नसतानाही मी आजकाल खुषीत गाणी गुणगुणायला लागले होते.

गुलमोहर: 

मला पोलिस पकडतो तेव्हा..... भाग २

Submitted by मोहना on 12 May, 2011 - 10:03

त्या दिवशीची ती सुप्रभातीची सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता :-). त्याचं असं झालं, मी खूप सराव केला, परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्‍यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण मला बघितल्यावर तेच घाबरले.

"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून मला खो खो हसायला यायला लागलं.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - वेग