काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मध्यमवर्गीय लोकांना एखादी वस्तु खरेदी करताना तिचे फायदे आणि तोटे स्वत: जाणून घेतल्या शिवाय करमत नाही. मला एखादी वस्तू घेताना चांगला सल्ला दिला तरी मी माझी पडताळणी करतो आणि वस्तु का चांगली यांची शहानिशा करतो. वस्तुचे विशेष गुण आणि मूल्य आपल्याला अंदाजपत्रकात बसतेय का ह्याची सुद्धा गुण पडताळणी करणे गरजेची असते. अश्या प्रकारे कधी-कधी २ वस्तु पैकी एक खरेदी करताना खुप सावळा गोंधळ उडतो. वस्तुचे एखादे गुण विशेष आपल्या गरजेचे आहे का ऐषाआरामा साठी आहे हे ठरवताना गोंधळ उडतो.
टेस्ला च्या कार विकण्यासंबंधी एक लेख नुकताच वाचला. मी पूर्वी टाटा मोटर्स (तेव्हाची "टेल्को") मधे काही वर्षे काम केलेले असल्याने एकूणच ऑटो इण्डस्ट्री तील बातम्यांबद्दल अजूनही कायम कुतूहल असते. तेव्हा मी टेल्को च्या सॉफ्टवेअर डिव्हिजन मधे सप्लाय चेन एरिया मधे - वाहने बनवायला लागणारा माल सप्लायर्स कडून कंपनीत येण्याबद्दलची प्रक्रिया- काम करत होतो. पुण्यातील प्लॅण्ट्स मधे उत्पादनावर जास्त फोकस होता.
माझा गेल्या काही काळात, अमेरिकेत पूर्व किनार्यावर, एका कार अक्सिडेन्टच्या केसशी जवळून संबंध आल्यामुळे, थोडाफार कायदेविषयक अनुभव आहे. इथे मराठी टायपिंग करणे माझ्यासाठी अतिकठिण असल्यामुळे लिहिण्यास फार फार वेळ लागतो. त्यामुळे सविस्तर लिहू शकत नाही. कोणाला या संदर्भात काही मदत हवी असल्यास आपला मोबाईल नंबर व्यनि करावा. शक्य ती सर्व मदत केली जाईल.
भरपूर इंश्योरन्स कंपन्या बाजारात आहेत. प्रत्येकाची काहीतरी खासीयत आणि प्रत्येक कंपनीची जाहीरातबाजी.
तर, कारचा (पर्सनल व्हेइकल) इंश्योरन्स पुढल्या महिन्यात रिन्यू करावयाचा आहे. खाली दिलेला धागा + अजून बाकी साईट्स चाळून झाल्या आहेत. पण तरीही कनफूजन आहेच.
- कुठल्या कंपनीचा करावा? शक्यतो हॅसल फ्री अन क्लिअर गाइडन्स मिळावयाची अपेक्षा. तसेच सर्वीसबाबतीतही.
- गाडी हायपोथिकेशन वर असल्यास झिरो डेप्रिसिएशन घेणं आवश्यक असतं का? (तसाही मी तो करेन पण एक माहीती म्हणून)
- अजून काय काय अॅड-ऑन घ्यावे?
- एनसीबी बोनस, Voluntary Discount याबद्दलही माहीती
साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.
***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<
आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.
यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.