कारमध्ये शिरेलेले डास कसे घालवावेत?

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 February, 2018 - 06:31

काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मग मी सगळ्या काचा उघड्या ठेवून कार ऑफिसला घेउन गेलो, वाटले हवेने जातील निघून. काही वेळाने बहुतेक डास निघुन गेले असे वाटले. ऑफिसमध्ये आल्यावर मग सगळ्या काचा बंद केल्या. पण आता थोड्यावेळा पूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते म्हणुन कार काढली तेव्हा लक्षात आले की अजून भरपूर डास आहेत कारमध्ये. परत काचा उघड्या ठेवून गेलो, तेव्हा निघुन गेले असे वाटले. परत आल्यावर थोड्यावेळाने पाहिले तर डास भरपूर आहेत कार मध्ये.

हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, त्यामुळे तसे करणार नाही.

दुसरा काय उपाय करता येईल कारमधून डास घालवायला, जेणे करुन गाडीत उग्रवास रहाणार नाहीत? कुणाला काही सुचते का सांगा.

सिरियस प्रॅक्टीकेबल उत्तरांची अपेक्षा आहे, पण मनोरंजक गमतीदार उत्तरेपण चालतील.

आगाउ धन्यावाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, >>>>> घरी येताना, कारमधे हिट स्प्रे मारा.काचा बंद करायची दक्षता घ्या.दुसर्‍या दिवशी हिटचा वास रहाणार नाही.

कार मध्ये रेडीयो असल्यास रविवारी "मन की बात" मोठ्या आवाजात लावा. (लावून तुम्ही बाहेर पडा आणि काचा पुर्ण बंद करा)
रेडियो नसल्यास युट्युबवरून जुने रेकाॅर्ड करून लावा

परिणाम तुम्हाला ठाऊक आहे Wink

हा धागा विडंबन नसावे, असे समजून लिहीतेय.
१. कम्फर्ट नावाची उदबत्ती तिथे मिळत असेल तर लावा. त्याने डास मरतात. हिरवे पाकीट येते (१०/१२/१५ रू दुकानाप्रमाणे). कापूर, लेमनग्रास पासून बनते असे लिहीलेय... खरे खोटे माहीत नाही, पण डास मरतात खरे.
२. धूप स्टिक पेटवून गाडीत धूर करा. उदबत्तीसारखे सुकी धूप स्टिक न घेता, चिकटवाली घेतली तर धूर जास्त मिळेल आणि पणतीत वगैरे तळ दाबून बसवून, सेफली उभी करता येईल.
३. याच धूप स्टिक मध्ये थोडा कापूर चुरून / लेमनग्रास तेल मिक्स करून पुन्हा क्लेसारखे मळून, वळून घेऊन लावा.
४. कापूर पाण्यात विरघळतो. जरा जास्त कापराचे स्ट्राँग पाणी करून स्प्रे करता येईल. पाणी थोडे गरम करून बाटलीत भरून कापूर चुरा घालून हलवून लौकर मिक्स होईल. याने जर गेले तर पुन्हा येऊ नयेत म्हणून गाडीत कॅम्फर कोन ठेवता येतील. तयार मिळतात.
५. निंबोळीचे तेल (नीम तेल) घेऊन वात/ दिवा लावायचा. दरवाजे बंद ठेवायचे. त्यानेही मरतात. पण गाडीत तेवती ज्योत सेफ नाही. याचा वास मात्र विचित्र येतो. नंतर सुगंधी स्प्रे मारावा लागेल.

थोडक्यात नीमतेल, कापूर, लेमनग्रास तेल --- यापैकी कशाचाही धूर / वाफ पसरवणे, गाडीसाठी ज्या सुरक्षित पद्धतीने जमेल त्याप्रमाणे.

अरे लोकांनो आधी गाडी पेट्रोलवाली आहे की गॅसकिटवाली ते कर विचारा?
धुप घ्या, अरबत्ती पेटवा, धुर काढा हे उपाय गॅसकिट लावलेल्या कार मध्ये कराल तर डासांसकट कार पण निघून जाईल.

श्या. ती माबो राहिली नाही हेच खरे.

अहो सगळ्यात बेसिक इलाज म्हणजे किमान शब्दांत कमाल अपमान करा त्यांचा. निघून जातील.

दत्तू यांचा मंकीबाथ हा मॉडर्न इलाजही चांगला आहे.

कुणीतरी गुबगुबीत व्यक्ती अंगाला फेविकॉल लावून गाडीत १५ मिनिटे बसवा आणि दारे बंद करून घ्या. डास येऊन चिकटून बसतील. मग त्या व्यक्तीला बाहेर काढून एक एक डास ओढून काढा. आणि मारा

आपल्या कपड्यांवर लावायला एक लिक्विड छोटी बाटली मिळते ती मी ठेवते पर्समध्ये. त्यावरचं नाव गेलंय नाहीतर लिहिलं असतं, डास शिरल्यावर ते आम्ही लावून घेतो एक दोन थेंब घातलेल्या ड्रेसवर मग आपल्याला चावत नाही. एरवी हिट छोटं जवळ ठेवावं का नाही समजत नाही. पूर्वीची मारुती ओमनी होती तेव्हा आम्ही छोटा हिट स्प्रे बरोबर ठेवायचो पण आता एसी असल्याने समजत नाही. पण काळे हिट बेस्ट.

आम्ही कॅरम खेळताना एक उपाय करायचो तो सांगतो. पावसाळ्यात खूप डास मच्छर जमा व्हायचे. तर कोणाकोणाला आणि किती जणांना मारणार. म्हणून आम्ही हळून एखाद्याला पकडायचो आणि त्याचा पार्श्वभाग बल्बला चिकटवून चटका देऊन सोडायचो. तो जाऊन ईतरांना हे सांगायचा. असे दोनतीनदा घडल्यास त्या डासांच्या दोनचार पिढ्या तरी पुन्हा तिथे फिरकत नाहीत. उपायचा उपाय, आणि डासाला चटका द्यायचा आसुरी आनंद मिळतो तो वेगळाच Happy

म्हणून आम्ही हळून एखाद्याला पकडायचो आणि त्याचा पार्श्वभाग बल्बला चिकटवून चटका देऊन सोडायचो.>>>>

तुला किती चटके मिळाले? Wink

मच्छर उलटून आपल्याला चटके देत नाहीत म्हणून तर हा उपाय..
नाहीतर उद्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला एखाद्या कुत्र्याला पकडून बल्बचा चटका द्यायला जाल..
असो, कुत्रे गाडीत शिरत नसल्याने अवांतर चर्चा नको..

ऑन ए सिरीअस नोट ..
पाल मच्छर खाते.. एम आई राईट?

कारमध्ये एखादी पाल सोडून बघा..
तसेच उद्या कारमध्ये शिरलेली पाल बाहेर कशी काढावी याचा वेगळा धागा काढायला नको म्हणून तिला एका दोरीने बांधून सोडा.. काम झाले की पटकन दोरी खेचून घ्यायची. तसेच तिची एक्सरे सोनोग्राफी वगैरे करता आली तर तिने किती मच्छर खाल्लेत हे सुद्धा चेक करता येईल.

एक टिप - जर एखादी पाल पकडून तिला दोन दिवस उपाशी ठेवून मग कामाला जुंपले तर जास्त परीणामकारक ठरेल.

अजुनही डास गेले नसतील तर त्यांना माबोवरील सध्या चालू असलेल्या ज्वलंत चर्चा वाचून दाखवेन अशी धमकी द्या.

>>जर एखादी पाल पकडून तिला दोन दिवस उपाशी ठेवून मग कामाला जुंपले तर जास्त परीणामकारक ठरेल.<<

कायच्याकाय उपाय. सगळे डास खाऊन त्या पालीची मगर झाली तर पुढे निस्तरनार कोण?

<कारमध्ये एखादी पाल सोडून बघा..
एक टिप - जर एखादी पाल पकडून तिला दोन दिवस उपाशी ठेवून मग कामाला जुंपले तर जास्त परीणामकारक ठरेल.
>

मस्त उपाय. उत्तम बिझिनेस आयडीया ही. सध्याचे डास कशालाही जुमानत नाहीत. त्यावर पाली पाळून डासनिर्मूलनाचा अभिनव उपाय कदाचित काम करेल.
पण मच्छर उडू शकतात आणि पाली नाही. पालींना ट्रेनिंगही द्यावं लागेल.
सध्या भारतात स्वयंरोजगारनिर्मात्यांना मानाचे दिवस आले आहेत. या नव्या व्यवसायासाठी स्टार्ट अप इंडिया अंतर्गत बीज भांडवल मिळतं का ते पहायला हवं.

<सगळे डास खाऊन त्या पालीची मगर झाली तर पुढे निस्तरनार कोण?> हे काय विचारणं झालं? बालनरेंद्रच्या गोष्टी वाचल्या नाहीत का तुम्ही? त्यांचे असंख्य अनुयायीही आपल्या आदर्शाचे अनुकरण करीत आता मगरी पकडण्याचा सराव करू इच्छीत आहेत. मगरींचा तुटवडा हाच एक प्रश्न होता. तोही सुटेल.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद. माहितीपण मिळतेय आणि मजापण येतेय वाचायला. Happy

मी काल संध्याकाळी गुडनाईट फास्ट कार्ड्स आणले. ते कारमध्ये प्लेट ठेवुन दोन कार्ड्स जाळले, काचा उघड्या ठेवुन. बरेच डास बाहेर उडून गेले, काही मरुन पडले. धूर कमी झाल्यावर काचा बंद केल्या. मग दोनेक तासांनी घरी निघालो तेव्हा लक्शात आले की धूराचा वास गाडीत भरलाय आणि अजूनही बरेच डास शिल्लक आहेत. काचा उघड्या ठेवुन घरी आलो तरी वासाने डोके जरा भणभणलेच.

तेव्हा परत आत हिट स्प्रे किंवा कार्ड्स जाळण्याचा विचार करणार नाही.

कारवी बरेच उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद, पैकी कापराचे कोन आणुन ठेवेन गाडीत.

मला व्यत्यय यांनी सुचवलेला उपाय सुद्धा प्रॅक्टिकल वाटतोय, पण चार दिवस गाडी बंद ठेवण्यापेक्शा सस्मित यांनी सांगितल्याप्रमाणे ओडोमॉस लावुन गाडी चालवायचा विचार करतोय. त्यानेही ते चावणार नसल्याने त्यांची उपासमार सुरु राहील. आज सुटी असल्याने कार काढली नाही. सकाळी कार उघडून बघितले, वास आणि डास दोन्ही आहेत.

वास घालवायला कारवींचे धूप / कापराचे उपाय करण्याचाही विचार आहे, डासही अजून कमी होतील.

परत एकदा सर्वांचे धन्यवाद.

(सेलफोनवरुन क्शितिजातला क्श येत नाहीय म्हणुन क्श वापरावा लागला, त्याबद्दल क्शमस्व.)

डास घालवण्यासाठी गाडी 2 3 तास कडक उन्हात खिडक्या उघड्या ठेऊन उभी करणे हा उपाय करून पाहता येईल

सीटकवर्स कापडी/स्वीड ची असतील तर धुराचा वास सहजासहजी जाणार नाही, कव्हर्स काढून धुणे/ ड्रायकलीन करणे हा एकच उपाय आहे,

Pages