कारमध्ये शिरेलेले डास कसे घालवावेत?

Submitted by मानव पृथ्वीकर on 17 February, 2018 - 06:31

काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मग मी सगळ्या काचा उघड्या ठेवून कार ऑफिसला घेउन गेलो, वाटले हवेने जातील निघून. काही वेळाने बहुतेक डास निघुन गेले असे वाटले. ऑफिसमध्ये आल्यावर मग सगळ्या काचा बंद केल्या. पण आता थोड्यावेळा पूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते म्हणुन कार काढली तेव्हा लक्षात आले की अजून भरपूर डास आहेत कारमध्ये. परत काचा उघड्या ठेवून गेलो, तेव्हा निघुन गेले असे वाटले. परत आल्यावर थोड्यावेळाने पाहिले तर डास भरपूर आहेत कार मध्ये.

हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, त्यामुळे तसे करणार नाही.

दुसरा काय उपाय करता येईल कारमधून डास घालवायला, जेणे करुन गाडीत उग्रवास रहाणार नाहीत? कुणाला काही सुचते का सांगा.

सिरियस प्रॅक्टीकेबल उत्तरांची अपेक्षा आहे, पण मनोरंजक गमतीदार उत्तरेपण चालतील.

आगाउ धन्यावाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डास जी अंडी घालतात त्याचे ऑमलेट करता येते का? चवीला कसे असते? कोणी खाल्लेय का ईथे? त्यातले काही औषधी गुणधर्म, प्रोटीन्स विटामिन्स वगैरे? हळूहळू डास पाळायचे आणखी फायदे समोर येत आहेत.

डासांची संख्या फार झपाट्याने वाढते, हळुहळु पाळता येतील असे वाटत नाही. तेव्हा आधी त्यांच्या फॅमिली प्लानिंगबद्दल जरा संशोधन कर आणि मग पाळ. तुझ्या प्रोजेक्टला हार्दिक शुभेच्छा.

>>ऋन्मेषच्या कमेंट्स आजकाल फारच बोरिन्ग होत चालल्यात

+१
चालायचंच, तेजस्वी तारा म्हटला की निखळायचाच.

>>जर एखादी पाल पकडून तिला दोन दिवस उपाशी ठेवून मग कामाला जुंपले तर जास्त परीणामकारक ठरेल.<<

कायच्याकाय उपाय. सगळे डास खाऊन त्या पालीची मगर झाली तर पुढे निस्तरनार कोण?
>>>>>>>>>>>>> हा हा हा हा हा हा हा हा

ऋन्मेषच्या कमेंट्स आजकाल फारच बोरिन्ग होत चालल्यात >> Proud हे काय मध्येच..
पण खरं असेल.. आयुष्यात लाईफमध्ये टेंशन आहे आजकाल.. ते विचारांत लिखाणात उतरत असावे..

अवांतर अबाऊट टॉपिक - आज पीके लागलेला. त्यातील एक सीन पाहून हा धागा आठवला.

मी केव्हाची कारमधे शिजलेले डोसे कसे घालावेत असं वाचतेय >>>>>>> हो गं , मी पण >>> आणि मी हे पटकन कारमध्ये भिजलेले मोजे कसे घालावेत असे वाचले Happy

पण खरं असेल.. आयुष्यात लाईफमध्ये टेंशन आहे आजकाल.. ते विचारांत लिखाणात उतरत असावे..>>>>>>
Du i वापरणे सोडून दे, निम्मं टेन्शन कमी होईल,
आणि काही करून माझीच टांग वर असली पाहिजे हा हट्ट सोड उरलेले निम्मं पण जाईल Wink

सिंबा, टेण्शन काय आहे तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही उपाय काय सुचवताय ..
कॉलेजवयात आपल्याला दोनच टेण्शन असतात.. परीक्षा आणि प्रेम..
कॉलेज सुटल्यावर परीक्षेच्या टेंशनची जागा पैसा कमावणे घेते आणि प्रेमाचे टेंशन तसेच कायम राहते..
मला सध्या हेच दोन टेंशन आहेत.. पैसा आणि प्रेम..
पैसा हे माझ्यासारख्या सदासंतुष्ट आणि समाधानी माणसाचे टेण्शन कधी होईल हे मला स्वप्नातही वाटले नव्हते..
पण आता प्रेमासाठीच पैसा हवा आहे Sad

विचार करतोय धागा काढावा......

>> पण आता प्रेमासाठीच पैसा हवा आहे Sad
>> विचार करतोय धागा काढावा......

धागा काढून उपयोग नाही. लोकांकडून एफडी घेणे किंवा बँकेकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग घेणे असे काहीतरी करावे लागेल.

>> पण आता प्रेमासाठीच पैसा हवा आहे Sad
>> विचार करतोय धागा काढावा...... >>>>
लगे रहो रून्म्या ! मायबोली बोरिंग झालंय असं काही पब्लिक म्हणू लागलीया..... अन् पब्लिक तु्या धाग्यावर धमाल करत्यात ... होऊन जाऊ दे.. टीपी करायला हा धागा ब्येष्ट्य

धागा काढून उपयोग नाही. लोकांकडून एफडी घेणे किंवा बँकेकडून लेटर ऑफ अंडरटेकिंग घेणे असे काहीतरी करावे लागेल.>> Lol

तरीपण टिपी करायल धागे काढता येतील...
पैश्यासाठी प्रेम कि प्रेमासाठी पैसे?
पैश्याविना प्रेम कसे टिकवावे?
प्रेम प्रेम प्रेम- निभवणे, टिकवणे
पैसा पैसा पैसा-कमवणे, जमवणे, टिकवणे

च्रप्स Lol

आणि कार मध्ये अंडी कुठे घालवीत हा सुद्धा निघाला असेल.

मला आलेला अनुभव म्हणजे माशा शिरतात कधी कधी कारमधे, अगदी पिटुकल्या आणि त्या सुद्धा डॅशबोर्ड आणि फ्रण्ट ग्लासच्या भागात फिरत राहतात. किती हाकला हाकला, फिरी येतात आतल्या काचेवरी असे होते. Sad
मग जरा वेळ काचा उघड्या ठेवून गाडी चालवली की जातात. पण नाही गेल्या तर हा धागा उपयुक्त आहे उपायांसाठी.

जाऊ द्याना डास निघत नसतील तर भाडे मागा त्यांच्याकडून. डिपॉझिट घ्यायला विसरू नका.>>>> बघ रे रुन्मेष, तुला पैसे कमावण्याचा सोपा मार्ग!

वत्सला, जर माझी गरज थोडीथोडकी असती तर माझी मुंबईत तीन घरे आहेत. त्यातील दोन घरे डास, झुरळ, पाली या सर्वांमा भाड्याने दिली असती. पण माझी सध्याची गरज एका उच्च मध्यमवर्गीय मुंबईकराला टेंशन यावे ईतकी आहे..

परत कारमध्ये डास शिरले आहेत.
काल संध्याकाळी आईला रुटीन चेकअप साठी घेऊन गेलो होतो, कार बेसमेंट मध्ये पार्क केली होती. परत निघताना अंधार झाला होता आणि बेसमेंट मध्ये डास होते बरेच. मी एकटा असतो तर पटकन कारमध्ये शिरून दार बंद केलं असतं. पण आईला बसवून दार लावायला जरा वेळ लागला, मग मी बसलो आणि गाडी काढल्यावर लक्षात आले की बऱ्याच डासांनी कारमध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवलाय.

तर आता टाईमपास फ्रॉम होम सुरू असल्याने आठवडाभर कार बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेर जायला सायकल किंवा दुचाकी वापरणार.

आठवड्याभरात डास उपासमारीने धारातीर्थी पडतील अशी अपेक्षा आहे. बघु.

खरेच याची नितांत गरज आहे. अनेकदा डास कारमध्ये शिरतात आणि त्यांना आपल्याला चावण्याशिवाय पर्याय राहत नाही. कार मध्ये ओडोमॉस ठेवणे हा एक उपाय आहे. कारसाठी कार बॅटरीवर चालणारे मच्छरपरतावक बनवण्यासाठी गुडनाईट ऑलआउट इत्यादी कंपन्यांमध्ये कदाचित अजून संशोधन सुरू असेल.

अहो पण जर गाडीत भरपूर अंडी घालती तर?
आठवड्याभरात काही होणार नाही. महिनाभर बंद ठेवलीत तर काही चान्स आहे.

उन्हाने कार तापून मरतील ना , का निबरेत हायद्राबादी डास ?
खिडक्या उघडून जोरात चालवत गेले तर, आम्ही हेच करतो पण एखाद्या डासासाठी.

अमितव: डासांची अंडी हॅच व्हायला पाणी लागते ना?
म्हणजे आठवड्या भराने गाडी वापरता येईल पण आतमध्ये पाणी सांडता कामा नये काही महिने.

अस्मिता: ऊन कोळून प्यालेले डास आहेत हैद्राबादचे. मागच्या वेळी करून पाहिले होते, नाही मेले उन्हाने.

अ‍ॅना फिलीप्स ही मादी मलेरियाची अंडी घालते. त्यामुळे सर्व फिलीप्स आडनाव सांगणा-या डासांचे फॅमिली प्लॅनिंग केल्यास मलेरीया सुद्धा आटोक्यात येईल.

पाल डास खाते
एखादी मोठी पाल गाडीत सोडून ठेवता येईल.

Pages