काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मग मी सगळ्या काचा उघड्या ठेवून कार ऑफिसला घेउन गेलो, वाटले हवेने जातील निघून. काही वेळाने बहुतेक डास निघुन गेले असे वाटले. ऑफिसमध्ये आल्यावर मग सगळ्या काचा बंद केल्या. पण आता थोड्यावेळा पूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते म्हणुन कार काढली तेव्हा लक्षात आले की अजून भरपूर डास आहेत कारमध्ये. परत काचा उघड्या ठेवून गेलो, तेव्हा निघुन गेले असे वाटले. परत आल्यावर थोड्यावेळाने पाहिले तर डास भरपूर आहेत कार मध्ये.
हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, त्यामुळे तसे करणार नाही.
दुसरा काय उपाय करता येईल कारमधून डास घालवायला, जेणे करुन गाडीत उग्रवास रहाणार नाहीत? कुणाला काही सुचते का सांगा.
सिरियस प्रॅक्टीकेबल उत्तरांची अपेक्षा आहे, पण मनोरंजक गमतीदार उत्तरेपण चालतील.
आगाउ धन्यावाद!
गाडी विकून टाका.
गाडी विकून टाका.
गाडी विकून टाका हा सल्ला ऐकून
गाडी विकून टाका हा सल्ला ऐकून एक श्रीदेवी अनिल कपूरचा पिक्चर आठवला. त्यात श्रीदेवीच्या गाडीत डास शिरतो म्हणून ती गाडी जाळून टाकते. अगदी काहीही हं श्री सीन होता.
मग पुन्हा कधीतरी एके दिवशी श्रीदेवीलाच डास चावतो. मग तो चावट अनिल कपूर तिला विचारतो, आत्ता गं बया?
>>>पण यंदा हैद्राबादला अद्याप
>>>पण यंदा हैद्राबादला अद्याप कडक उन नाह<<<<<<
हे आधी का नाही सांगितले की डास हैद्राबादचे आहेत म्हणून?
कॉफी देतो सांगून काचा उघड्या ठेवा... बाहेर पडतील.
—-
जोक्स अपार्ट,
गाडी पुसून घ्या लेमन्ग्रास नाहितर लवंग अथवा लेमन तेलाचे थेंब पाण्यात टाकलेक्या बोळ्याने. फॅन चालू ठेवा गाडीचा आणि काचा बंद पण तुम्ही बाहेर.
गाडीचा आतली हवा बाहेर जायच इंडीकेटर ऑन असु द्या.
Submitted by दत्तू on 19
Submitted by दत्तू on 19 February, 2018 23:32 ---
गाडी धुवायला दिली होती आतून
गाडी धुवायला दिली होती आतून बाहेरुन. आताच आणली, डास आणि वास दोन्ही गायब.
मानव सुखीया जाहला.
वाह मस्तच.
वाह मस्तच.
ब्येस्ट!!!!
ब्येस्ट!!!!
ग्रेट! काका आधीच न्यायची ना
ग्रेट! काका आधीच न्यायची ना !
हो ना, आधी ते डोक्यातच आलं
हो ना, आधी ते डोक्यातच आलं नाही बघ.
त्यात श्रीदेवीच्या गाडीत डास
त्यात श्रीदेवीच्या गाडीत डास शिरतो म्हणून ती गाडी जाळून टाकते. अगदी काहीही हं श्री सीन होता.
मग पुन्हा कधीतरी एके दिवशी श्रीदेवीलाच डास चावतो. मग तो चावट अनिल कपूर तिला विचारतो, आत्ता गं बया?>>>>>>
डास शिरतो नाही, दास शिरतो,
गाडी अनिल कपूर, जो तिच्या फ्याक्ट्रीत कामगार असतो तो वापरतो, म्हणून ती चिडते आणि गाडी जाळते
तो सगळा पिक्चरच अप्रतिम अचाट
तो सगळा पिक्चरच अप्रतिम अचाट आणि अतर्क्य आहे.
लाडला बद्दल एक परिक्षण यावे अशी इथल्या दि:गज्जांना विनंती.
लाडला मध्ये एका कामगाराचा हात
लाडला मध्ये एका कामगाराचा हात मशिन मध्ये कापतो म्हणून अनिल कपूर जबरदस्तीने श्रीदेवी ची गाडी घेऊन त्या कामगाराला हॉस्पिटलात घेऊन जातो. मग डॉक्टर स्क्रिप्टेड बोलतात की '२ मिनिट और देर हो जाती तो मुझे उसका हाथ काटना पडता" वगैरे...
आणि परत फॅक्टरीत येतो तेव्हा सिट कव्हर्स ना वगैरे रक्त लागलेले असते ते पाहून श्रीदेवी चरफडत पेट्रोल टाकून तिची कार जाळून टाकते.
हुश्श
अवांतर...
आणि मग अनिल कपूर श्रीदेवील
आणि मग अनिल कपूर श्रीदेवील किस्सी करतो. मग कायतत्री ड्वायलॉगबाजी आता काय करशील बाय ग टाइप
बाप रे. मी बघितला की माहिती
बाप रे. मी बघितला की माहिती नाही हा चित्रपट, बघितला असेल तरी पार विसरलो आहे, नको असले पिच्चर आठवणे.
जरा फेस इधर करना..
जरा फेस इधर करना..
Understand? यु बेटर
Understand? यु बेटर understand!!!!!!!!! ☺️☺️☺️
त्याला धडा शिकवायला ती
त्याला धडा शिकवायला ती त्याच्याशी लग्न करते ना?
त्याला धडा शिकवायला ती
त्याला धडा शिकवायला ती त्याच्याशी लग्न करते ना?>>>
सगळ्या बायका लग्न झाल्यानंतर "नवर्याला" चांगलाच धडा शिकवतात..
डासांचा प्रॉब्लेम सुटला, आता
डासांचा प्रॉब्लेम सुटला, आता नेहमीप्रमाणे वैवाहिक आयुष्यात येणार्या सामुहिक अडचणींवर परिचर्चा होणार..
हो. लाडला की डालडा असाच
हो. लाडला की डालडा असाच काहीतरी पिक्चर होता.
गाडीत शिरलेला तो तिचा डास नव्हे दासच होता. पण काय फरक पडतोय. तिच्यालेखी दोघांची किंमत सारखीच होती.
सस्मित यूह आर राईट. मग अनिल कपूर तिला किसच करतो. आणि बोलतो आज खुश तो बहोत होगे तुम. त्यावर ती काहीतरी ऊई उई उईई ई करते.. मायबोलीवर फॅमिली क्राऊड असतो त्यामुळे पटकन असे किस वगैरे शब्द उच्चारायला जरा संकोचच वाटतो. म्हणून मी किस करतो ऐवजी डास चावतो असे रुपक वापरले.
गाडी विषयाकडे वळवतो.
गाडी विषयाकडे वळवतो.
रात्री घरी येताना दोनेक डास होते गाडीमध्ये.
नॉट अ बिग डिल. इग्नोरास्त्र पुरेसे आहे दोन डासांकरता.
सगळे सल्ले वाचून बटाट्याची
सगळे सल्ले वाचून बटाट्याची चाळ ची आठवण आली. 'उपास'.
आता अल्ट्रासॉनिक मॉसक्विटो
आता अल्ट्रासॉनिक मॉसक्विटो रिपेलेंट ऍमेझॉन.कॉम वर मिळतो, तो गाडीत लावा, डास पळून जातील>>>याने मच्छरांचे माहित नाही पण नको असलेली माणसे मात्र पळून जातात
कालच ओळखितले जोड़पे आले होते एक तास होऊन गेला तरी जाण्याचे नाव नाही
तेवढ्यात हे मशीन लावले...आवाज ऐकून ३ऱ्या मिनिटाला बाय् बाय केले
मायबोलीवर फॅमिली क्राऊड असतो
मायबोलीवर फॅमिली क्राऊड असतो त्यामुळे पटकन असे किस वगैरे शब्द उच्चारायला जरा संकोचच वाटतो. म्हणून मी किस करतो ऐवजी डास चावतो असे रुपक वापरले.>>>>>>> अरे
दोनेक डास होते गाडीमध्ये.
दोनेक डास होते गाडीमध्ये.
नॉट अ बिग डिल. इग्नोरास्त्र पुरेसे आहे दोन डासांकरता>>>>
बघा हो, तो आणि ती असतील, तुम्ही दुर्लक्ष करत आणि 2 चे 200 व्हायला वेळ नाही लागणार
तिला अंडी द्यायला पाणी असलेली
तिला अंडी द्यायला पाणी असलेली जागा लागेल. आणि मी गाडीत पाणी ठेवत नाही. तेव्हा पुढच्या खेपेला दार उघडले की ती बाहेर जाईल जागेच्या शोधात. तिच्या पाठोपाठ तो जाईल.
डास अंडी घालतात ना?
डास अंडी घालतात ना?
त्यासाठी स्वच्छ पाणी लागेल ना?
डेंग्यु चे डास स्थिर स्वच्छ
डेंग्यु चे डास स्थिर स्वच्छ पाण्यात अंडी घालतात.
आपल्या घरातले पूजा कलशातले पाणी, एखाद्या हंड्यात तळाला राहीलेले पाणी, कुंड्यांच्या डिश मध्ये साचलेले पाणी ही परफेक्ट उदाहरणे.
थोडक्यात डेंग्यू चे डास आपल्याला स्वच्छ पाण्याचा अती मोह ठेवू नका, अंतःकरण आणि वॉटर कंटेनर्स निर्लीप्त कोरडे ठेवा आणि गप्पी मासे पाळून ठेवा ही शिकवण देतात.
चला डासांचा प्रॉब्लेम सुटला.
चला डासांचा प्रॉब्लेम सुटला.
<(सेलफोनवरुन क्शितिजातला क्श येत नाहीय म्हणुन क्श वापरावा लागला, त्याबद्दल क्शमस्व.)>
मी आपला ह्याच्यासाठी सल्ला देतो: गुगल अक्षरांतरण वापरा. मायबोलीसारखे टंकता येते.
आणि मग अनिल कपूर श्रीदेवील
आणि मग अनिल कपूर श्रीदेवील किस्सी करतो >>> ती काय कुक्कुलं बाळ असते का ?
Pages