काल रात्री पार्कींगमध्ये कार पार्क केल्यावर एकाबाजूची काच चुकून उघडी राहीली. आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर काय कारमध्ये खूपच डास शिरलेले दिसले. सगळी दारं उघडून फडक्याने डास घालवण्याचा प्रयत्न केला, बरेच गेले पण बरेच या सीट खालून त्या सीट खाली, दाराला असलेल्या सामान ठेवायच्या खोबणीत जाऊन बसू लागले.
मग मी सगळ्या काचा उघड्या ठेवून कार ऑफिसला घेउन गेलो, वाटले हवेने जातील निघून. काही वेळाने बहुतेक डास निघुन गेले असे वाटले. ऑफिसमध्ये आल्यावर मग सगळ्या काचा बंद केल्या. पण आता थोड्यावेळा पूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते म्हणुन कार काढली तेव्हा लक्षात आले की अजून भरपूर डास आहेत कारमध्ये. परत काचा उघड्या ठेवून गेलो, तेव्हा निघुन गेले असे वाटले. परत आल्यावर थोड्यावेळाने पाहिले तर डास भरपूर आहेत कार मध्ये.
हिट स्प्रे वगैरे मारला तर खूप वास येईल व गाडी चालवणे अशक्य होईल कित्येक दिवस, त्यामुळे तसे करणार नाही.
दुसरा काय उपाय करता येईल कारमधून डास घालवायला, जेणे करुन गाडीत उग्रवास रहाणार नाहीत? कुणाला काही सुचते का सांगा.
सिरियस प्रॅक्टीकेबल उत्तरांची अपेक्षा आहे, पण मनोरंजक गमतीदार उत्तरेपण चालतील.
आगाउ धन्यावाद!
पण मच्छर उडू शकतात आणि पाली
पण मच्छर उडू शकतात आणि पाली नाही. पालींना ट्रेनिंगही द्यावं लागेल.
>>>
कसलं ट्रेनिंग? उडायचे?
की बेचकी चालवून मच्छर मारायचे..??
उगाच आपलं काय ते..
चर्चा सिरीअसली होतेय तर होऊ द्या ना.. दर धाग्यावर काय ती मजामस्करी..
मच्छर उडताहेत तर उडू द्या. आयुष्यभर ता उडत राहणार नाहीत ना.. बसला की खाल्ला पटकन.. पालींना कळतं बरोबर ते.
असो, धाग्यात राजकारण आलेच आहे तर.. स्वच्छ भारत कर भरत असाल तर त्याची कागदपत्रे घेऊन जवळच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.. जर मच्छर असे बिनबोभाट गाडीत शिरत असतील तर काय अर्थ आहे.. त्यांना रोखणे किंबहुना त्यांची उपज होऊ न देणे हे सरकारचे काम आहे. पैसे कसले घेतात..
स्वच्छ भारत कर भरत >> आता
स्वच्छ भारत कर भरत >> आता त्या बिचार्या भरत. ह्यांना एकट्यालाच का बरं ही जबाबदारी दिलीस?
(No subject)
भास्कराचार्य
भास्कराचार्य
सिम्बा काल माझी गाडी दिवसभर उन्हात होती. पण काचा बंद होत्या. उद्या उन्हात काचा खाली करुन ठेवेन. पण यंदा हैद्राबादला अद्याप कडक उन नाहीय.
वैजाग ला समुद्रकिनारी जाऊन
वैजाग ला समुद्रकिनारी जाऊन काचा उघड्या ठेवा.. खाऱ्या वाऱ्यांमध डास टिकत नाहीत.
वायझॅग खूप लांब आहे हो इथुन.
वायझॅग खूप लांब आहे हो इथुन.
पण खाऱया वाऱयात डास टिकत नाहीत हे बरोबर नाही.
त्रिवेंद्रमला / कन्नुरला ऐन समुद्र किनारी राहीलोय भरपूर डास आहेत.
भास्कराचार्य
भास्कराचार्य
खाऱ्या वाऱ्यांमध डास टिकत नाहीत. >>> हे धादांत खोटे आहे. तुम्ही डासांच्या बाजूने आहात की मानव पृथ्वीकरांच्या? जसे मासे दोन प्रकारचे असतात, गोड्या पाण्यातले आणि खार्या पाण्यातले. तसेच डासही दोन प्रकारचे असतात. यातील दुसर्या प्रकारच्या डासांसाठी खारे वारे, खारी खाडी, हे तर नंद न वन असते. असा काही सल्ला द्याल तर ईतके डास जमा होतील की डास तुमच्या कारमध्ये शिरले आहेत की तुम्ही डासांच्या हे समजेनासे होईल त्यांना .. गंमत आपल्या जागी ठिक आहे, पण असले घातक सल्ले नका ओ देऊ..
आणि एवढे पेट्रोल जाळून वायझेडला जाण्याऐवजी त्यात ते डासच नाही का बसल्याजागी जाळता येणार..
आता अल्ट्रासॉनिक मॉसक्विटो
आता अल्ट्रासॉनिक मॉसक्विटो रिपेलेंट ऍमेझॉन.कॉम वर मिळतो, तो गाडीत लावा, डास पळून जातील
Hit चा डासांचा spray बेस्ट
Hit चा डासांचा spray बेस्ट उपाय आहे. स्प्रे मारुन अर्धा-एक तास कार बंद करायची. एखाद्या तासांनी सगळ्या खिडक्या उघडून 10-15 मिनिटे कार चालवून आणायची. कार सुरु करायचा आधी एखादा आवडता room फ्रेशनर स्प्रे मारायचा, Hit chya fumes साठी.
वायझेडला जाण्याऐवजी त्यात ते
वायझेडला जाण्याऐवजी त्यात ते डासच नाही का बसल्याजागी जाळता येणार..>>>>>
वायझॅग ला जाण्याबद्दल सल्ला होता रे...
गाडी वॉशिंग सेंटर ला घेउन जा.
गाडी वॉशिंग सेंटर ला घेउन जा...आतुन पन स्प्रे मारुन धुवायला सांगा...पाण्याच्या तीव्र स्प्रे मुळे जातील निघुन सगळे डास.
तुम्ही एकटेच कार मधुन ये-जा
तुम्ही एकटेच कार मधुन ये-जा करता का? तसे असेल तर ४-५ दिवस स्वतःला ऑडोमोस लावका, खिडक्या लावून कार वापरा. उपाशी मेल्यावर गायब होतील.
कार स्वच्छ धुवुन घ्या. आतुनही
कार स्वच्छ धुवुन घ्या. आतुनही सीट कवर पायखलचे शीट वैगेरे.
सुगंधी फवारा अम्बी पुर सारखा असेलच.
नसेल तर नवा घेताना लेमन वैगेरे घ्या. फक्त लवेंडर जस्मिन असे सुगंध घेण्यापेक्षा.
हो, बहुतेकवेळा एकटाच ये जा
हो, बहुतेकवेळा एकटाच ये जा करतो ऑफिसला. आज ऑडॉमॉस लावून आलो, तरी मानेला एक दोन चावले, मानेला ओडोमॉस लावायला विसरलो. फास्टकार्डच्या धूराचा वास मात्र अजून चांगलाच दरवळतोय. सुवासीक धूपाचा धूर सोडला लंच टाईमला कार मध्ये, बाहेरुनच. एखादा चांगला डीओ घेउन मारतो संध्याकाळी. कापराचे कोनही बघतोय.
डासांचं तोंड उघडून त्यात
डासांचं तोंड उघडून त्यात कापूस कोंबा. मग ते श्वास अडकून मरतील.
भास्कराचार्य, काल माझ्या
भास्कराचार्य , काल माझ्या डोक्यात ही कल्पना आली होती. कापूस घेउन एक डास पकडला आणि त्याचे तोंड उघडावे म्हटले तर त्याच तोंड कुठे सापडेना. मग लक्षात आले की त्याला इतर किटकांसारखे तोंड नाही. त्याजागी ती दंश करणारी सोंड आहे. त्याचे ओपनींग इतके बारीक होते, की कापसाची एक तार काढुन सुईत धागा ओवल्याप्रमाणे त्यात ती टाकावी लागली. काम फत्ते झाल्यावर त्याला सोडले, तेव्हा त्याने जोराची एक शिंक दिली आणि कापसाची तार हवेत घरंगळु लागली, मग तो उडून गेला. ढेकणांसाठी हा उपाय प्रभावी ठरु शकेल, डासांसाठी नाही.
मानव रात्री काळं हिट मारून
मानव रात्री काळं हिट मारून संपुर्ण कार च्या काचा बंद करून टाका.
सकाळी ऑफिस ला जाण्या अगोदर १५ मिनिटं काचा उघडून ठेवा. आणि अगदी निघताना आधी आवडता स्प्रे मारा.
काळ्या हिट चा आपल्याला त्रास काही होत नाही. पण डासांवर प्रभावी आहे.
दक्षिची आयडीया मस्त आहे.
दक्षिची आयडीया मस्त आहे.
डासांची सोंड तोडा दहशत बसेल
डासांची सोंड तोडा दहशत बसेल डासाना
झेंडूची फुले आणि कडुलिम्बाची पाने ठेवा गाडीत
गाडी धुवायला द्यायची हो, तिथे
गाडी धुवायला द्यायची हो, तिथे दहा मिनिटात प्रेशर एअर मारून सगळे डास पळून गेले असते, इतकी झंझट गरजेची नाही
स्मिता श्रीपाद आणि मेघपाल,
स्मिता श्रीपाद आणि मेघपाल, गाडी धुवायला देण्याचा ऑप्शन लक्षातच नाही आला. उद्या तेच करतो.
दक्षिणा, कारमध्ये वास खूप टिकुन रहातो आणि मला त्याने डोके भणभण्याचा त्रास होतो त्यामुळे हिट स्प्रे मारायला धजावत नाही.
मानवा, येत्या रविवारी
मानवा, येत्या रविवारी गाडीच्या काचा उघड्या ठेवून माझ्याकडे या गाडी घेऊन! बघुया कसे डास रहातात ते! आणि ती डास दिवाळी!
रविवार असल्याने हैदराबादेतील रहादारी पण शांत असेल आणि प्रदुषण देखिल त्यामुळे काचा उघड्या ठेवता येतील!
कृष्णा येत्या विकांताला मी
कृष्णा येत्या विकांताला मी हैद्राबादेत नाही, गोदावरी जिल्ह्यात कुठल्याशा गावी असेन.
आणि तसेही तो पर्यंत डास शिल्लक नसतील कारमध्ये. असलेच तर गाडी विकण्याचा सल्ला स्विकारावा लागेल.
असो, त्या पुढच्या विकांताला भेटु.
गाडी आतुन बाहेरून नीट धुवायला
गाडी आतुन बाहेरून नीट धुवायला हजार किंवा हजारो रुपये लागतात हो. आता मंदीच्या काळात परवडतील असे तरी उपाय सुचवा.
शिवाय डास म्हणजे काय डायनासोर आहे का. नॉर्मली डासेस डोन्ट गिव्ह दॅट मच त्रासेस. माणसाहून जास्त तर नाहीच नाही. अघोरी उपाय करू नका. गाडी पार्किंग मधे उभी करा, फॅन (ब्लोअर) फुल स्पीड मधे ठेवा, सगळे दरवाजे उघडा, सगळ्या काचा उघडा, आणि एक मोठा टॉवेल घेऊन सगळ्या सीट्स आणि त्यांखालच्या जागा अल्लाउद्दीन खिलजीच्या त्वेषाने झोडपून काढा.
डासेस बाहेर जातात. म्हणजे दुसर्याच्या कारमध्ये किंवा पार्किंगमध्ये जातात. तो त्याचं बघून घेईल. आपल्याला मारायचं पाप लागत नाही ही व्हॅल्यु अॅडिशन. कर्मा इज अ बीच, लक्षात ठेवा. न जाणो अगले जनम मे मोहे...
@मानव पृथ्वीकर, मला हे सापडले
@मानव पृथ्वीकर, मला Amazon वर हे सापडले. युएसबी वर चालणारा रिपेलंट:
Electric USB Mosquito Killer
अर्थात मी वापरलेले नाही. पण ते म्हणतात: Can be used anywhere Car, Home, office
ट्राय करून पहा व सांगा.
मी हे पटकन मोदींच्या काळात
मी हे पटकन मोदींच्या काळात वाचले. आणि वाटले आता पेटतो की काय धागा... कॉंग्रेसच्या काळात या पेक्षा जास्त डास होते. कॉंग्रेसने गेल्या साठ वर्षात डास मारले तर नाहीच, उलटे वाढवले. हे साठ वर्षांचे डास मारायचे तर वेळ तर लागणारच... वगैरे वगैरे
येनीवे, जोक्स द अपार्ट, ऑन ए सिरीअस नोट,
डास मारायचे किंवा पळवायचेच का आहेत? त्यांना पाळा ना..
सिरीअसली!, चावायला तर कुत्राही चावतो. तो देखील असा चावतो की पोटात ईंजेक्शनच घ्यावे लागले. तरीही आपण त्यांना पाळतोच ना.. मग डास पाळायला काय हरकत आहे. का नाही गांधीगिरीचा उपाय करून बघत. प्रेमाने गोंजारा डासांना, जीव लावा त्यांना, मायेने जवळ घ्या.. ते सुद्धा तुमचा स्पर्श ओळखतील. खाऊ घाला त्यांना रोजच्या रोज. मानवीच रक्त हवे असे गरजेचे नाही. कोंबड्या बकर्यांचे रक्त पाजा. कधीतरी मासे ट्राय करा. आमच्या शेजारच्या कुत्र्याला टॉमेटो दुधात कुस्करून द्यायचे, आणि तो ते मटक मटक करत आवडीने खायचा. एकदा या मुक्या प्राण्यांनी तुमच्यावर जीव लावला की तुम्ही द्याल ते यांना गोड वाटते.
सौं बात की एक बात - जो पैसा आणि वेळ तुम्ही यांना मारायल खर्च करणार आहात त्यात तुम्ही त्यांना एक चांगले आयुष्य देऊ शकाल. जर त्यांना पर्यायी रक्त मिळाले तर ते का कोणाला चावतील? त्यातूनही चावलेच तर खुशाल मारा ना.. शेवटी तुम्ही माणसे आहात, मनात आणले तेव्हा हव्या त्या प्राण्याला चिरडू शकता. आणि माणसांच्या कोर्टात याची शिक्षाही होत नाही.. (अपवाद - हरण काळवीट)
मानवकाका, शतकी धाग्याबद्दल
मानवकाका, शतकी धाग्याबद्दल आगाऊ अभिनंदन !
ऋ+१ भुतदया परमोधर्मा.
ऋ+१
भुतदया परमोधर्मा.
डास मारायच्या आधी चेहर्यावर
डास मारायच्या आधी चेहर्यावर मास्क लावा.. नाहीतर डासाच्या डोळ्यात तुमचा फोटो छापला जाईल आणि त्या डासाची बायको/प्रेयसी/ विबांसवाली/बाजूवाली ही डासिण तो फोटो बघून तुमच्या मागे लागेल..!! Careful.. "डासिण का मानवी बदला"
Lol
Lol
Pages