भारतातल्या रस्त्यांवर गाडी चालवणे हे जर काही वर्षांनी साहसी कृत्यांमध्ये समाविष्ट झालं तर मला तरी आश्च़र्य वाटणार नाही. स्मार्ट झालेल्या शहरांमध्ये गाड्या चालवणारी माणसं स्मार्ट व्हायला अजून अवकाश आहे हे ध्यानात ठेवलं तर सगळं प्रकरण सोपं वाटेल असं काहीसं मत होतं माझं. गाडी चालवायला शिकायचंच असं ठरवून मी नजिकच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दाखल झाले. वीस दिवसात मी चारचाकी गाडी चालवू शकेन या विचाराने मी अगदी उत्साहात होते. पहिल्या दिवशी मी ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी पोहोचले. ड्रायव्हिंग स्कूलचं नाव शक्यतितक्या जागांवर छापलेली स्विफ्ट गाडी तिथे उभी होती.
वैधानिक इशारा : या अनुभवातील ठिकाणे, पात्रे, घटना व संवाद काल्पनीक नाहीत आणि या अनुभवाशी साधर्म्य दर्शवणारी एक चालक रस्त्यावर चारचाकी चालवताना दिसल्यास चालकाच्या मन:स्थितीनुसार चारचाकीचा ब्रेक/वायपर/इंडीकेटर/भोंगा कधीही चालू शकतो याची नोंद घ्यावी आणि त्याचा रस्त्यावरील स्थितीशी मेळ घालून मागील चालकाने स्वतःच्या जवाबदारीवर योग्य तोच निर्णय घ्यावा.
॥ वाहन प्रशिक्षक उवाच ॥
साजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.
***
इब्लिस | 2 November, 2012 - 18:50
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<
आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.
यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.
त्या दिवशी टिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही. नवर्याच्या मागे पोलिस लागतात याचा बायकोला मिळणारा आनंद काही निराळाच. पोलिस पुराव्यानिशी सिद्ध करतात सारं त्यामुळे 'हॅट, काहीतरीच काय' असं म्हणून बायकोला झटकता येतं तसं तिथे करुन भागत नाही. नवर्याच्या मते पोलिस विनाकारण त्याच्या मागे लागतात, माझ्या मते सकारण. पण हा नेहमीचाच वादाचा मुद्दा. तोही मी सोडून दिला होता हल्ली. माझा आणि गाण्याचा सुतराम संबंध नसतानाही मी आजकाल खुषीत गाणी गुणगुणायला लागले होते.
त्या दिवशीची ती सुप्रभातीची सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता :-). त्याचं असं झालं, मी खूप सराव केला, परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण मला बघितल्यावर तेच घाबरले.
"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून मला खो खो हसायला यायला लागलं.
चौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत पोरं (म्हणजे दोनच बरं का) आणि नवरा भरलेली. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.
"आई.....लाल वरुन नेलीस गाडी"
"पकडलं तुला कॅमेर्यात."
"आता येईल तुला पत्र, भरा पैसे." नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.