मला पोलिस पकडतो तेव्हा..... भाग २
त्या दिवशीची ती सुप्रभातीची सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता :-). त्याचं असं झालं, मी खूप सराव केला, परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण मला बघितल्यावर तेच घाबरले.
"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून मला खो खो हसायला यायला लागलं.