क्रीडा

सूपरबोल - रामायण आणी महाभारत

Submitted by फेरफटका on 6 February, 2017 - 12:27

काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अ‍ॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.

सचिननामा-४: दुखापत व बॅड पॅच

Submitted by फारएण्ड on 1 January, 2017 - 23:41

ही पाक विरूद्धची टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकल्यावर तो सीझन संपला तेव्हा भारताने बरेच काही साध्य केलेले होते. त्या आधी २-३ वर्षे सगळा संघ व सचिनही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. परदेशात मॅचेस जिंकणे हे तोपर्यंत अत्यंत दुर्मिळ होते (१९३२ ते २००० या काळात फक्त १३ विजय). या २-३ वर्षांत भारताने वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि पाकिस्तान मधे विजय मिळवले. त्यातही पाक मधे सिरीज जिंकल्याने त्याचे महत्त्व जास्त होते, कारण त्याआधी आपण कधीही तेथे कसोटी सामनाही जिंकला नव्हता, आणि कधी जिंकू असेही वाटले नव्हते.

विषय: 
शब्दखुणा: 

सचिननामा-३: पुन्हा फॉर्मात

Submitted by फारएण्ड on 1 January, 2017 - 23:37

६. जुलै १९९९ ते मार्च २०००

सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९ च्या वर्ल्ड कप च्या शेवटी अझर चे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाईलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स च्या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला.

विषय: 
शब्दखुणा: 

Pro Wrestling League Season 2 - Get Ready for असली दंगल

Submitted by श्री on 31 December, 2016 - 05:01

Pro Wrestling League Season 2 - Get Ready for असली दंगल.
देशभर दंगल सिनेमाचा फिवर जोरात असतानाच २ जानेवारीपासुन दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोर स्टेडियममध्ये PWL Season 2 च्या मॅचेस सुरु होत आहे. दंगल सुलतान आणि साक्षी मलिकने कुस्तीला ग्लॅमर आणलयं आणि त्यात आता PWL भर घालतेय.

PWL Season 2 च्या मॅचेस २ जानेवारी पासुन १९ जानेवारी २०१७ पर्यंत असतील , पहिलीच मॅच २ जानेवारीला मुंबई महारथी विरुद्ध हरियाणा हॅमर्स आहे.

टीम्सची नावं पण इंटरेस्टिंग आहेत , मुंबई महारथी , हरियाणा हॅमर्स , दिल्ली सुलतान्स , युपी दंगल , जयपुर Ninjas , NCR पंजाब रॉयल्स.

विषय: 
शब्दखुणा: 

सचिननामा-२: शिखराकडे

Submitted by फारएण्ड on 31 December, 2016 - 00:30

२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.

शब्दखुणा: 

सचिननामा-१: ओळख

Submitted by फारएण्ड on 31 December, 2016 - 00:18

सचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे.

शब्दखुणा: 

पाच किलोमीटर आणि बरेच काही...शेवटचा भाग !

Submitted by विद्या भुतकर on 29 November, 2016 - 22:16

पळणं म्हणजे नक्की कसं? तुम्ही जर कुत्रं मागे लागल्यासारखं किंवा आपल्या दोन वर्षाच्या मुलामागे लाडाने किंवा दोस्ताना मधल्या अभिषेक बच्चन सारखं पळत असाल तर... चूक!!! माझा गुढगा दुखायला लागला आणि मग मी अनेक गोष्टी वाचल्या कि कसं पळलं पाहिजे. खांदे ताठ, मान आणि नजर समोर, कंबर पाण्याची घागर घेऊन जाताना असते तशी स्थिर, पाठ सरळ, हनुवटी बाहेर नको, हाताच्या मुठीत अंड घेउन जात आहे असे अलगद वळलेल्या, पाय जमिनीवर पडतानाही पंजे आधी आणि टाच नंतर पडली पाहिजे. श्वास इतकाच जोरात असावा कि शेजारी कुणी असेल तर त्याच्याशी बोलता आलं पाहिजे.

पाच किलोमीटर आणि बरेच काही...भाग २

Submitted by विद्या भुतकर on 28 November, 2016 - 22:10

'मला वाटतय त्या शामचाच काहीतरी हात असणार बघ', म्हणत मी रात्री सोफ्यावर बसले. एक तीस मिनिटांची हिंदी मालिका बघायची, मेल, फेसबुक चेक करायचे आणि झोप हाच काय तो दिवसभरात स्वत:साठी मिळालेला वेळ. तेही सानू आणि स्वनिक झोपल्यावर. नाहीतर मग रहाटगाडगं चालूच. बरं बसावं म्हटल टीव्ही लावून पोरं जागी असताना तर ते झोपल्यावर बघून अपराध्यासारखं वाटत की तेव्हढाही वेळ दिला नाही म्हणून त्यांना. तर हे असं होणारच होतं. त्यामुळे मी जेव्हा स्वत:साठी दुपारी का होईना वेळ काढुन पळायला जायला लागले तेव्हा सही वाटलं. आणि ५ किमी पळाल्यावर तर अजूनच भारी वाटत होतं.

Pages

Subscribe to RSS - क्रीडा