आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.
काल रात्री अमेरिकन फूटबॉल लीग (NFL) चा अंतिम सामना - सूपरबोल - पार पडला. मस्त झाला गेम. चारातल्या तीन क्वार्टर्स अॅटलांटा फाल्कन्स ने वर्चस्व गाजवल्यावर न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने मागून येत, बरोबरी साधली आणी सूपरबोल च्या ईतिहासात प्रथमच सामना एक्स्ट्रॉ टाईम मधे गेला, ज्यात न्यू ईंग्लंड पेट्रियट्स ने टचडाऊन (गोल) करत बाजी मारली. मागाहून पुढे येत असताना, त्यांनी रचलेले डावपेच, आत्यंतिक तणावाच्या वेळी दाखवलेली शांत पण झुंजार वृत्ती आणी त्या खेळाचा थरार, सगळच अफलातून होतं. ३९ वर्षाच्या टॉम ब्रेडी ह्या क्वार्टरबॅक ने हा स्वप्नवत विजय प्रत्यक्षात आणला.
पूर्वी दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लागायची. ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. मला आठवतंय, सर्वांना कल्पना आली होती कि आता पुढच्या एपिसोडमध्ये रावणवध होणार. रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता. पण सागरसाहेब प्रत्येक वेळी रावणाला पुढच्या एपिसोडचं जीवदान द्यायचे. अखेर मग प्रसारमाध्यमात सर्वांना कळवून एका रविवारी 'रावणवधाचा' दिवस मुक्रर करण्यात आला. त्या रविवारी सर्व लहानथोर मंडळी टीव्ही पुढे जागा पकडून बसले होते.
रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?
आरण्यकही घरात वाचू नये असे म्हणतात.
महाभारत घरात वाचायचे नसते हे खरे असेल तर मग गीताही घरात वाचता येणार नाही ना?
रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला. पण त्या आधी शबरी कोण होती, रामाला भेटण्याआधी तिचं आयुष्य यांबद्दल थोडंस पाहूया.