मला गवसलेले गीत-रामायण
Submitted by अमितव on 26 February, 2019 - 20:31
जर का तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि काय हवे ते माग म्हणाला तर ? तर आमची मागणीची यादी तयार होई पर्यंत, किंवा मनातली इच्छा देवास सांगेपर्यंत,बहुदा देव कंटाळून निघून जाईल.कारण आपण खूप संभ्रमात पडू,हे मागू का ते मागू या भावनिक गोंधळात बुडून जावू.पण जर तुमच्या भावनेला जर अचूक शब्दात पकडून तुमची रास्त मागणी देवाकडे पोहचवायची असेल तर ?त्यालाही एक छान उपाय आहे, तुमच्या भावनेला अचूक वाट करून देण्यासाठी,तुम्ही अशा माणसाला साकडे घालू शकता, ज्याचे शब्द भांडार अगणित आहे. देवाकडे काय मागायचे हि अडचण तुमच्या आमच्या सारख्या माणसांची.