दूरदर्शन

दूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण

Submitted by सचिन काळे on 16 October, 2016 - 15:30

पूर्वी दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लागायची. ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. मला आठवतंय, सर्वांना कल्पना आली होती कि आता पुढच्या एपिसोडमध्ये रावणवध होणार. रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता. पण सागरसाहेब प्रत्येक वेळी रावणाला पुढच्या एपिसोडचं जीवदान द्यायचे. अखेर मग प्रसारमाध्यमात सर्वांना कळवून एका रविवारी 'रावणवधाचा' दिवस मुक्रर करण्यात आला. त्या रविवारी सर्व लहानथोर मंडळी टीव्ही पुढे जागा पकडून बसले होते.

अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.

प्रांत/गाव: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.

विषय क्र.२ : दूरदर्शन

Submitted by नंदिनी on 22 August, 2013 - 04:19

आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन.

विषय: 

विषय क्रमांक - १ - "चित्रपट आणि मी "

Submitted by मैथिलीपिंगळे on 28 August, 2012 - 00:53

माझ्यावेळेला असं होतं......... असं म्हणण्या इतकी मी खूप मोठी नाही.... चित्रपटांच आणि माझं नांत कुठून सुरु झालं ते अगदी तारीख ,वार ,साल ,असं अगदी सही सही सांगताही येणार नाही. पण माझ्या काही चित्रपटाबद्दल विशेष आठवणी मात्र आहेत . कारण काही चित्रपट मला त्या चित्रपटापेक्षाही त्यावेळी घडलेल्या घटनांवरून जास्त आठवतात, असा घटनांनी येणारा प्रत्येक चित्रपट माझ्या आयुष्यात आठवणींची सुमधुर प्राजक्त घेऊन बरसतो ........

विषय: 

९० चे ते दशक

Submitted by आशयगुणे on 30 September, 2011 - 14:07

९०च्या त्या दशकात, लहानाचे मोठे होणं ही फार भाग्यवान गोष्ट होती! ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती! खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत! शाळेत, मुलीशी बोलणं, ह्याचा अर्थ काहीतरी 'सुरू' आहे असा घेतला जात, व 'शिक्षा मिळणे' ही गोष्ट 'शरमेने' मान्य केली जायची!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दूरदर्शन