९० चे ते दशक
९०च्या त्या दशकात, लहानाचे मोठे होणं ही फार भाग्यवान गोष्ट होती! ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती! खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत! शाळेत, मुलीशी बोलणं, ह्याचा अर्थ काहीतरी 'सुरू' आहे असा घेतला जात, व 'शिक्षा मिळणे' ही गोष्ट 'शरमेने' मान्य केली जायची!