स्त्री असणं म्हणजे चा थोडक्यात प्रवास.
स्त्री असणं म्हणजे असणं.
स्त्री असणं म्हणजे, माहितच नसणं.
मुलगी असणं म्हणजे थोडं वेगळं दिसणं.
वेगळं असलं तरी मुलगी असणं मजेचंच असणं.
वेगळेपणाची जाणीव वाढणं पण तरी काही तक्रार नसणं.
अचानक एका दिवसात "मोठं" होणं. आता मात्र जाणिवांचा आणि भावनांचा न थोपवता येणारा पूर. हा देवाचा/निसर्गाचा शुद्ध पक्षपात आहे. आय हेट बीइंग गर्ल अँड यु कॅन नॉट चेंज माय माईंड.
स्त्री असणं म्हणजे कटकट, इनकन्व्हिनियंस.
स्त्री असणं म्हणजे अनेक इनकन्व्हिनियंसची सवय करून घेणं.
१८ मार्च ला माझा मुलगा शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्याच्या आनंदातच घरी आला. तसे आधीपासूनच कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केलीच होती, पण युके सरकार लवकर लॉकडाऊन जाहीर करत नसल्यामुळे सगळीकडे काळजी वाढत चालली होती. रोज वाढत चाललेला मृत्युदर भीती वाढवत चालला होता. मग एकदाचे लॉकडाऊन जाहीर झाले आणि जीव भांड्यात पडला. कारण इकडे NHS ने स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्हाला कोवीडची लक्षणे वाटत असतील तर GP कडे किंवा हॉस्पिटल मध्ये येऊ नका, उलट घरीच आयसोलेट करा. त्यामुळे असे काही वाटलेच तरी डॉक्टरकडे जायचा मार्ग बंदच होता. जे काही असेल ते फोनवरच बोलायचे होते.
माझा अनुभव - कोविड -१९ - लॉकडाऊन - प्राचीन.
सूर पुन्हा गवसला (तर) खरा.
२०२० हे माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे वर्ष ठरणार होते. खूप साऱ्या अपेक्षा व स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षात प्रवेश केला. सुरुवात ही उत्तमच झाली होती. पण कॉविड-१९ नावाचा पाहुणा आला आणि संपूर्ण जगाला हादरवून हादरवून टाकलं. दरम्यान मीही अनेक बऱ्यावाईट अनुभवातून गेलोय, ते मी ह्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की लेख प्रचंड लांबला आहे. पण सर्वांना विनंती आहे की तो पूर्ण वाचावा. माझ्यासारख्या अबोल व्यक्तीला ह्या लेखाद्वारे व्यक्त होण्याची संधी भेटली त्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२० संयोजकांचे शतशः आभार!
२१-२२ मार्चचा विकांत होता आणि २५ मार्चला गुढी पाडव्याची सुट्टी. मध्ये दोन दिवसांची रजा काढून नवरा २१ मार्चला आई-वडिलांना भेटायला त्याच्या माहेरी गेला. गुढीपाडव्यादिवशी रात्रीपर्यंत घरी परतणार होता. गेली काही वर्षं आम्ही दोघं एकेकटेच ज्याला जसा वेळ आणि सुट्टी मिळेल तेव्हा अशी सासर/माहेरवारी करतो. एकमेकांच्या नादी लागलं की कुणाचंच जाणं होत नाही. त्यामुळे हे नेहमीचंच होतं. असो.
तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!
*****
आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..
महाबळेश्वर प्राईड हॉटेलच्या काऊंटरपाशी घुटमळताना ती मला पहिल्यांदा दिसली. तेव्हा तिचा "तो" तिच्या बरोबर नव्हता. जर हि आमची पहिलीच भेट नसती तर मला नक्कीच आश्चर्य वाटले असते की तिला एकटीला सोडून तो गेलाच कसा. पण त्या क्षणी तरी ती एकटीच तिथे चुळबुळ करत उभी होती.
आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन.
स्वातंत्र्यानंतरच्या भारतातल्या प्रगतीचा, अधोगतीचा, राजकारणाचा, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचा आलेख म्हणजे ’संधिकाल’ ही कादंबरी. मध्यमवर्गीय भिकोबा आरस आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर वाचक त्या त्या काळात त्याच्यांबरोबर वावरायला लागतो, आपल्या मतांना पुन्हा जोखून पाहतो इतकं प्रभावी व्यक्तिरेखाटन आणि काळाचं चित्र ’संधिकाल’ मधून मधु मंगेश कर्णिक घडवितात. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील मराठी मध्यमवर्गियांचा, आपली संस्कृती व मूल्ये जपत जगण्यासाठीचा आणि नव्या विस्मयकारक बदलात टिकून राहण्याचा संघर्ष म्हणजे ’संधिकाल’.