लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- ललिता-प्रीति
Submitted by ललिता-प्रीति on 1 September, 2020 - 06:26
२१-२२ मार्चचा विकांत होता आणि २५ मार्चला गुढी पाडव्याची सुट्टी. मध्ये दोन दिवसांची रजा काढून नवरा २१ मार्चला आई-वडिलांना भेटायला त्याच्या माहेरी गेला. गुढीपाडव्यादिवशी रात्रीपर्यंत घरी परतणार होता. गेली काही वर्षं आम्ही दोघं एकेकटेच ज्याला जसा वेळ आणि सुट्टी मिळेल तेव्हा अशी सासर/माहेरवारी करतो. एकमेकांच्या नादी लागलं की कुणाचंच जाणं होत नाही. त्यामुळे हे नेहमीचंच होतं. असो.
शब्दखुणा: