विषय क्रमांक २ - आदूस ...
Submitted by तुमचा अभिषेक on 5 July, 2014 - 04:53
तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच!
*****
आदूस ! एकेकाळचा आमचा आदू मामा ..
विषय:
शब्दखुणा: