लेखनस्पर्धा १: 'स्त्री असणं म्हणजे…' - वंदना

Submitted by वंदना on 23 September, 2023 - 15:29

स्त्री असणं म्हणजे चा थोडक्यात प्रवास.

स्त्री असणं म्हणजे असणं.

स्त्री असणं म्हणजे, माहितच नसणं.

मुलगी असणं म्हणजे थोडं वेगळं दिसणं.
वेगळं असलं तरी मुलगी असणं मजेचंच असणं.

वेगळेपणाची जाणीव वाढणं पण तरी काही तक्रार नसणं.

अचानक एका दिवसात "मोठं" होणं. आता मात्र जाणिवांचा आणि भावनांचा न थोपवता येणारा पूर. हा देवाचा/निसर्गाचा शुद्ध पक्षपात आहे. आय हेट बीइंग गर्ल अँड यु कॅन नॉट चेंज माय माईंड.

स्त्री असणं म्हणजे कटकट, इनकन्व्हिनियंस.
स्त्री असणं म्हणजे अनेक इनकन्व्हिनियंसची सवय करून घेणं.

स्त्री असणं म्हणजे स्त्रीत्वाच्या प्रतिमेत अडकणे.
स्त्री असणं म्हणजे ती प्रतिमा लादलेली असल्याचा साक्षात्कार.

स्त्री असणं म्हणजे काहीतरी विशेष असणं. चिवट, चोखंदळ, आस्वादक, भावनिक, वैचारिक, बंडखोर, नम्र, वत्सल, कठोर, ठाम, गोंधळलेली ……

स्त्री असणं म्हणजे काही विशेष नसणं.

स्त्री असणं म्हणजे अगदी सहज असणं.

स्त्री असणं म्हणजे बस्स असणं.

संदर्भ - आई, मी, बहिणी, मुलगी, मैत्रीणी

Group content visibility: 
Use group defaults

छान!

छान आहे. Happy
आयुष्य इतकं धकाधकीचं आणि वेगवान झालं आहे की लक्षातच रहात नाही मी स्त्री आहे. जे काही भावनांचे चढउतार येतात ते एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून येतात एवढ्यावर थांबतेय. फक्त जीवशास्त्रात 'स्त्री' असते. मला काही लिहिताच आलं नाही त्यामुळे. आयडेंटिटी क्राईसेस आले ते वेगळंच.